दोघी शांतपणे बसल्या.... घरातील वातावरण जणू एखाद्या निर्णायक क्षणासाठी तयार झालं होतं....
आत्ता पुढें,
हॉलमधली ती संध्याकाळ गंभीर होती... पंख्याचा आवाज, भिंतीवरील घड्याळाची टिक-टिक, आणि तिघांचं शांत बसणं जणू काहीतरी निर्णायक होणार आहे हे घरालाच जाणवत होतं...
आदित्यने हलक्या पण ठाम आवाजात बोलायला सुरुवात केली.... बोलताना तो आधी आपल्या आईच्या डोळ्यात पाहत बोलू लागला....
“आई, अन्विता… आपल्यातले तणाव मला दिसत आहेत... तुम्ही दोघीही माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहात.... पण गेल्या काही दिवसांपासून, एक गोष्ट वारंवार जाणवते आपण ‘कर्तव्य’ आणि ‘हक्क’ यामध्ये फरक ओळखायचा सोडून दिला आहे....”
आई शांतपणे त्याच्याकडे पाहत होती.... अन्विता जमिनीवर नजर लावून बसली होती.....
आदित्य ने एक नजर अन्विता कडे बघून आईकडे पहात बोलायला सुरुवात केली...
“आई, तुम्ही लहानपणापासून मला शिकवलं की कुटुंबासाठी जबाबदारी घ्यावी लागते.... ती तुमची शिकवण माझ्या रक्तात आहे.... पण आई, आजच्या काळात सगळ्यांना त्यांच्या स्वप्नांसाठीही वेळ आणि जागा लागते.... अन्विता घरासाठी जे करते, ते फक्त ‘कर्तव्य’ म्हणून पाहणं चुकीचं आहे.... ते तिचा हक्क आहे या घराचा भाग असल्याचा हक्क...”
सुमतीताई थोड्या भावुक झाल्या.... त्यांनी हळू आवाजात विचारलं,
“म्हणजे तुला वाटतं, मी तिला तिचं स्थान देत नाही?”
आदित्य “तुम्ही तिच्यावर प्रेम करता, पण कधीकधी बोलण्यातून असं जाणवतं की ती बाहेरची आहे... आई, ती तुमची सून नाही फक्त, ती तुमची मुलगी आहे.... जेव्हा तुम्ही तुमच्या सुनेला मुलीचा मान द्याल , तिला निर्णयांमध्ये सामील केलं, तिचं मत घेतलं तर तिला कर्तव्याबरोबरच आपलेपणाचा हक्कही मिळेल....”
आई गप्प राहिल्या, पण त्यांच्या डोळ्यांत ओलावा दाटला होता....
आदित्यने अन्वितेकडे वळून पाहिले, आता त्याने त्याचा पुढचा मुद्दा मांडला सुरुवात केली...
“अन्विता, मला माहित आहे, तुला दुख होतं जेव्हा आई तुझ्या मताला महत्त्व देत नाहीत... पण आईचं आयुष्य एक वेगळ्या पद्धतीने गेलं आहे... . त्यांची पिढी ‘कर्तव्य’ शब्दाला इतका मान देते की ‘हक्क’ हा शब्द त्यांना कधी कधी स्वार्थासारखा वाटतो.... तू जर त्यांच्या भावनेचा विचार करून थोडं संयम ठेवलंस, तर त्यांच्याही मनात तुझं स्थान वाढेल.... आपल्या आईच्या स्थानावर ठेवून तिचे बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यामध्ये हा दुरावा वाढणार नाही...”
अन्विताने हळूच मान डोलावली, “मी प्रयत्न करेन, आदित्य.... मला फक्त हे हवंय की मला इथे पाहुणी नाही, तर घरातील सदस्य म्हणून वागणूक मिळावी....”
आदित्य “मग असं करूया घरातले मोठे निर्णय आपण तिघं मिळून घेऊ... . आई, तुमचा अनुभव आपल्याला मार्गदर्शन करेल अन्विता, तुझं शिक्षण आणि नोकरीतून आलेला दृष्टिकोन नवे विचार देईल. आणि मी दोघांचं संतुलन राखीन.... ”
आईने हसत म्हटलं, “ठीक आहे रे. पण माझी एक अट रुचिराच्या लग्नाच्या वेळेस सगळ्या तयारीत तुझ्या बायकोला माझ्या बरोबरच पुढे राहावं लागेल....”
अन्विता हसून उत्तरली, “अट मान्य, आई....”
त्या क्षणी वातावरणातला तणाव जणू विरघळला.....
त्या संध्याकाळी रुचिरा कॉलेजवरून आली.... घरातल्या चेहऱ्यांवर हसू पाहून ती आश्चर्यचकित झाली....
“काय झालं? आज इतकी शांतता का नाही?”
आईने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, “तुझा भाऊ आमचं कोर्टचं काम संपवून आला आहे... . आता घरात हक्कही आहेत, कर्तव्यही आहेत, पण त्यात भांडण नाही!”
सगळे हसले....
सगळे हसले....
काही दिवसांनी, रविवारची सकाळ....अंगणात लिंबाच्या झाडाखाली चहा ठेवलेला होता.... . आई, आदित्य, अन्विता, आणि रुचिरा सगळे एकत्र बसले होते.... रुचिरा तिच्या प्रोजेक्टबद्दल सांगत होती, अन्विता नोकरीतील एक मजेशीर किस्सा सांगत होती, आणि आई मधे मधे तिच्या जुन्या आठवणी रंगवत होती.....
त्या क्षणी आदित्यच्या मनात विचार आला घर म्हणजे फक्त जबाबदाऱ्या पेलणं नाही, तर एकमेकांच्या हक्कांचाही सन्मान करणं आहे.... कर्तव्य आणि हक्क यांचा समतोलच नात्याला घट्ट करतो.....
त्याने हसत सगळ्यांकडे पाहिलं... . घराच्या हवेत आता ताण नव्हता, तर एक उबदारपणा, जिथे प्रत्येकाला आपलं स्थान होतं आणि तेच खरं कुटुंब होतं.....
घरात तील परिस्थितीचा समतोल राखण्यासाठी पुरुषांनाही तितकाच पुढाकार घ्यावा लागतो... सासू आणि सुनेमध्ये चालणारे हे मुख भांडण जर मिटवायचे असेल तर घरातल्या मुलाला त्याचं आई बद्दल असणार कर्तव्य आणि बायको बद्दल असणार कर्तव्य दोघांचा समतोल राखून त्या दोघींनाही त्या पद्धतीने समजावणे तितकेच गरजेचे असते तरच ते कुटुंब छान आणि सुरळीत पद्धतीने चालते...
---
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा