Login

वेळ..

कविता
वेळ म्हणते थांबत नाही,
धावत जाते, मागे वळत नाही
क्षणाक्षणाला नवे रंग घेते,
जीवनाचा प्रवाह उलगडते

सोनेरी पहाटेचा गोड गंध,
संध्याकाळी स्मृतींचा छंद
क्षणात दुःख, क्षणात आनंद,
वेळचे आहेत आपले वेगळेच रंग

नसते ती कुणासाठी थांबणार,
ना तिचा प्रवास कधी थकणार
संथ प्रवाहातही ती चालते,
आणि वादळांतही ती जगते

जपलेस तर मित्र होईल,
वाया घालवलास तर शत्रू ठरेल
वेळ हीच जगण्याचा मंत्र,
तिला ओळखणे जीवनाचे तंत्र

तर जगा प्रत्येक क्षणाचा मान,
वेळेच्या प्रवाहात ठेवा ठाम स्थान
कारण वेळ कधीच परत येत नाही,
कोणाचसाठी वेळ कधी थांबत नाही.