संत गाडगेबाबा यांच्या समाज कार्य
संत गाडगेबाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी शेंडगाव तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथे झाला... गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील एक कीर्तनकार आणि समाज सुधारक होते... त्यांनी स्व इच्छेने गरिबांसारखे राहणीमान स्वीकारले होते... संत गाडगेबाबा नागरिकांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी विविध गावांमध्ये भटकट होते....
गाडगे महाराजांची सामाजिक न्याय सुधारणा आणि स्वच्छता या गोष्टींमध्ये जास्त रुची होती... विसाव्या शतकात झालेल्या समाजसुधारक आंदोलनामध्ये ज्या महापुरुषांनी सहभाग घेतला होता त्याच पैकी एक संत गाडगेबाबा ही होते... त्यांनी या आंदोलनात महत्त्वाचे योगदान दिले....
संत गाडगेबाबांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते.... त्यांच्या वडिलांचे पूर्ण नाव झिंगराजी राणोजी जानोरकर तर आईचे नाव सखुबाई झिंगराजी जानोरकर हे होते... संत गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाज सुधारक होते...
त्यांनी दिन दलितांची आणि पीडितांची सेवा करणे यातच त्यांनी आपले धर्म मानले होते.... त्यांनी आपल्या कीर्तनातून समाजातील रूढी परंपरा यावर टीका केली.... समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचे काम करत असतानाच त्यांनी स्वच्छता आणि चरित्रता याबद्दलही सांगण्याचा प्रयत्न केला...
संत गाडगेबाबा यांनी गोरगरीब , दीनदलीत यांच्यामध्ये असलेली अज्ञानता, अंधश्रद्धा , अस्वच्छता नष्ट करून समाज सुधारण्याचे काम केले...
" तिर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी l "
संत गाडगे महाराजांनी आपल्या कीर्तनामधून असे सांगत दीनदुबळे, अनाथांची, अपंगाची सेवा केली.... देवळात जाऊ नका, मूर्तीची पूजा करू नका, सावकारांकडून कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी - पुराणे, तंत्र –मंत्र, दैवी चमत्कार अशा निरर्थक गोष्टींवर विश्वास ठेवू नका अशी शिकवण त्यांनी समाजाला दिली....
माणसांमध्ये देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणगी च्या पैशांमधून रंजल्या गांजलेल्यां अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी धर्मशाळा, अनाथालय, आश्रम आणि विद्यालयाची सुविधा उपलब्ध केली.... डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी तर दुसऱ्या कानात फुटलेल्या बांगड्याची काच, एका हातात झाडू तर दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश होता...
समाजातील भोळ्या अंधश्रद्धा, जुन्या चालू रीती , रूढी परंपरा हे मिटवण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले... ' मी कोणाचा गुरु नाही आणि मला कोणीही शिष्य नाही ' असे ते कायम म्हणत होते.... गाडगेबाबा आपल्या कीर्तनामध्ये लोकांना हमखासपणे गुंतवून ठेवत होते आणि त्यांना तत्वज्ञान आणि शिक्षणाचे धडे पटवून देत होते.... आपले पूर्ण आयुष्य समाजासाठी वेचलेल्या या संत गाडगेबाबांचा मृत्यू २० डिसेंबर १९५६ रोजी वलगाव अमरावती येथे झाला...
अशा अनेक थोर संतांची संस्कृती आणि वारसा आपल्याला लाभला आहे हेच आपले भाग्य.....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा