शील - भाग 14
इतक्यात संध्याचा मोबाईल वाजला. परेश आणि त्रिशाला यायला 1 ते 1:30 तास लागणार होता. संजीवने तसा message यश आणि वृषभला दाखवला. त्याला वृषभ थोडा काळजीत वाटला. तसे त्याने वृषभला विचारले.
“वृषभ काय झाले? Tense वाटतोय जरा.”
“हो. म्हणजे संध्याला असं बांधून ठेवणं मला पटत नाहीये. कायद्याने गुन्हा आहे तो. शिवाय परेश आणि त्रिशाला यायला वेळ आहे. इतका वेळ तिला असं ठेवणं मला पटत नाही. आणि आपण सगळे पुरुष आहोत. असं एकट्या बाईला बांधणं शोभत नाही आपल्याला. आणि एका जबाबदार पोलिसाला तर नाहीच नाही.”
हे ऐकून यश आणि संजीव एकमेकांकडे बघू लागले. त्यांनाही वृषभचं म्हणणं पटलं. त्यांनी तसं दर्शवलं.
वृषभने मग दोन lady constables ना आत बोलावलं. (त्याने आधीच त्यांना सोबत आणलं होतं. ज्या casual dress मध्ये होत्या. न जाणो गरज लागली तर. त्या दोन constables कधीपासून बाहेर पोलिसांच्या गाडीत बसल्या होत्या.)
“आत ज्या madam आरडाओरडा करत आहेत त्यांना सोडवा आणि बाहेर घेऊन या.”, वृषभ त्या constables ना म्हणाला.
वृषभला जे योग्य वाटलं ते त्याने अमलात आणलं.
त्या constables नी संध्याला सोडवलं. आणि हात धरुन थोडं ओढतंच बाहेर आणलं.
संध्या मात्र झाल्या प्रकाराने प्रचंड संतापली होती. तिच्या डोळ्यात जणू आग होती. वृषभला खाऊ की गिळू असं तिला झालं होतं. ती ओरडतंच वृषभच्या अंगावर धावत गेली. पण ती वृषभ पर्यंत पोहचू शकली नाही. त्या lady constables नी तिला घट्ट धरुन मागे ओढलं. संध्या चिडलेलीच होती. एवढयात तिचं लक्ष पाठमो-या उभ्या असलेल्या आणि नुकतंच वळून बघितलेल्या यशकडे गेलं. यशला बघुन तर संध्याची तळपायाची आग मस्तकात गेली. ती तशीच जोरात यशला ओरडून म्हणाली,”शेवटी दाखवलीसंच ना स्वत:ची लायकी…यश..तुझी हिम्मतंच कशी झाली मला अशी बांधून ठेवायची. तुमची सगळ्यांची मी पोलिस complaint करेन.”
यावर यश तिला म्हणाला,”आत्ता या क्षणी तरी त्याचा काही उपयोग नाही. आम्हांला आमच्या प्रश्नांची उत्तर मिळेपर्यंत तरी तुला इथुन जाता येणार नाही.”
“कसले प्रश्न? मी तुमच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं देणार नाही.”, संध्याचा पारा वरंच होता.
“तुला द्यावीच लागतील. हे तुलाही माहीत आहे आणि मलाही की मी तुझ्यावर रेप केलेला नाही. तू विनाकारण मला अडकवू शकत नाहीस.”, यशदेखिल हार मानायला तयार नव्हता.
“विनाकारण….?”, असं म्हणून संध्या कुत्सित हसली आणि सोफ्यावर जाऊन बसली. ती पळून जातेय की काय असे वाटून माने नावाच्या lady constable थोड्या पुढे झाल्या. तेवढ्यात वृषभने त्यांना जागेवरंच थांबण्याचा इशारा दिला.
यश मात्र आता चांगलाच चिडला होता. एकतर या बाईने माझ्यावर खोटेनाटे आरोप केलेत. वरुन अशी दाखवतेय की काही केलंच नाही.
“तुला काहीच कसं वाटत नाही? तू सरळसरळ माझ्यावर खोटे आरोप करतेस. आणि या सगळ्याचा तुला जराही पश्चात्ताप नाही.”
यावर संध्याने काहीही उत्तर दिले नाही. मग यश अजुनंच चिडला.
“बोल. गप्प का? सांग..कबूल कर की मी नाही केलाय तुझ्यावर बलात्कार. बोल..”
“त्याने काय फरक पडणार आहे आता. तू काहीही नाही करु शकत. तू अडकला आहेस पुरता…”, असं म्हणून संध्या पुन्हा हसली.
हे सगळं होत होतं तेवढयात दाराची बेल वाजली. त्रिशा आणि परेश तिकडे पोहोचले होते. वृषभने त्यांना आत घेतले आणि door लावून घेतले. त्या दोघांना काहीही माहित नव्हते की काय चालू आहे. संध्याला आधी त्रिशा आणि परेशला बघुन आश्चर्य वाटले. पण दुस-याच क्षणी तिला काय होतंय याचा अंदाज आला. संध्याची आणि त्यांची नजरानजर झाली. तेव्हा तिने त्यांना स्वत:जवळ येऊन बसण्याचा इशारा केला. ते दोघे तिच्या बाजूला येऊन बसले.
इकडे यशचं बोलणं चालूच होतं.
“अडकलोय म्हणजे? तू अडकवलं आहेस. तेही खोटं. लाज कशी वाटत नाही तुला. सांग खरं काय ते. मी तुझ्यासोबत काहीही चुकीचं वागलेलो नाही.”
“नाही सांगणार..”,संध्या स्वत:च्या बोलण्यावरून पलटायला तयारंच नव्हती.
“Miss Sandhya, जर खरं काही ते सांगितलं नाही तर हे विसरु नका की सौरभ आमच्या ताब्यात आहे.”, संजीवने वर्मावर बोट ठेवले.
इतका वेळ गप्प असलेले त्रिशा आणि परेश आता संध्या, संजीव आंणि यशकडे बघू लागले. सौरभचं नाव आलेलं ऐकुन त्यांना धक्काच बसला..आणि प्रसंगाचं गांभिर्य देखिल समजलं. त्रिशाने आश्वसक पद्धतीने संध्याच्या हातावर थोपटले. त्यामुळे संध्याला थोडा आधार वाटला. परंतु इतका वेळ सौरभचा आपण विचारंच नाही केला याचं तिला वाईट वाटलं. तिला आता सौरभची काळजी वाटू लागली.
आपल्यामुळे सौरभला काहीही होऊ नये हाच विचार करत असताना पुन्हा यशने ओरडून विचारले,”सांग तू खोटा आरोप केलास ते. मी काहीही केलेलं नाही..” आणि संध्याच्या तोंडून निघालं, “हो.. मी हे सगळं नाटक केलं. माझ्यावर बलात्कार नाही झालेला. तू काहीही नाही केलं. मी फसवलं आहे तुला… पण माझा सौरभ कुठेय? त्याला काही करु नका please.”असं म्हणून संध्या त्रिशाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली.
संध्या हे बोलली तसं यश बोलला,” एक स्त्री असून तू अशी कशी काय वागू शकतेस. स्त्रीचं चारित्र्य असं रस्त्यावर पडलंय का? काहिच कसं वाटलं नाही तुला असं वागताना...आणि माझ्यावर इतके गंभीर आरोप करताना... अगं जसं स्रियांचं शील महत्त्वाचं तसं पुरुषांचं पण महत्त्वाचं आहे. त्यांचंही चारित्र्य असं रस्त्यावर पडलंय का? माझ्या आयुष्याचा काहीही विचार केला नाहीस तू. ते बरबाद करायला निघाली होतीस तू. आजपर्यंत मी कोणाचं काहीही वाकडं केलं नाही. कोणाचं मन दुखावलं नाही. माझ्यासारख्या सभ्य माणसावर तू असले आरोप करतेस….”
“बास यश, यापुढे एक अक्षर बोलू नकोस…”, असं म्हणून त्रिशाने यशकडे बघून हाताने थांबण्याचा इशारा केला.
ते ऐकुन यश म्हणालाच, “तुला तर विचारायचेच आहे मला. तुच support करत होतीस ना हिला. तू आणि हा परेश. कसे आहात ना तुम्ही.. एका चांगल्या माणसावर आरोप करताना काहिच वाटत नाही तुम्हांला.”
यश अजुनही बोलत राहीला असता. तेवढयात वृषभ त्याला म्हणाला,”थांब यश, तू निर्दोष आहे हे सिध्द झालंय ना..आता शांत हो. बस तिकडे. पाणी पी. संजीव त्याला पाणी दे.”
संजीवने यशला पाणी दिलं आणि त्याला एका कोप-यात स्टुलवर बसवलं.
वृषभने मग माने या constable ला तीन ग्लास पाणी आणायला सांगितले. प्रत्येकी परेश , संध्या आणि त्रिशासाठी. आणि पेठे नावाच्या constable ला door step जवळ उभे रहायला सांगितले. पाणी दिल्यावर तो संध्याला म्हणाला, “Miss संध्या मघाशी मी सांगितले नाही पण मी sub inspector वृषभ. वृषभ देसाई. मघाशी जे वागलो आम्ही त्याबद्दल माफी मागतो. परंतु हे सगळे खरं काय ते जाणून घेण्यासाठी होते. I hope you will understand.. एखादी चुकिची complaint केल्याचे काय परिणाम होऊ शकतात हे तुमच्यासारख्या मोठ्या माणसांना सांगायला नको.” एवढं म्हणून वृषभ थांबला जरा आणि त्याने संध्याला विचारले, “संध्या एक सांग, तू complaint केली होतिस ना मग flat का change केलास?”
संध्या रडतच होती. ती काही उत्तर देत नाही हे बघून वृषभ म्हणाला, “सौरभ safe आहे संध्या.”
हे ऐकताच संध्याने वर बघितले.
पुन्हा वृषभ म्हणाला,”माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू flat का change केलास.?”
तरिही ती काही बोलत नाही हे बघून वृषभने संजीवला सांगितले की,” जुईलीला सांग की सौरभला इकडे घेऊन ये.”
यावर त्रिशा म्हणाली,”इकडे नको. त्याला हे सगळं माहीत नाहिये. त्याला call करा. आम्हाला आवाज ऐकायचाय आणि बघायचंय की तो safe आहे.”
“ठिक आहे.”, असं म्हणून संजीवने सौरभला video call लावला. सौरभला बघितल्यावर आणि तो safe आहे हे समजल्यावर त्रिशा , संध्या आणि परेश थोडे relax झाले.
लगेच वृषभने पुन्हा विचारले,”Miss संध्या तुम्ही अजुनही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही.”
संध्या अजुनही थोडी घाबरलेली होती. सौरभ involve झाल्यामुळे तिचं रागीट बोलणं कुठेतरी हरवलं होतं.
यावर त्रिशा म्हणाली,”आम्हांला पुरावा ठेवायचा नव्हता. आणि यश पळून गेलेला. त्यामुळे तिथेच राहणं संध्याच्या जीवावर बेतायला नको.. न जाणो यशने तसा प्रयत्न केला असता तर…म्हणून घर बदललं तिने. आणि…”
“आणि काय Miss त्रिशा?”, वृषभने विचारले.
“ते घर आम्ही खासकरुन यशला फसवण्यासाठीच घेतलं होतं.”
आता लपवून काही फायदा नाही हे त्रिशाला समजून चुकले होते. तिच्या ह्या उत्तराने मात्र सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.
“याचा अर्थ तुम्ही सगळे मान्य करता की तुम्ही एका innocent माणसावर चुकीचे आरोप केलेत.” वृषभ असं म्हणाला तोच इतका वेळ गप्प असलेला परेश एकदम म्हणाला, Innocent!?... आणि यश.. दिसतं तसं नसतं.. म्हणूनंच जग फसतं साहेब….”
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा