आमची कॅप्टन - श्रावणी लोखंडे
लेखिका. स्वाती बालूरकर सखी
कुण्या एका व्यक्तीला प्रत्यक्ष न भेटता ही त्या व्यक्तीबद्दल ओढ वाटणे किंवा तिच्याशी /त्याच्याशी मैत्री होवू शकते ही खरेतर अशक्य वाटणारी गोष्ट आहे पण . . . असं घडत.
आभासी जगात सोशल मीडियावर हे घडणे , mesejss मधून जवळीक होणे वेगळे पण लेखकांची मैत्री केवळ शब्दांच्या माध्यमातून होणे ही वेगळी गोष्ट आहे.
ईरा ब्लॉगिंग सारख्या रायटिंग प्लॅटफॉर्म वरती असं बऱ्याच लेखकांना हा अनुभव असेल व त्या बऱ्याचजणांपैकी माझही कित्येकांशी असं झालेलं आहे त्यापैकी एक लेखिका म्हणजे श्रावणी लोखंडे!
ईरा ब्लॉगिंग वरती जॉईन झाल्यापासून शब्दांची मैफिल वर खूप वेळा श्रावणीचे स्पष्ट विचार आणि तिचे मेसेजेस वाचून तिच्याबद्दल एक ग्रह तयार झाला होता आणि नेमके 2022 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आमच्या ग्रुप मध्ये श्रावणी आली.
त्यावेळी तिच्याबद्दलचं माझं मत हळूहळू बदलत गेलं.
एकदा संघाचे पोस्टर बनवताना जेव्हा तिचा फोटो पहिल्यांदा पाहिला तेव्हा तिच्या इतक्या रोड असण्याचं खूप आश्चर्य वाटलं होतं.( विशेषतः माझ्यासारख्या स्त्रीला जी वजन कमी करण्यासाठी धडपडते आहे .)
आणि मग आमचा झिम्मा ग्रुप तयार झाला .
कॅप्टन राघव आणि आम्ही नवदुर्गा, आम्हाला तो मुलीच म्हणायचा. त्यातल्या मुली म्हणण्यासारखी मी नसेलही कदाचित पण श्रावणी वगैरे होती. त्यामुळे राघव आमचा भावड्या /मित्रा होता तर आम्ही त्याच्यासाठी पोरी होतो.
श्रावणी त्यावेळी ग्रूप वर तिने तयार केलेल्या स्वयंपाकाचे फोटो टाकायची, मला खूप आश्चर्य वाटायचं की इतका "छोटा पॅकेट बडा धमाका" इतकी रोड असून तिच्यात इतका स्टामिना कसा आहे ?
ती 50- 50 पुरणपोळ्या करते. खरच आदर वाटायचा . त्यावेळी त्यांनी एक नवीन स्नॅक्स सेंटर पण उघडलेले होते तेवढ्या सगळ्या व्यापातूनही ती लिहायची v वेळ काढायची त्याच खरच खूप आश्चर्य वाटायचं .
श्रावणी चे लिखाणाचे विषय सुद्धा खूप लेटेस्ट आणि ज्वलंत v बोल्ड असायचे .
त्या ग्रुपमध्ये राहताना छान पैकी मैत्रीचे संबंध जोडले होते. सगळ्यांना सगळ्यांचे स्वभाव माहित झाले होते त्यामुळे एक छान बाँड निर्माण झाल होता.
आजही त्या ग्रुपच्या बऱ्याच जणांना झिम्माग्रुप वरती येऊन बोलताना माहेरी आल्यासारखं वाटतं.
त्यानंतर आले तो ईरा ब्लॉगिंगचा गेट-टुगेदर.
मी खूप एक्साईटेड होते सर्वांना भेटण्यासाठी पण मला स्वराजला पाहायचं होतं. ग्रुप वरती त्याच्याबद्दल तिने टाकलेले मेसेज किंवा त्याचे ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप पाहून मला स्वराजला प्रत्यक्ष पाहण्याची खूपच इच्छा होती. श्रावणीने खरंच त्याच्यावर खूप छान संस्कार केलेले आहेत, वळण लावणं काय म्हणतात ते कळतं.
गेट-टुगेदर मध्ये श्रावणी ल प्रत्यक्ष पहायचं होतं.जेव्हा श्रावणी भेटली तेव्हा तर अगदी ती इतकीच लहान एखाद्या कॉलेजची मुलगी जणू असे वाटून गेले. मग ही बारकी मुलगी इतके मोठे मोठे विषय घेवून कथा कसे काय लिहिते, वेगवेगळे नवीन विषय कसे हाताळते असे वाटून गेले . ती फोटो पेक्षाही प्रत्यक्ष पाहिल्यावरती मला श्रावणी खूप आवडली ,तिचा बिनधास्त पणा, तिचं ते मुंबईकर असणं सगळच भावलेलं!
तिने' मी पुन्हा पुण्याला येणार नाही' हे म्हणताना ऐकून मला खूप हसू येत होतं.
त्यानंतर लगेच 2023 चॅम्पियन्स ट्रॉफी चे ग्रुप डिक्लेअर झाले आणि योगायोगाने श्रावणी आणि मी संघ तीन मध्ये एकत्र आलो.
या संघात मी, प्रशांत सर ,श्रावणी आम्ही तिघेजण प्रत्यक्ष भेटलेलो होतो, शिवाय कोमल जिला मी एकटी प्रत्यक्ष भेटलेली होती ती पण या ग्रुपमध्ये होती.
तर जेव्हा संघाचा कॅप्टन ठेरवयची वेळ आली होती तेव्हा कदाचित वय किंवा अनुभव पाहून त्यांनी माझे नाव घेतले, परंतु माझी खूप इच्छा होती की श्रावणीने किंवा प्रशांत सरांनी कॅप्टन व्हावे.
एकतर मी शिक्षिका आहे त्यामुळे शाळेच्या व्यापाने ग्रुपला किती वेळ देऊ शकेल हे सांगू शकत नव्हते आणि दुसरी गोष्ट म्हणजे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये संजना मॅडमनी मला कॅप्टन घोषित करून टाकलं होतं त्यामुळे माझ्या गाठीशी तो अनुभव होता .पण श्रावणीने हा अनुभव घ्यावा ही माझी खूप इच्छा होती.
श्रावणी बोलताना बेधडक, कधी-कधी तापट, पटकन राग येणारी किंवा खोटेपणा पाहताच भडकणारी किंवा वेळ पडली तर भांडायला किंवा भांडणे मिटवायला तयार अशी माझ्या मनात तिची इमेज होती.
त्यामुळे जर ती कॅप्टन झाली तर तिला सगळ्यांसोबत चालण्याचा एक अनुभव मिळेल आणि तिचा हा सुप्त गुण सुद्धा तिला कळेल अशी माझी इच्छा होती म्हणून मी तिला कॅप्टन होण्यासाठी खूप आग्रह केला आणि सगळ्यांनी ते मान्य केलं.
याक्षणी मी खरंच सांगते की चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघ तीन ची ती खूपच सोशिक, शांत आणि धैर्यशील कॅप्टन म्हणून उभी राहिली.
हे तिच्या स्वभावाच्या बाबतीत कदाचित विरुद्ध गुण असतीलही पण तिने हे सिध्द करून दाखवले की ती ही नेतृत्वाची भूमिका खूप छान वठवू शकते.
सगळ्यांना मदत करणे, सतत उपलब्ध असणे आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणे,डेडलाईन साठी रिमाइंडर देणे,चौकशी करणे, प्रोत्साहन देणे ही सगळी कामे श्रावणी करत होती, करत आहे. त्यामुळे आमच्या संघाची ही स्पर्धा खूपच स्मूथ किंवा सरळ -सरळ मार्गाने पूर्ण होते आहे असे वाटते आहे.
तिच्यासाठी माझ्या मनात आलेले पहिली जी टॅगलाईन आहे ती अगदी करेक्ट आहे -"छोटा पॅकेट बडा धमाका."
तिचे आत्मवृत्त वाचल्यानंतर मी दोन ते तीन दिवस तिच्याबद्दल खूप विचार करत होते.
बालपणीच आईविना पोरकी झालेली, लहानपण आजी सोबत घालवलेली, वडिलांवरती अतोनात माय असूनही प्रेमापोटी घर सोडून निघालेली बंडखोर श्रावणी ,नंतर संसारात पडून कशी सुगरण होऊन गेली. नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून तिने संसाराचा गाडा पेल ला .
जशी वेळ पडेल तशी कामे केली,शिक्षण सुटलं पण हर मानली नाही.
आताही ती लिखाणा सोबत स्वयंपाकाचा भार घेते आणि ऑर्डर्स घेऊन घराला हातभार लावतेच आहे, सासरच्या माणसाशी जुळवून घेत आहे.
मी प्रेमाला खूप आदर देते त्यामुळे तिने तिच्या प्रेमाला आदर देवून मान ठेवला व आवडत्या जोडीदाराबरोबर आनंदाने राहते आहे हे खूप कौतुकास्पद आहे.
या सुंदर व हळव्या श्रावणी शी तिच्या बाबांचा संवाद पुन्हा सुरू व्हावा, तिची सगळी छोटी -मोठी स्वप्न पूर्ण व्हावीत, तिने स्वयंपाकामध्ये उंची गाठावी आणि तिचं एक सुंदर डोलदार टुमदार घर होईल असा माझा तिला मनापासून आशीर्वाद आहे.
तिचे हे स्वप्न लवकरच होईल अशी खात्री मला आहे. श्रावणीला जाणून, तिच्याबद्दल लिहिण्याची संधी मिळाली त्याचा मला खूप आनंद झाला. अगदी अनोळखी व्यक्तीबद्दल लिहिण्यापेक्षा जिला मी किमान मेसेज मधून जाणते तिच्याबद्दल लिहिणं मला जास्त सहज व सुकर वाटलं.
श्रावणी तुला,स्वराजला आणि तुझ्या अहोना खूप खूप शुभेच्छा.
( तुझं स्वप्न लवकरच पूर्ण होईल त्या दिवशी मला बोलवायचं विसरू नकोस. म्हंजे झालं.)
©® स्वाती बालूरकर,सखी
दिनांक - १८.०८.२०२३.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा