दाराची बेल वाजली तसं जुईलीने जरा घाईघाईतच दरवाजा उघडला. “एवढ्या सकाळी सकाळी कोण आलं?”,एका हातात चहाचा कप आणि कानाला फोन सांभाळत ती म्हणाली. समोर यशला बघुन तिला आश्चर्यच वाटलं.
“Ok Ok. I will call you later. Bye.”,फोन ठेवला,”What a surprise! Yash please come.”,जुईली यशला बोलली तसा यश घरात शिरला आणि सोफ्यावर जाऊन गप्पपणे बसुन राहिला. त्याच्या काहिच न बोलण्याने जुईली गोंधळली.
“अरे, बोल ना काहितरी. काय झालंय? असा गप्प का? अरे ऑफिस ला जायला late होतंय मला.”
“…”
“हे पाणी घे.”,जुईलीने दिलेला पाण्याचा ग्लास एका झट्क्यात रिकामा करुन यशने तो टेबलवर ठेवला.
“तू आज सुट्टी घे. मला बोलायचंय तुझ्याशी.”
“अरे काय बोलतोयस. असं लगेच सुट्टी मिळ्ते का? आणि अचानक एवढया सकाळी आलास?”
“तेच सांगायचंय. म्हणून म्हणतो सुट्टी घे. Please I need your help.”
“Ok..”, एक सुस्त्करा सोडून जुईली म्हणाली,” I will do something. Wait.”असे म्हणून तिने ऑफिस मधे कॉल करुन sick leave घेतेय असं सांगितलं.
“तू आधी नीट fresh होऊन घे. मी खायला बनवते काहितरी.” यशचा एकंदर अवतार बघुन जुईली म्हणाली तसा तो उठुन fresh व्हायला गेला आणि जुईली किचन मधे गेली.
थोड्याच वेळात दोघं हॉल मधे आले. जुईलीने गरम उपमाची प्लेट त्याला दिली.
“बोल आता. काय झालं?”
“जुईली मी पुरता अडकलोय गं?”, यश रडकुंडीला येऊन म्हणाला.
“अरे पण सांगशील का की नेमकं काय झालंय?”
“…. पोलिस मागे लागलेत माझ्या.”
“काऽऽय?.. पण का?”
“माझ्यावर बलात्काराचा आरोप केला गेलाय…”, असे म्हणून यशने आपले तोंड हाताने लपवले.
आणि तो ढसाढसा रडू लागला.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा