Login

शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी अर्थ meaning in marathi

शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी अर्थ meaning in marathi
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी अर्थ meaning in marathi >>

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word :शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी अर्थ

उच्चार pronunciation : शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी अर्थ

मराठीत अर्थ :
Meaning in Marathi
1. संत तुकाराम महाराज अभंग हे अभंगात बिज व फळ यांची उपमा देऊन सांगतात की बिच किड रहीत असेल तर त्यापासून झालेल्या झाडाचे फळही मधुर असते.
प्रत्यक्ष अर्थ
चारित्र्यवान कर्तव्यदक्ष संस्कारी पालकांच्या पोटी जन्माला येणारी मुले ही संस्कारी असतात.


मराठीत व्याख्या :-
तुकारामांच्या या अभंगातून आपल्याला प्रत्यय कळतो, की आई वडिलांचे संस्कार आणि ‌ नीती चांगली असेल तर त्यांच्या पोटी जन्माला येणारी मुलं ही देखील चांगलीच असतात.
बीज आणि फळे ह्या उपमा वापरून संत तुकारामांनी माणसाला उपदेश केला आहे सुजान म्हणून जगण्याचा.


Meaning in Hindi

संत तुकाराम महाराज के मुताबिक अगर बीज अच्छा हो तो उस पेड़ से अंकुरित होने वाले फल भी मीठे होते हैं .
इसका प्रत्यक्ष अर्थ यह होता है कि माता-पिता के संस्कारों का ग्रह का प्रभाव बच्चों पर पड़ता है अगर माता-पिता अच्छे संस्कार और नीति रखते हैं तो उनके यहां जन्म लेने वाले बालक भी वैसे ही संस्कारी बनते हैं ।

Definition in English :- 
Word to word meaning " Fruits with pure seeds are juicy and juicy "

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
सदानंद देशमुख यांचा मुलगा रवी आज पुन्हा दारू पिऊन गावातल्या तहसील कार्यालयासमोर लोकांशी वाद घालत होता.
असा एक दिवस खाली जात नसे जेव्हा रवी एक तर कुणाचा मार खाल्ला नसेल किंवा कोणाला मारून आला नसेल... छोटा कृष्णा जेव्हा घरी रवी बद्दल सांगायला आला तेव्हा शेजारच्या काकू देशमुखांना म्हणाल्या शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी ते काय खोटं आहे ....जसा बाप तसा मुलगा .


Synonyms in Marathi :-
Na

Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी
2. Definition of   शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी
3. Translation ofशुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी
4. Meaning of  शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी
5. Translation of   शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी
6. Opposite words of   शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी
7. English to marathi of   शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी
8. Marathi to english of   शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी
9. Antonym of  शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी


Translate English to Marathi, English to Marathi words.


शब्दावर आधारित लघुकथा :

तन्मय हा गावाच्या बाहेर घर असणाऱ्या विठ्ठल पंतांचा मुलगा.
त्याच्या वयाच्या मुला मुलींना जेव्हा कॉन्व्हेंट स्कूलमध्ये टाकण्यात आलं तेव्हा विठ्ठल पंतांना फार मोठी काळजी लागली होती, कारण घरी पुरेसे धनद्रव्य नव्हते.
विठ्ठल आणि त्याची पत्नी दोघे दिवस रात्र दुसऱ्यांच्या शेतात कबाड कष्ट करत पण तरीसुद्धा संसाराला जितके केले तितके कमीच आता मुलाला महागड्या शाळेत टाकायचे म्हटल्यावर खर्च भागणार कसा ?
या चिंतेत दोघे असताना मुलाने संध्याकाळचे दिवे लावून हरिपाठ म्हणायला सुरुवात केली आई बाबा दोघांच्याही डोळ्यात चमक उतरली.
तन्मय ने त्यांच्याकडे पाहून एक स्मित हस्य केलं.
चार वर्षानंतर फक्त नऊ वर्षाचा तन्मय आज गावाच्या मोठ्या मारुतीच्या मंदिरावर स्वतःचे कीर्तन सादर करत होता.
एवढ्या छोट्या वयातला कीर्तनकार अवघ्या पंचक्रुशीत कोणीच नव्हतं त्या दिवशीच कीर्तन इतका भव्य झालं याची दुसऱ्या हप्त्यात पुन्हा तन्मयच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आणि आता आस पासच्या गावची सगळी लोक तिथे जमली होती.
तन्मय चा मधुरा आवाज, त्याची तल्लख बुद्धी त्याच्या चेहऱ्यावरील तेज आणि बोलण्यातला सौम्यपणा सगळ्यांना भावून गेला.
विठ्ठल पंत आणि त्यांची पत्नी फार खुश होते कारण गावातल्या प्रत्येकाच्या तोंडात तन्मयचच कौतुक होतं.
त्यादिवशी तन्मयने सांगितलेला...अगदी सहा वर्षाच्या तन्मयने सांगितलेला निर्णय ,त्याच्या आई वडिलांनी मान्य केला तो असा की त्याला आळंदीला भक्ती सांप्रदायाची दीक्षा घ्यायला जायचे आणि तो तिथेच त्याचा शिक्षण सरकारी शाळेतून पूर्ण करेल.
परिस्थिती आणि मुलाची इच्छा दोन्ही बघून त्यांनी सुद्धा तो निर्णय मान्य केला कदाचित तन्मय इतक्या लहान वयात समजूतदार असणे हे त्याच्या आईवडिलांचे श्रेय म्हणजे आज संपूर्ण गावचे बोलत आहे की " शुद्ध बीजाच्या पोटी फळे रसाळ गोमटी ‌" ते अगदी खरे आहे विठ्ठल पंत आणि त्यांच्या पत्नीच्या आयुष्यभराच्या सत्कर्माचे फळ म्हणजे तन्मय.


शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग