" तुला कधीही इच्छा होईल तेव्हा तू मला फक्त डेस्टिनेशन सांग, बाकी सगळं मी बघतो..... हो, पण प्लीज! आधीच मी खूप वर्ष वाट पाहिली आहे आता आणखीन जास्त वाट पाहायला लावू नकोस... " बोलताना मिस्टर विश्वास यांचाही कंठ दाटलेला असतो.... भार्गवी त्यांच्याकडे पाहते तेव्हा तिच्याबद्दलचा प्रेम त्यांच्या डोळ्यात उतरलेले असते आणि तिच्या भेटीची ओढ त्यांच्या शब्दांमधून तिला समजून येते.....
आत्ता पुढें,
भार्गवीला आज तिचं स्वतःचं घर परत मिळाल्यामुळे खूपच आनंद झालेला असतो... तो पूर्ण दिवस ते सगळे त्या घरातच राहतात... विश्वास यांच्या आई वडिलांनाही ते घर खूप छान वाटते... भार्गवी पुन्हा एकदा हक्काने आपल्या घरामध्ये स्वयंपाक घरात सगळ्यांसाठी छान स्वयंपाक बनवते... दीक्षा आणि मेघा दोघी पण तिची मदत करत असतात... बाहेर हॉलमध्ये बाकीचे सगळे एकत्र बसून गप्पा मारत असतात....
आज बरेच दिवसानंतर आपल्या घरी आल्यामुळे भार्गवीने अगदी मनापासून सगळ्यांसाठी जेवण बनवलेले असते... सगळे मिळून आनंदाने जेवण करतात... भार्गवी आणि मिस्टर विश्वास दोघेपण त्यांच्या बेडरूम मध्ये येऊन बसतात... भार्गवी बेडरूमच्या सगळ्या बाजूला पाहत असते... जेव्हा तिचे धर्मेश सोबत लग्न झालेले असते तेव्हा त्या लोकांनी त्यांचे काही फोटोज तिकडे फ्रेम करून ठेवलेले असतात परंतु आज मात्र त्या घरामध्ये कुठेही धर्मेशची कोणतीही आठवण तिला दिसून येत नाही त्यामुळे तिला थोडे आश्चर्य वाटू लागते...
" ज्या जुन्या आठवणींचा तुला त्रास होईल अशा कोणत्याही जुन्या आठवणी मी या घरामध्ये ठेवलेल्या नाही... त्यासाठीच मी या घराचा रंग आणि ज्या काही जुन्या आठवणी होत्या त्या चेंज केल्या..... हे घर तू स्वतःच्या मेहनतीच्या पैशाने घेतले आहे त्यामुळे या घरासोबत तुझ्या मनाच्या भावना जुळलेले आहेत... त्याव्यतिरिक्त आपल्याला अजून दुसरे काही नको... आपण आता आपल्या नवीन आठवणी या घरांमध्ये निर्माण करूया.... " मिस्टर विश्वास तिच्या चेहऱ्यावर असलेला प्रश्न समजून तिला उत्तर देतात....
" हो विश्वा, तुमच्यासोबत नवीन आठवणी बनवायला मला खूप आवडतील... आपल्या या आयुष्याला आपल्या या नात्याला शंभर टक्के देण्याचा मी प्रयत्न करेन... माझ्या स्वप्नातला राजकुमार जो मी इतकी वर्ष शोधत होते तो आज प्रत्यक्षात येऊन माझ्यासमोर उभा आहे... आता मात्र मला अजून काही नको.... " असे बोलत भार्गवी त्याच्या मिठीत शिरते....
" असे कसे काही नको.. अजून आपल्याला आपल्या आयुष्यात खूप काय मिळवायचे आहे ही तर आपल्या आयुष्याची सुरुवात झाली आहे आणि हो तुझ्या तोंडातून मला विश्वा ऐकायला खूप आवडले... आज पासून तुम्हाला विश्वा अशीच हाक मारायची.... " मिस्टर विश्वास तिला आपल्या मिठीत घट्ट कवटाळून हासऱ्या स्वरात बोलतात...
दीक्षा आणि सौरभ दोन दिवस त्यांच्यासोबत राहून परत आपल्या गावी निघून जातात... विश्वास याच्या आई वडीलही काही दिवस त्यांच्यासोबत घालून मग परत आपल्या घरी निघून जातात... आजीला मात्र विश्वास त्याच्या घरीच ठेवून घेतो.... मेघा अधून मधून भार्गवीला भेटण्यासाठी घरी येत असते...
हळूहळू त्या दोघांच्या नात्याची घट्ट वीण तयार होऊ लागते... भार्गवीच्या आयुष्यात घडलेला भूतकाळ पुसून विश्वास त्यांच्या दोघांची सुंदर भविष्य तिच्या मनामध्ये निर्माण करतात... भार्गवीच्या मनामध्ये ही त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण होऊ लागते... काही दिवसांनी भार्गवी समोरून त्यांना बाहेर फिरायला जाण्याचा विषय काढते.... यामुळे मिस्टर विश्वास खूपच खुश असतात.... ते दोघे मिळून स्वित्झरलँडला फिरायला जाण्याचा विचार करतात... सगळे बुकिंग झालेले असते... त्यांच्या घरात असलेली मावशी आज्जी ची देखभाल व्यवस्थित करत असते तरी देखील मेगाही अधून मधून आजीकडे येऊन काही दिवस राहते...
मिस्टर विश्वास आणि भार्गवी दोघेही पंधरा दिवसांसाठीच विचारलं छान पैकी फिरून येतात आपला हनिमूनही छान सेलिब्रेट करतात.... दोघेही एकमेकांच्या प्रेमामध्ये पूर्णपणे रंगून गेलेले असतात... मिस्टर विश्वास यांच्या सहवासामुळे आता भार्गवी परत पहिल्यासारखी हसत, खेळत , बोलत असते...
" भार्गवी तू तुझ्या भविष्याचा काही विचार केला आहे का ? असेच किती दिवस अजून घरात बसून राहणार आहे म्हणजे तू घरात बसली आहे याचा मला काही प्रॉब्लेम नाही , पण मला मनापासून असं वाटते की, तुझ्या या हुशारीचा काहीतरी उपयोग केला पाहिजे... तू पहिल्यापासूनच एक इंडिपेंडेंट मुलगी आहे आणि आताही तुला तसंच पाहिलेला मला आवडेल.... " एक दिवस सगळं कामावरून रात्री हे दोघे एकत्रच झोपलेले असताना अचानक मिस्टर विश्वास शांतपणे तिला विचारतात....
" खरं सांगू मलाही काहीतरी करायचे आहे पण काय करू ते समजत नाही..... हा मला निकम सरांनी ऑफर दिली होती पण माहित नाही का मला परत त्या ऑफिसमध्ये त्या पदावर जाणं योग्य वाटत नाही... तरीही तुम्ही एकदा सांगा ना मी काय करायला पाहिजे... तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर मी पाहिजे तर परत त्यांचं ऑफिस जॉईन करेल... " भार्गवी त्यांच्याकडे पाहून त्यांना विचारते....
" मी तुझ्यासाठी जो निर्णय घेईल त्यामध्ये तुला काही प्रॉब्लेम नसणार आहे ? " मिस्टर विश्वास शांतपणे तिच्या डोळ्यात आरपार पाहत विचारतात...
" नाही कारण मला माहित आहे तुम्ही जो काही निर्णय घेणार तो माझ्या मनाचा माझा विचार करूनच घेणार त्यामुळे तुमच्या निर्णयावर मला एक पसंत देखील शंका नाही.... " भार्गवी पण आत्मविश्वासाने त्यांच्याकडे पाहून त्यांना उत्तर देते....
" ठीक आहे , मग उद्या सकाळी लवकर उठून तयारीत रहा... आपण एका ठिकाणी जाणार आहोत ... " मिस्टर विश्वास हलकेच हसत तिला बोलतात तशी ती परत प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहू लागते.... परंतु ते मात्र तिला काही सांगत नाही...
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ते दोघे पण तयारी करून घरातून बाहेर पडतात.... भार्गवी मात्र आश्चर्याने पाहत असते नक्की त्यांनी काय ठरवले आहे हे तिलाही जाणून घ्यायचे असते....... त्यांच्या घरापासून काही अंतरावरच असलेल्या एका कॉपरेट बिल्डिंग जवळ येऊन त्यांची गाडी थांबते...
मिस्टर विश्वास गाडीतून खाली उतरताना दुसऱ्या बाजूने जाऊन भार्गवीच्या बाजूच्या दरवाजा उघडून तिला खाली उतरण्याचा इशारा करतात.... भार्गवी समोरच्या बिल्डिंग कडे पाहून खाली उतरते... मिस्टर विश्वास तिचा हात पकडून तिला त्या बिल्डिंगच्या आत मध्ये घेऊन येतात.... ते दोघेपण लिफ्ट मधून दहाव्या मजल्यावर येतात... समोर असलेल्या एका दरवाजावर मोठ्या अक्षरात BN Databricks असे नाव लिहिलेले असते...
मिस्टर विश्वास भार्गवीला तो दरवाजा उघडून आत घेऊन येतात.... आज निकम सर आणि काही नवीन एम्पलोयीज असतात... मेघाही असते....
" हे सगळं काय आहे ? " भार्गवी या प्रश्नार्थक नजरेने सगळ्यांकडे पाहून मिस्टर विश्वास यांना विचारते...
" मी गेल्या काही दिवसांपासून मिस्टर निकम सोबत काही गोष्टींवर चर्चा करत होतो त्याच्यावरून एका मोठ्या प्रोजेक्टसाठी ही कंपनी ओपन केली आहे या कंपनीमध्ये निकम सरांसोबत तू पार्टनरशिप मध्ये आहे हा तुझी पार्टनरशिप म्हणजे यामध्ये मी गुंतवलेला पैसा त्यामुळे तुझ्या पार्टनरशिप मध्ये पन्नास टक्के पैकी 20 टक्के माझा वाटा असेल तो वाटा तोपर्यंत असेल जोपर्यंत तू या कंपनीचे सगळे नियम समजून ती स्वतः स्वतः पद्धतीने हँडल करत नाही... एकदा का तू तुझी कंपनी पूर्णपणे टेक ओव्हर केलीस आणि मी गुंतवलेला पैसा मला परत कमावून दिला तर मात्र त्यामध्ये तुझ्या पार्टनरशिप चे सगळे शेअर हे तुझ्या नावावर झालेले असतील..... " विस्तार विश्वास भार्गवी कडे पाहून तिला सांगतात...
" आपल्या देशातील प्रत्येक नवरा जर आपल्या बायकोच्या मागे असा खंबीरपणे उभा राहिला तर कोणतीही स्त्री स्वतःला कधीच एकटे समजणार नाही.... मिस्टर विश्वास मी खरंच खूप नशीबवान आहे की माझ्या आयुष्यात तुमच्या सारखा माणूस जीवनसाथी म्हणून आला... तुम्ही माझा भूत काय तर पुसण्यात मला मदत केलीच त्याचबरोबर माझे भविष्य काय सुखाचा बनवण्यासाठी ही मेहनत करत आहात... खरच इतके दिवस मी माझ्या नशिबाला दोष देत होते पण मला माझ्या नशिबाने इतके चांगले फळ दिले आहे की आता भूतकाळात मिळालेल्या सगळ्या जखमा या सगळ्या पुढे काहीच वाटत नाही.... " भार्गवी आनंदाश्रू डोळ्यात घेऊन हळव्या स्वरात त्यांच्याकडे पाहून बोलू लागते...
" मिस भार्गवी.. तुम्ही या पार्टनरशिप साठी तयार आहात ना आता तर हे ऑफिसही तुमचे आहे त्यामुळे तुम्हाला हे ऑफिस तुमच्या पद्धतीने हँडल करायचे आहे... मी फक्त स्लीपिंग पार्टनर म्हणून इकडे असणार आहे माझं ते दुसरे ऑफिसच संभाळण्यामध्ये माझा पूर्ण दिवस जाणार आहे.... " निकम सर तिच्याजवळ येऊन तिच्याशी हात मिळवणी करत बोलतात....
समोर एक स्टॅंडर्ड असे केबिन बनवलेले असते आणि त्याच्यावर भार्गवीच्या नावाची नेमप्लेट लावलेली असते.... सगळेजण त्या केबिनमध्ये जातात आणि भार्गवीला तिच्या चेअरवर बसण्यासाठी विनंती करतात....
" आज माझ्या आयुष्यात जे काही सुखाला आहे ते तुमच्यामुळे त्यामुळे बसतानाही तुम्ही माझ्यासोबत असावे असे मला वाटते.... " भार्गवी त्यांचा हात पकडून त्यांनाही तिकडे घेऊन जाते....
" नवरा बायकोचं नातं हे जगात सगळ्यात अनमोल नातं असतं... एक मुलगी आपल्या आई वडील आपली फॅमिली आपलं सरनेम सगळं सोडून फक्त एका मुलावर विश्वास ठेवून त्याच्यासोबत चांगला तयार होते... मग त्या मुलाचही कर्तव्य आहे की, तिला तिच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये, ती जर आपला वंश वाढवण्यासाठी आपली मदत करणार आहे तर या आपल्या फॅमिलीचा ती एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे हे तिला वेळोवेळी सांगायला काहीच हरकत नाही.... तिच्या इच्छा पूर्ण करणे , तिच्या विचारांचा सन्मान करणे, हे प्रत्येक पुरुषाचे कर्तव्य आहे आणि मीही माझे कर्तव्य केले आहे वेगळे असे काही केले नाही...
मी तर असच बोलेल सगळ्या पुरुषांनी आपल्या जीवन संगिनीचा सन्मान करावा , तिच्या विचारांचा आदर ठेवावा , असे करण्याने त्यांचा संसार सुखाचा होईल, ज्या घरातली स्त्री ही आनंदी आणि समाधानी असते, त्या घराचे गोकुळ व्हायला वेळ लागत नाही....... " मिस्टर विश्वास आनंदाने तिच्याकडे बघून बोलत तिला तिकडे असलेल्या बॉसच्या चेअरवर बसवतात....
एक वर्षानंतर......
आज मिस्टर विश्वास आणि भार्गवी यांच्या नात्याला एक वर्षाच्या वर कालावधी झालेला असतो आणि त्यांच्या प्रेमाची गोड निशाणी म्हणजेच छोटी " विश्विका " त्यांच्या आयुष्यात आलेली असते आणि त्यांचं नातं अजून आनंदाने बहरून गेलेले असते...
समाप्त
*************************
( ही कथा सुरू करताना मला अजिबात वाटले नव्हते की या का त्याला इतका ही प्रतिसाद भेटू शकतो... या कथेचे इतके भाग होतील असेही मला वाटले नव्हते परंतु कथेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे भाग कसे वाढत गेले समजले नाही... तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे तुमच्या कमेंट्समुळे ही कथा लिहायला खूपच मदत झाली...
( ही कथा सुरू करताना मला अजिबात वाटले नव्हते की या का त्याला इतका ही प्रतिसाद भेटू शकतो... या कथेचे इतके भाग होतील असेही मला वाटले नव्हते परंतु कथेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे भाग कसे वाढत गेले समजले नाही... तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे तुमच्या कमेंट्समुळे ही कथा लिहायला खूपच मदत झाली...
कथेचा शेवटचा भाग लिहीत आहे असे अजूनही वाटत नाही.... या कथेने आपल्यामध्ये एक वेगळेच नाते निर्माण केले होते त्यामुळे कथा इतक्या लवकर संपवण्याची इच्छा नव्हती परंतु प्रत्येक गोष्टीचा कुठे ना कुठे शेवट हा होतोच आणि तो योग्य ठिकाणी झाला तरच छान वाटतो... ही कथा जरी इथं समाप्त झाली असेल तरी आपले नाते अजून समाप्त झाले नाही... मी पुन्हा एकदा नवीन कथा घेऊन तुमच्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी लवकरच उपस्थित होईल... तुमच्या आशीर्वाद असेच असूद्या..... आशा करते की, नवीन कथा घेऊन लवकरच आपली भेट होईल आणि तुम्ही त्या नवीन कथेलाही असाच भरभरून प्रतिसाद द्याल ....)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा