Login

शील - भाग 13

I am new writer works in IT. I love to write and Express my feelings. Ira gives best platform to explore your talent. Thank you Ira. Please do like, share and comment. So that I can improve my writing.

शील  -  भाग 13

दहाव्या दिवशी म्हणजे सोमवारी यश थोडं लवकरंच office मधे गेला. Pending कामं त्यानं पटकन आटोपली. आणि लंच break च्या आधीच तो परेश ला भेटायला म्हणून त्याच्या desk जवळ गेला. परेश तिकडे नव्हता. तो कुठे असेल ह्या विचारात असतानाच त्याला त्रिशा टेरेसच्या दिशेने जाताना दिसली. यश तिच्यामागे गेला. ती पोचली आणि टेरेसवर उभ्या असलेल्या परेशला भेटली. त्यांचं बोलणं चालू होतं हे यशने लपुन बघितलं. थोडं पुढे जाऊन तो एका मोठ्या कुंडीतल्या झाडामागे लपला जेणेकरून त्याला बोलणं ऐकू येईल. 
त्रिशा बोलत होती,”परेश नीट होईल ना सगळं?” “इथपर्यंत आलो आहोत. आता मागे नाही फिरता येणार.”,परेश तिला शांत करत म्हणाला.
“पण तो तर पुन्हा ऑफिसला यायला लागला. आणि मी ऐकलं की तो चौकशी करतोय.”
“हे बघ. नको काळजी करुस. आपल्याव्यतिरिक्त कोणाला काही माहीत नाही. आणि आपण जे करतोय त्यावर विश्वास ठेव.”
“हो. बरं आता मी जाते. कामं आहेत खुप.”
“हो. मीपण येतो. चल.”
परेश आणि त्रिशा जायला लागले त्याआधीच यश त्यांना दिसणार नाही अशा पद्धतीने बाजूला सरकला.
आता परेशशी बोलून सहज काही कळणार नाही एवढं तर समजलं. पण नेमकं हे दोघं काय बोलत होते आणि का ते यशच्या विरुद्ध कट रचत आहेत हे मात्र यशला समजले नाही. तो तसाच कोणी आपल्याला पाहणार नाही या बेताने cabin कडे जायला निघाला. आज स्वीटीशी बोलूया असं मनातल्या मनात त्याने ठरवलं.
Evening ला ऑफिस सुटल्यावर त्याला parking area मधे स्वीटी तिची स्कूटी काढताना दिसली. यशने तडक तिच्याकडे जाऊन तिला मुद्द्याचे प्रश्न विचारायला सुरवात केली. स्वीटीला कदाचित याची कल्पना होती की नाही माहीत नाही पण तिने न घाबरता त्याच्या प्रश्नांची उत्तरं दिली. तिची उत्तरं कुमार आणि नयना च्या उत्तरांशी मिळतीजुळती होती. यश हतबल होऊन मागे फिरला आणि तसाच पुन्हा मागे वळून त्याने तिला विचारले,
“स्वीटी, मला पोलिस घेऊन गेले, त्यानंतर काय झालं होतं? आणि संध्याने तिचा flat change का केला? तू सांगशील का मला please ?”
“flat change का केला हे तर तिच सांगू शकते. पण तुला पोलिस घेऊन गेले त्यानंतर काय झालं हे सांगू शकते मी.”
“काय झालं?”
“तू पळून गेलास हे सांगायला constable पुन्हा flat वर आले. ते ऐकुन संध्या चिडली. तिच्यासोबत परेश पण चिडला. त्या दोघांना चिडलेलं पाहून कुमार त्यांना शांत करत होता. परेश constable वर ओरडला की तुम्हाला नीट काम करता येत नाही असं. Constable आणि परेश मधे थोडी बाचाबाची झाली आणि ते लोक निघून गेले. त्यानंतर संध्याने मला, नयना आणि कुमारला घरी जायला सांगितलं. त्रिशा म्हणाली की ती परेशसोबत थोड्या वेळाने जाईल. मग आम्ही तिथून निघालो. आम्ही door पर्यंत जात होतो तेव्हा मी ऐकलं की….”
“काय ऐकलंस तू?”
“संध्या त्रिशाला sorry म्हणत होती…”
“काऽय? संध्या का sorry म्हणेन आणि तेपण त्रिशाला?”
“ते मला कसं माहीत असणार. आणि जाऊ का मी आता. मला उशिर होतोय.”
“हो ठिक आहे. Thanks and bye.”
“नेमकं काय चालू आहे?”, यश मनातल्या मनात म्हणाला. घरी पोचला तो याच विचारात. त्याला टेरेसवर त्रिशा आणि परेशचं बोलणं आठवत होतं. मग स्वीटी काय बोलली ते आठवत होतं. पण link लागत नव्हती कशाचीच. त्याचं डोकं दुखायला लागलं. त्याने सरळ एक शॉवर घेतला आणि एक गोळी घेतली. नावाला फक्त एक सैंडविच खाल्लं जे त्याने parcel आणलं होतं. उगीच त्रास नको व्हायला म्हणून.
उद्याचा दिवस महत्त्वाचा होता. जुईलीने सुट्टी घेतली होती. 
यश झोपला होता तेव्हाच त्याच्या फोनची रिंग वाजली. संजीव, जुईली, वृषभ आणि यश conference call वर आले. दुस-या दिवशी कोणी काय काय करायचं याचं revision झालं. यशने सगळ्यांना आजच्या दिवशी काय झालं ते सांगितलं. तसं वृषभ म्हणाला की,” Plan थोडा change करावा लागेल. आपल्याला परेश आणि त्रिशाला पण संध्यासोबत बोलतं करावं लागेल.”
“हो. आणि हे सगळं उद्याच करावं लागेल..”,संजीव म्हणाला. 
सगळे तयार झाले आणि call cut झाला.
मंगळवार. 11 वा दिवस. सगळं आवरून झाल्यावर यशने संजीवला कॉल केला. “येतोच 5 मिनटांत पोहोचतो.” असं त्याने उत्तर दिलं. संजीव आला तोपर्यंत यशने नाश्ता तयार ठेवला.
नऊ वाजत आले होते. इकडे वृषभ तडक सौरभच्या gym मधे गेला. शिताफीने त्याने सौरभचा mobile switch off केला. मग त्याल सांगितलं की “ संध्याचा accident झालाय. तुला यावं लागेल.” सोबत स्वत:चं ओळखपत्र दाखवलं. सौरभ यायला तयार झाला. वृषभ त्याला घेऊन तडक एका हॉस्पिटलमधे गेला. तिकडच्या nurse कडे खोटी खोटी चौकशी केली. तिला वृषभने आधीच पढवून ठेवलं होतं. नंतर थोड्याच वेळात जुईली तिकडे social worker बनून आली. तिने थोडं वृषभशी बोलायचं नाटक केलं. आणि मग सौरभला म्हणाली की काही formalities आणि check ups चालू आहेत. त्याला बराच वेळ लागेल. तोपर्यंत तू काय करशील. चल माझ्या बरोबर. आधी सौरभ तयारंच नव्हता. मग वृषभने सांगितलं की , “आम्ही तुझ्या घरी कळवलं आहे. ते येतील  तेव्हा तुला बोलावून घेऊ. आत्ता तू जा ह्या ताईसोबत.” जुईलीच्या आश्वासक नजरेने तो तयार झाला. त्याचा mobile पुरावा म्हणून वृषभने स्वत:जवळ ठेवला. जुईली तडक सौरभला घेऊन तिच्या घरी गेली. आता त्याला गुंतवून ठेवणं ही तिची जबाबदारी होती.
इकडे वृषभ यशच्या घरी आला. तो आल्यावर वृषभने संध्याला सौरभच्याच फोनवरुन कॉल करुन सांगितलं, “Hello, मी सौरभचा मित्र बोलतोय. त्याचा एक छोटा accident झालाय. तुम्ही इकडे येऊ शकाल का? मी तुम्हाला address सांगतो.”
सौरभचं नाव ऐकताच क्षणाचाही विलंब न लावता संध्या तयार झाली. जशी संध्या यशच्या घरी आली तिने सौरभबद्दल चौकशी केली. 
“तो आत झोपलाय. तुम्ही बसा.”, असं म्हणून वृषभने तिला पाणी दिलं.
पाणी पिऊन झाल्यावर तिने पुन्हा सौरभ बद्दल विचारलं. वृषभने तिला बेडरूम कडे इशारा केला. ती बेडरूममध्ये गेली तसं शिताफीने संजीवने तिच्या हातातला फोन हिसकावून घेतला आणि तिला आत ढकलून बेडरूमचं door बंद केलं. संध्याला आधी काही समजलंच नाही. कळल्यावर ती जोरजोरात ओरडू लागली आणि दार वाजवू लागली. संजीवने त्यानंतर त्रिशा आणि परेशला message केला की, ‘Please come urgent. Need to talk. It’s an emergency.”
इतकं सगळं होईस्तोवर यश किचनमधे लपुन बसला होता. तो आता बाहेर आला. त्यानंतर सगळ्यांनी मिळून संध्याला बाहेर काढलं आणि एका खुर्चीवर बसवून पुन्हा बेडरूममधेच बांधून  ठेवलं. संध्या खुप प्रयत्न करत होती स्वत:ला सोडवण्याचा. पण काही उपयोग होत नव्हता.

0

🎭 Series Post

View all