Login

शील - भाग 6

Hi. I am a new writer works in IT. I love to write and Express my feelings. Ira gives best platform to explore our talent. Thank you Ira . Please do like , share and comment. So that I can improve my writing.

यशच्या या बोलण्यावर काय प्रतिक्रीया द्यावी हे काही क्षण कळलंच नाही जुईलीला. मग थोड्या वेळाने जेव्हा यश जरा शांत झाला तेव्हा तिने विचारले,
“नेमकं काय झालंय? बलात्काराचा आरोप..!? नीट सांग बघू सविस्तर. त्याशिवाय मला तुला मदत करता येेेणार नाही. “ 
“ठिक आहे. सांगतो सगळं.” असं म्हणून यशने सांगायला सुरवात केली आणि जुईली देखील लक्ष देऊन ऐकू लागली.
“तुला तर माहितीच आहे की मी ज्या IT firm मधे काम करतो तिकडे आता मला जवळ जवळ 5 वर्षे झालीत आणि मला नेहमी clients ना भेटावे लागते कामानिमित्त. माझ्या कामावर खुश होऊन मला last year ला promotion पण मिळालं होतं. काही चांगलं output आलं तर आम्ही सगळे मिळून पार्टी करायचो. आमची ब-यापैकी टीम आहे जी प्रत्येक गोष्ट manage करते. जसं की clients मिळवणं, deals करणं. वर्क कम्पलीट करणं वगैरे…”
“आमच्या टीम मधे girls पण आहेत. आणि नुकतीच एक संध्या नावाची मुलगी इकडे जॉईन झाली होती. Actually It was a transfer from other branch so she has a enough experience to join as a team leader.  ती खुप बिनधास्त आणि bold आहे.”
“तर काल रात्री एक success पार्टी होती. संध्याच्या घरीच तिने सगळ्यांना यायला सांगितलं. सगळेजण पार्टी एन्जॉय करत होते. मीपण होतो त्यात. मी regular  ड्रिंक्स घेत नाही. पार्टी मधेपण  सहसा टाळतोच. असं नाही की कधी घेतलीच नाहिये. तर अचानक ड्रिंक्स साठी Competition सुरु झाली.”
“त्रिशा, पूनम, मयुरेश, नरेश, चिरंजीव असे सगळेजण त्यात होते. असं असलं तरी सगळ्यांना स्वत:ची limit माहीत होती. कोणीही भावनेच्या भरात वाहात नव्हतं. आपली capacity ओळखून सगळे लगेच बाजूला होत होते. असं असुनदेखील का कुणास ठाऊक, मी फक्त एकच घेतलेला व्हिस्कीचा पेग मला जड झाला. माझं डोकं दुखायला लागलं. म्हणून मग मी washroom  मधे फ्रेश व्हायला गेलो. आणि अचानक lights गेल्या. “
“काहिच दिसत नव्हतं. संध्याचा फ्लैट तसा ब-यापैकी मोठा आहे.  3BHK. Gallery आणि मोठया रूम्स. तर अंधारात मी चाचपडत होतो. आवाजाच्या दिशेने जायचा प्रयत्न करत होतो. Music  मोठ्या आवाजात चालू होते आणि सगळेजण विखुरलेले होते. त्यामूळे माझा गोंधळ उडत होता. मी passage मधून जात असताना अचानक मला oppsite साईड ने कसलातरी आवाज आला. मला वाटलं की असेल कोणी. ती एक बेडरूम होती. तेवढयात माझाच हात कशालातरी लागला आणि आवाज झाला. पण म्यूज़िक मुळे कोणाला समजलं नसेल. “
“माझा hangover वाढतोय की काय असं मला वाटत होतं. मी ब-यापैकी शुद्धीत होतो त्यावेळी.  मला तेव्हा हे माहीत नव्हतं की मी एका बेडरूम जवळ आहे. मी तिकडे दुर्लक्ष करुन पुन्हा म्यूज़िक च्या दिशेने जायचा प्रयत्न करु लागलो. मला तेवढयात चक्कर आली. शेवटी शेवटी कोणीतरी माझा हात धरला की काय एवढंच जाणवलं मला.”
“शुद्ध आली तेव्हा मी बेडवर झोपलेल्या अवस्थेत होतो. बेडची हालत खराब होती. आणि मला काही कळण्यागोदरंच एक मुलगी तणतणत माझ्या दिशेने आली आणि मला शिव्या देऊ लागली. ती म्हणत होती,” माझ्या आयुष्याचं वाटोळं केलंस तू. I will not spare you.  पोलिस येतीलंच इतक्यात. तुम्ही लोक समजता काय रे. मुलगी bold आहे तर available आहे….”. “
“हो. ती संध्याच होती. आता lights आले होते आणि मीपण पुर्णपणे शुध्दीवर आलो होतो. पार्टी तर कधीच थांबली होती. फक्त  4-5 जण थांबले होते जे तिच्या जवळचे होते. त्रिशा,कुमार,  नयना, परेश आणि स्वीटी. मला काही क्षण कळलंच नाही काय झालंय. तेवढयात त्रिशा म्हणाली, “You  raped her damm it. How dare you? “ नंतर बरेच जण बरंच काही बोलत होते. मी सुन्न झालेलो. मला काहिच ऐकू येत नव्हते. सगळ्यांनी पोलिसांची वाट बघायला सुरवात केली. “
“पोलिस येतील, आपल्याला पकडतील, केस होईल, मग नोकरी जाईल, काय उत्तर द्यायचं आईबाबांना. मला काहिच सुचत नव्हतं. आणि तेवढयात पोलिस आलेच. मला पकडून घेऊन  जाऊ लागले. ते दोनंच constable होते. गाडीजवळ आलो तसं मला वाटलं हिच वेळ आहे नाहितर मी पुरता अडकायचो आणि  जिकडे वाट मिळेल तिकडे मी पळत सुटलो.”

0

🎭 Series Post

View all