Login

संत मुक्ताबाई विषयी मराठीतून माहिती || Information about Sant Muktabai

संत मुक्ताबाई विषयी मराठीतून माहिती || Information about Sant Muktabai
संत मुक्ताबाई विषयी मराठीतून माहिती || Information about Sant Muktabai || संत मुक्ताबाई sant Muktabai

लडिवाळ मुक्ताबाई | जीव मुद्द्ल ठायीचे
ठायीतुम्ही तरुण विश्व तारा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा

लहानपणी संतपरंपरेचा अभ्यास शाळेला असताना ह्या ओळी वाचल्या होत्या खूप छान विस्तृत असे एका प्रसंगाचे वर्णन होतं आणि त्या प्रसंगात मला माझी मुक्ताबाई भेटली.
जिथे संन्यास्यांची पोरं म्हणून समाज छळ करत असे, विविध गोष्टींवरून हिणवत असे भक्ती मार्गातील त्यांच्या कार्याची ही कोणाला तमा नसे अशा परिस्थितीमध्ये मुक्ताबाईचा ज्ञानदादा आत्मक्लेषाने स्वतःला घरात कोंडून घेतो आणि छोटी मुक्ता विनवणी करत आहे की घराचा दरवाजा म्हणजेच ताटी उघडा ज्ञानेश्वरा.
ती गोष्ट इतकी प्रभाव टाकणारी होती की बहीण-भावांचा वेगळाच नातं दाखवून गेली.
त्यावेळी चार भावंडांमधील सगळ्यात छोटी मुक्ता अगदी आपल्याच वयाची भासली होती.

वाढत्या वयासोबत मी तर मोठे झाले आणि माझ्यासोबत मुक्ताबाई सुद्धा मोठी झाली आता ज्या मुक्ताबाईंना मी ओळखते त्या संत श्रेष्ठ नारीशक्तीचा अद्भुत नमुना असणाऱ्या , संपूर्ण स्त्री जातीला अभिमान वाटाव्या अशा स्त्री संत आहेत.
ज्यांनी समाजाला भक्तीचा देणं दिलं.
त्या फक्त संतच नाही तरी उत्कृष्ट कवियत्री सुद्धा आहेत आणि याचा सर्वात मोठे उदाहरण म्हणजे स्वतःच्या ज्ञानदादाला घराचा दरवाजा म्हणजे ताटी उघडायला सांगताना त्यांनी केलेल्या संपुर्ण बेचाळीस रचना. त्यामधील दोन ओळी मी वर लिहिल्या आहेत.

आजच्या या लेखात आपण संत परंपरेतील सर्वात छोट्या पण बुद्धीने अतिशय चतुर आणि स्वतः सोबत तीन संत शिरोमणी असणाऱ्या भावंडाचा खरंतर सांभाळ करणाऱ्या संत मुक्ताबाई विषयी माहिती पाहणार आहोत.
काही माहिती त्यांच्या जन्माबद्दल आणि काही त्यांच्याविषयीच्या आत्मपरीक्षणाबद्दल.

महाराष्ट्राला अनेक संतांची अद्वितीय परंपरा लाभली आहे. त्यामध्ये एक मोठी जागा पुरुष संतांनी व्यापली आहे पण सोबतच संत जना ही मुक्ताबाई अशा स्त्री संतांची ही मोठी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते.
मुक्ताबाई Sant Muktabai म्हणजेच संत परंपरेतील जगप्रख्यात असणारा कुटुंब तिथे जन्माला आलेल्या,1279 मध्ये महाराष्ट्रातील आपेगाव त्या ठिकाणी संत मुक्ताबाईंचा जन्म झाला (Birth Place)
रुक्मिणीबाई ही त्यांची आई (Mother) व विठ्ठलपंत हे त्यांचे वडील( Father).

संत निवृतीनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते.
विरक्ती, ज्ञान, भक्ती आणि मुक्ती यांचे जिवंत स्वरूप असे या चारही भावंडांना म्हणजेच निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता असं म्हणायला काहीच हरकत नाही. साक्षात दिव्यत्वाची ही चार रूपे रुक्मिणी आणि विठ्ठलपंतांना आई वडील होण्यावर अभिमान वाटावा अशीच होती.

ऐतिहासिक माहितीनुसार रुक्मिणी बाई आणि विठ्ठल पंतांना समाजाने देहांत करावा अशी शिक्षा सुनावली होती.
आपण गेल्यानंतर किमान आपल्या मुलांना समाजाने छळू नये त्यांचा मोठ्या मनाने स्वीकार करावा म्हणून त्या दोघेही आई-वडिलांनी ती शिक्षा मान्य तर केली पण त्यानंतर ही परिस्थिती बदलली नाही त्यानंतर सुद्धा समाजाकडून चारही भावंडांना वाळीत टाकल्यागत शिक्षा भोगावी लागली.

खरंतर नशिबात आलेलो हे चार संतानरुपी दिव्यत्व सोडून रुक्मिणी बाई आणि विठ्ठल पंतांना या जगाचा निरोप द्यावा लागला. पण संत निवृतीनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव व संत मुक्ताबाईंचे या चार अपत्यांच्या रूपाने त्या दोघांनीही समाजावर आणि या मातृभूमीवर फार मोठे उपकार केले.

चारही भावंडांच्या उदरनिर्वाह करत असतानाच्या अनेक गोष्टी सांगितल्या आणि ऐकल्या जातात काही लोककथा आहेत काहींना साक्ष पुरावे देखील आहेत.
आई वडील नसताना छोटी मुक्ता म्हणजे घराची गृहिणी झाली.
स्त्रीला घर सांभाळणं शिकवावं लागत नाही तेच खरं.
चौघांपैकी सगळ्यात लहान असली तरी मुक्ता लवकर शहाणी झाली तिच्यातला समजूतदारपणा वाखाणण्याजोगा होता.

ताटीच्या अभंगांमध्ये मुक्ताबाई ज्ञानेश्वरांना सांगतात की जो खरा योगी असतो तो समाजाच्या छळाला नतमस्तक कधीच होत नसतो. आपल्यातील कमतरतांवर जो मात करतो आयुष्यात इतरांचा हित म्हणजेच सर्वप्रथम ठेवतो तो खरा योगी तो खरा संत या उपदेशानंतर संत ज्ञानेश्वर ताटी उघडतात आणि त्यानंतर ते भक्तिमार्गाला कधीच अडथळा येऊ देत नाहीत.
या सगळ्यांमधून मुक्ताबाईंच्या समजूतदारपणाचे पुरावे भेटतात.

आता मुक्ताबाईंना समजूतदार म्हटलंच आहे तर लोक कथांमधून आलेली एक फार सुंदर चांगदेव आणि मुक्ताबाईंची कथा हृदयाला स्पर्शून जाते.
चांगदेव फार मोठे तपस्वी संत ज्यांचा आयुष्य चौदाशे वर्षांचं.
पण तरी सुद्धा सांगदेवांना ईश्वर दर्शन झालं नव्हतं.
याबद्दल एक लोक कथा सांगितली जाते त्यातली तथ्यता मी तपासली नाही पण , चांगदेव इथले तपस्वी होते की ते त्यांच्या तपसाधनेने मृत व्यक्तीला ही जिवंत करू शकत होते एक वेळ असेच ते तपश्चर्यासाठी बसले असता त्यांच्या अवतीभवती मृतदेहांचा ढिग पडला छोटी मुक्ता आठ वर्षाची तिथून जात होती तेव्हा चांगदेवांच्या शिष्यांनी सांगितलं की आमच्या गुरुमध्ये इतकी ताकत आहे की ह्या सगळ्या जळलेल्या प्रेतांनाही ते जिवंत करू शकतात तेव्हा मुक्ताबाई म्हटलं एवढं सोप्पं काम !
हे तर मी सुद्धा करू शकते आणि जोडा ती हाडकं.
खरोखरच मुक्ताबाईंनी त्या सगळ्या मृत व्यक्तींना जिवंत केलं ते जिवंत होऊन आपापल्या घरी गेले जेव्हा सांग देवांची तपश्चर्या पूर्ण झाली तेव्हा त्यांनी शिष्यांना सूचना केला की इतक्या वर्षात इथे कोणीच मृत्युमुखी पडला नाही का ?
तर शिष्यांनी घडल्या प्रकार गुरूला सांगितला.
इतकी कमी असलेली पोर मुक्ता हे सगळं करते म्हटल्यावर चांगले भांडण राग आला तर तिला भेटण्यासाठी अजस्त्र वाघावर बसून गेले हे चारही भावंड भिंतीवर होते मुक्ताबाईंनी आदेश केला आणि त्यावर देखील अभंग सापडतात नंतर जेव्हा त्यांची भेट होते तेव्हा भेटीचा संदेश पाठवलेलं पत्र दाखवत मुक्ताबाई त्यांना म्हणतोय चांगदेवा १४०० वर्षे जगला.
पण पत्रात लहानांसाठी काहींनी मोठ्यांसाठी काय लिहितात हे अजून शिकला नाहीस गुरु नाही म्हणून विद्येचा तपश्चर्याचा फायदा नाही असं सांगत मुक्ताबाईंनी त्यांना 65 चा अर्थ समजावून सांगितला आणि खऱ्या अर्थानं मुक्ताबाई फक्त आठ वर्षांची छोटीशी मुक्ता त्यावेळी चांगदेवांची आध्यात्मिक गुरु बनली.
त्यांच्याविषयीची कृतज्ञता प्रकट करत चांगदेव म्हणतात "मुक्ताई करे लेइले अंजन"
यातून मुक्ताबाईंची श्रेष्ठता समजते.

मुक्ताबाईंच्या बालपणीची अजून एक सुंदर कथा आपल्याला ऐकायला मिळते ती म्हणजे विसोबा साठी हा गावचा प्रमुख होता तो या चारही भावंडांचा फार छळ करत असे.
एक वेळ चौघांची इच्छा मांडे खाण्याची झाली मुक्ताबाई मांडे भाजण्यासाठी खापर आणायला म्हणून गावात गेल्या पण विसोबाच्या आदेशावरून गावातील कोणीच त्यांना खापर द्यायला तयार झाले नाही.
आता मुक्ता म्हणजे त्या तिन्ही भावांची लाडाची बहीण त्यांचा हिरमुसलेला चेहरा पाहून ज्ञानेश्वरांना आणि इतरांनाही बरे वाटले नाही.
संत ज्ञानेश्वरांनी स्वतःच्या योगविद्येचा वापर करून स्वतःच्या पाठीचेच खापर बनवले आणि मुक्ताईना सांगितले की यावर भाजा मांडे.
आणि मुक्ताबाईंनी मांडे टाकले ते भाजतही आले हा सगळ्या प्रकार पाहून विसोबा ज्ञानेश्वरांना शरण गेले त्यांना त्या चौघांच्या योगविद्येची आणि त्यांच्या शक्तीची जाणीव त्यावेळी झाली.
त्याने देखील मोठ्या मनाने विसोबांना माफ केले जेव्हा पाठीवर भाजलेल्या मांड्याचा प्रसाद खाण्यासाठी विसोबा उतावीळ झाला आणि झडप घातली तेव्हा मुक्ताबाईंनी त्याला खेचर म्हणून हाक मारली एका पक्षाचं नाव पण मुक्ताबाईंकडून मिळालं म्हणून त्यानंतर विसोबा यांनी स्वतःच्या नावासोबत खेचर शब्द जोडून ते विसोबा खेचर झाले.

अशा अनेक प्रसंगांमधून मुक्ताबाईंच्या आणि चारही भावंडांच्या हातून चांगले कर्म घडत राहिले समाजाच्या उद्धाराचा काम घडत राहील. संत ज्ञानदेव जे संत परंपरेतील एक श्रेष्ठ संत म्हणून उदयास आले त्यांनी देखील मुक्ताबाईला आई समजून वागणूक दिली.

मुक्ताबाईंच्या आयुष्यात अशा अनेक प्रसंग आले अशा अनेक किसान मधून त्यांच्यातील समजदार स्त्री जगाने पाहिली भक्ती मार्गाचा एक वेगळाच उपदेश त्यांनी समाजाला दिला.
त्यांच्या उपकारांनी या भूमीमध्ये भक्तिमार्गाचा मळा प्रफुल्लित झाला.

अशा मुक्ताबाईंचा १२ मे १२९७ रोजी या जगाला निरोप मिळाला.
माहितीनुसार संत ज्ञानदेवांनी समाधी घेतली.
तेव्हा चौघांपैकी ज्येष्ठ बंधू असणारे निवृत्तीनाथ यांच्यासोबत मुक्ताबाई तीर्थयात्रा करण्यासाठी निघाल्या.
प्रवासात असताना ते तापी नदीवर आले.
आणि असे सांगितले जाते की तापी नदीच्या किनाऱ्यावर असताना अचानक वीज कडाडली आणि त्या प्रचंड विजेच्या प्रवाहात मुक्ताबाई लुप्त झाल्या आणि तिथेच त्यांचा अंत समजला जातो.

अशा श्रेष्ठ संत मुक्ताबाई जगाला करुणा ,समर्पण ,त्याग, भक्ती योग साधना तपश्चर्या आणि जगातील सगळ्यात सुंदर समजल्या जाणारी नारी हीच अलौकिक रूप दाखवतात.

अशा थोर संतांनी आपल्या या अखंड भारतभूमीला अभिमान भावा अशी कार्य केली आहेत भक्ती मार्ग रुपी एक ज्ञानाचा मार्ग दिला आहे अशा संतांच्या चरणी माझा त्रिवार नमस्कार.

संत मुक्ताबाई विषयी मराठीतून माहिती || Information about Sant Muktabai || संत मुक्ताबाई sant Muktabai

©®अंजली दिनकर औतकार
0