शील - भाग 11
ऑफिसमधे तसंही काही करण्यासारखं नव्हतं. मूड खराब झाल्यामुळे यशने संध्याशी बोलण्याचा प्रयत्नदेखील केला नव्हता.
तो सरळ घरी आला. येताना थोडंफार खायचं सामान घेऊन आला. त्याने आधी जुईलीला कॉल केला. तिला ऑफिसमधे खुप काम होतं. त्यामूळे तिने येऊ शकणार नाही असं कळवलं. वृषभने यायला उशिर होईल असा message केला. यशने fresh झाल्यावर आधी काहितरी खायला बनवू या विचाराने किचन मधे मोर्चा वळवला आणि मसाले भाताचा कुकर लावला. जेवायला घेणार तोच संजीव दारात हजर. मग दोघांनी एकत्रंच जेवण केलं.
“संजीव काय बोलत होतास तू सकाळी reports बद्दल?”
“reports मिळालेत मला. हे बघ.”, संजीवने reports यशला दाखवले.
“काय वेगळं आहे या reports मधे? काय सांगत होतास तू?”
“अरे यश नीट बघ. हे तेच medical reports आहेत जे normally raped victim चे काढले जातात. ज्या डॉक्टर Mrs साठे यांनी संध्याचे medical checkup केलं त्यांच्याशी बोलताना कळलं की पार्टीच्या दिवशी किंवा दुस-या दिवशी संध्या check up साठी आलीच नव्हती. ती आली तीन दिवसांनंतर. मुळात इतक्या late डॉक्टर ला sample मिळणं जवळपास मुश्किल आहे. त्यातही reports नुसार sample 99% matched दाखवलेत. आणि तू एकदाही medical test केलेली नाही तरी त्यांनी कशासोबत samples matched केलेत? आणि समजा जरी त्यांना तुझे samples मिळालेत असं समजलं तरी ते इतक्या उशिरा का गेले test करायला?”
“तू म्हणतो त्यात तथ्य आहे. पण हा ठोस पुरावा असू शकतो का?”
“मला नाही वाटत याहून सबळ पुरावा काही असू शकेल.”
“Thank you संजीव तू इतके efforts घेतले माझ्यासाठी.”
“जेव्हा निर्दोष सुटशील तेव्हा thanks म्हण.”
“हो नक्कीच.”
तेवढ्यात वृषभ आला. त्यालाही संजीवने reports बद्दल सांगितले. वृषभने reports नीट पाहिले आणि संजीवने सांगितलेले मुद्देही समजून घेतले. मग तो म्हणाला,
“हा एक पुरावा नक्कीच आहे. पण ठोस पुरावा नाही.”, असं म्हणून वृषभने तो कागद स्वत:च्या खिशात ठेवला.
“असं का म्हणतोय तू?”,संजीवने विचारलं.
तसं वृषभ म्हणाला, “ मला वाटतं यश संध्याशी बोलता यायला हवं. निदान काय आहे नेमकं ते तरी कळेल. एका कागदाच्या भरवशावर नाही राहू शकत आपण. कारण असे पुष्कळ कागद बनवता येतात.”
“तू बरोबर म्हणतोय वृषभ.”, यश म्हणाला,” मलाही तसंच वाटतंय. मलाही जाणून घ्यायचंय की हे सगळं नेमकं का केलं संध्याने?”
“तुझं बोलणं झालं का संध्याशी?”,संजीवने विचारलं तसं यशने नकारार्थी मान हलवली.
“मला नाही वाटत ती बोलेल माझ्याशी.”
“प्रयत्न तर करुन बघ. नाहितर आम्ही आहोतंच मागे”,वृषभ म्हणाला.
“हो चालेल.”
“चल मग निघतो आम्ही दोघं. बरंच late झालंय आता. You take care.”, असं म्हणून वृषभ आणि संजीव दोघं निघाले.
“Take care. Bye and Thanks.”, यशने दोघांना दरवाजापर्यंत सोडले आणि बेडरूममध्ये येऊन झोपी गेला.
आज मंगळवार मुदतीचा पाचवा दिवस होता. यश ऑफिसमधे पोचला तेव्हा अकरा वाजत आले होते. थोडंसं काम केलं आणि त्याने चहा मागवला.
ऑफिस बॉय चहा घेऊन आला तेव्हा यशने त्याला संध्या बद्दल विचारलं. तो म्हणाला की संध्या madam त्यांच्या केबिन मधे आहेत. हिच योग्य वेळ असं समजून यश संध्याच्या cabin कडे गेला. त्याने knock केलं तेव्हा आतून come in असा आवाज आला.
आत गेला तेव्हा त्याने बघितलं की संध्या खाली मान घालुन काहितरी काम करत होती. यशने direct बोलायला सुरवात केली.
“Miss संध्या तुम्ही असं का केलंत माझ्याबरोबर? मी काय बिघडवलंय तुमचं?”
संध्याने दचकून वरती मान वळवली. आणि काही क्षणासाठी ती घाबरली. दुस-याच क्षणी स्वत:ला सावरून ती उलट त्यालाच ओरडली.
“How dare you come to talk to me? मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही.”, तिचा आवाज इतका मोठा होता की आजूबाजूचे लोक cabin जवळ येऊन कानोसा घेऊ लागले.
यशला कळून चुकले की बोलून काहिच फायदा नाही. आपल्या हाती काहीही लागणार नाही. तो शांतपणे बाहेर आला. सगळ्यांच्या नजरा चुकवून केबिन मधे येऊन बसला. हा दिवस असाच गेला.
रात्री यशने संजीवला फोन केला. घडलेला प्रकार संजीवला कळल्यावर तो म्हणाला की विचार करुन सांगतो काय करता येईल ते.
रात्री झोपण्यागोदर जुईलीशी बोलता येईल का म्हणून त्याने जुईलीला call केला.
“Hello जुईली, sorry to disturb you. Can we talk?”
“हो बोल ना.”
“झोपली होतीस का?”
“हो. म्हणजे झोपणारंच होती. बोल काय झालं?”
यशने जुईलीला माहीत नसलेल्या सगळ्या गोष्टी तिला सांगितल्या.
“यश, अवघडंच आहे सगळं. आपल्याला त्या संध्याशी बोलता यायला हवं. नाहितर आपल्याला सत्य समजणार नाही.”
“हो पण कसं बोलायचं?”
“कोणी दुसरं आहे का ज्याच्याशी आपण बोलू शकतो? अरे हो, त्रिशा, कुमार , नयना आणि अजुन कोण होतं ना..
“हो अजुन स्वीटी आणि परेश…”
“त्यांच्यापैकी कोणाशी बोलता येत असेल तर बघ ना.”
“त्रिशा बोलेल असं वाटत नाही. परेश आणि स्वीटी project साठी बाहेर गेलेत. नयना आणि कुमारशी बोलायला try करतो.”
“ok then माझी काही help लागली तर सांग.”
“हो नक्कीच. Bye. Good night.”
“Bye.”
यशने उद्याचा नविन आखाडा तयार केला आणि तो झोपी गेला.
बुधवार. सहावा दिवस. यश शुक्रवारी अय्यर साहेबांना भेटला होता. इतके दिवस कोणता दिवस आहे, तारीख काय आहे या सगळयाकडे त्याचं लक्षंच नव्हतं.
तो सकाळी उठला तेव्हा संजीवचा message होता.
‘Hey यश, Good Morning. I have a plan. So that we can catch Sandhya. She has a family which stays in Pune. And recently her little brother will come to mumbai on Sunday and stay with her. I found this info and also her new address. तिच्या भावाच्या मदतीने आपण तिच्याशी बोलू शकू.”
यशने message वाचला. आणि संजीवला call केला.
“Hi. Good Morning संजीव. Message वाचला तुझा.”
“Hi. अरे हो. वृषभशी मी बोललो. तोपण तयार आहे.”
“काही चुकीचं नाही करणार आहोत ना आपण?”
“ नाही रे. आपल्याला फक्त संध्याशी बोलता येईल एवढाच साधा प्रयत्न करायचा आहे.”
“ok. मी आज त्रिशा आणि कुमारशी बोलणार आहे. म्हणजे तसा प्रयत्न करणार आहे.”
“ok. कर तू प्रयत्न. काही हाती लागतंय का बघ.”
“चल मग मला ऑफिसला जायचंय.”
यशने यावेळेस ऑफिसमधे तमाशा करणं टाळलं. कुमार लंच break नंतर जेव्हा कॉफ़ी शॉप मधे गेला तेव्हा यशने त्याला गाठलं.
समोर यशला बघुन कुमार बिथरलाच. तो निघून जाणार होता पण यशने त्याला अडवलंच. शेवटी बोलण्याशिवाय त्याच्याकडे काहिच मार्ग नव्हता.
“हे बघ यश, मला यात गुंतवू नकोस. मला काहिच माहीत नाहिये. त्या दिवशी पार्टी चालू असताना अचानक संध्या आली आमच्याकडे आणि आम्हांला बाजूला घेऊन म्हणाली की तिच्यावर रेप झालाय आणि तू केलाय असं. हे बघ याहून जास्त काही नाही माहीत मला.”
“कोण कोण बोलत होता तुम्ही.”
“मी आणि स्वीटी.”
“ok. पण अजुन काही आठवलं तर please सांग. हा माझ्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे.”
“हो मी सांगेन.”, असं म्हणून कुमार तिकडून निघून गेला. यश बराच वेळ तिकडेच बसुन होता. मग तो ऑफिसमधे cabin मधे येऊन बसला. नयना मीटिंग मधे होती. तिची मीटिंग संपल्यावर बोलूया तिच्याशी असा विचार करुन यशने एक hot coffee मागवली.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा