Login

सुनेच्या सुखासाठी

सुनेच्या सुखासाठी
सुनेच्या सुखासाठी

समोरच्या बाकड्यावर बसलेली स्मिता आणि पंकज आज खूप दिवसांनी सोबत ऑफिस मधून आले होते..

"आपण पहिल्यांदा एकाच वेळी एकाच ट्रेन मध्ये सोबत होतो योगायोग रे.."

"हो ग वाटत होतं आज तू दिसावी कुठे तरी ट्रेन मध्ये किंवा स्टेशन वर.."

"मनोमन वाटावे काय आणि मी दिसावी काय.. मला ही हेच वाटत होते पण काल ,परवा.. आज मनी ध्यानी नसतांना तू दिसावा काय आणि हाक मारावी काय.."

त्याने तिला हॉटेल कडे इशारा करत सांगितले ,"बसायचे का ?"

"पंकज घरी आई एकट्या आहेत,त्या वाट बघत असतात रोज आपण उशिरा पोहचतो तर आज जसे आपल्याला सुखद धक्के बसले एकमेकांना पाहून तसा त्यांना ही देऊ एक धक्का..आनंद.. आणि मग येऊ फिरत फिरत.."

स्मिता कडे बघून वाईट ही वाटले ,मन नाराज ही झाले पण ती म्हणते ते अगदी खरे ही होते..तिला जितकी आई समली तितके तिचे एकाकीपण समजले होते म्हणूनच तिला आवडणाऱ्या कॉफी शॉप मध्ये न जाता तिने नवऱ्याचा हा वेळ स्वतःसाठी न देता सासूबाई साठी द्यावा हे ठरवले...ती लगेच त्याचा हात पकडून गाल गुचे पकडत त्याचा मूड पुन्हा पहिल्या सारखा खुश खुश केला..

"मला काय म्हणायचंय की तू धक्के म्हणाली त्यापेक्षा सुखद सरप्राईज देऊ म्हणाली असतीस तर बरं झालं असते..धक्के हे आपण आपल्याला देत जाऊ..आईला मी किंवा तू सासूबाईला धक्के देणे योग्य नाही.."

तो गम्मत करत होता तसा तिने मुद्दाम धक्का दिला..

तो पडणार होता तिक्यात त्याला सावरत ती म्हणाली बघ अजून देऊ का ,हा बास होता..

"हा काय खेळ आहे का ?"

"तूच तर म्हणालास धक्के आपण आपल्यात देत जाऊ मग दिला ना..आणि इतक्यात तू पडलास.."

"हेच कर धक्के दे ,आणि सावर..आणि मी सावरते म्हण.." त्याने तिला जवळ घेत तिचे गाल ओढले..आणि दोघे सोबत चालू लागले..

"आज जसे भेटलो तसे ठरवून भेटत जाऊ.." ती

"मग आज जशी आली तशी मज्जा नाही येणार."

"Ok मग असेच तू चुकीने भेट ,मी ठरवून भेटते."

तितक्यात दोघे समोरून गप्पा गोष्टी हसी मजाक करत जातांना मेघे काकूंनी पाहिले आणि तिला ते बघून त्यांचा तो पांचट पणा वाटला ,त्यांना वाटले हे काय असे वागत आहेत ,त्याला कळत नाही ठीक पण हिला कळू नये का..? लोक बघतात..नाव ठेवतात..आणि नाव बदनाम होते ते वेगळे..मुलं काय शिकतील हे प्रकार बघून..हिच्या सासूबाईला सांगावे लागेल..

इकडे आज हे घरी पोहचले होते ,दोघांना ही खुश बघताच आई खुश झाली होती ,काल जणू काही भांडण झालेच नाही असे वाटत होते..नाहीतर वाटत होते आता पुन्हा टोक गाठतील.. पण जर मी स्मिताला वेगळे घेऊन सांगितले नसते तर दोघे असे हसत आले नसते...आणि माझ्या मुलाची कान उघडणी केली नसती तर त्याला झाल्या गोष्टी मध्ये स्वतःची चूक कळली नसती..म्हणूनच आज हा योग मी जुळवून आणला होता ,आणि त्यामुळे दोघे घरात हसत आले ..मी ह्याला फोन करून विचारून घेतले हा कधी निघतो तसेच तिला त्याच्या वेळे नुसार निघायला सांगितले..आणि दोघे सोबत आले..पण ह्यांना माहीत ही नाही..पण जरा जुळण्यासाठी मला थोडी तसदी घ्यावी लागेल..आणि मी घेईल

"आई काय मनात हसतेस ? "

"तुम्ही हसत आहात मग मी ही हसून घेते..बेहती गंगा में हात धावून घेते.."

आईला दोघे ही सांगत होते ,की बाहेर मस्त थंड वातावरण आहे ,आपण कॉफी घेऊन येऊ..तुझा मूड बरा होईल..आणि मस्त नाटक बघून येऊ..त्यात आई म्हणाली

"अरे माझे गुढगे दुखत आहेत तर तुम्ही जा कॉफी घेऊन या..नाटक बघून या..तसे ही तिथे ac असेल तो सहन होत नाही..मी आपली बसते मेघे काकू कडे.."

दोघे खूप आग्रह करून थकले पण त्यांना आईने कॉफी आणि नाटक दोन्ही बघायचा आग्रह केला होता..शपथ दिली होती..तिला तर म्हणाल्या ,तुला माझा आंनद कश्यात आहे जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही दोघे आहात ,तुमचे हसते चेहरे आहेत..आणि तुमचा आनंदाचा हरेक क्षण हा माझा आंनद आहे..सासू आहे पण सासू म्हणून का वागत नाही हे त्या मेघे काकू विचारत, तर त्यांच्या घरात सासू म्हणून त्या जेव्हा वागत असतात तेव्हा त्यांना मुलं सुना कंटाळतात..तेव्हा त्यांना ते सहन करू शकत नाहीत..ते त्यांची तक्रार माझ्या कडे करतात..आणि तेव्हा कळते की सासू होण्यात जो आंनद नाही तो सुनेच्या सुखावर आपल्या मुलाच्या सुखा इतकेच जीवापाड प्रेम करावे..त्याला जे मिळते ते तिच्या कडून मिळते...मग तिला मिळू नये पण त्याला मिळावे म्हणाऱ्या आईच्या वाट्याला मुलाचे ही प्रेम दुर्लभ होते.."

आईने आज मेघे काकूंचे दुःख सांगितले ,तरी मेघे काकू अश्या एकमेव आहेत की ज्यांना स्वतःच्या सुनेचे तर सुख बघवत नाहीच त्यांना इतरांच्या सुनेचे ही सुख बघवत नसत..कोणाला नवऱ्या सोबत खुश पाहिले की तक्रार सुरू होत..पण त्यांची आता सासूबाईला सवय झाली होती ,त्या म्हणत असुदे माझी सून खुश..मीच म्हणते इथल्या सासवांना जळवण्यासाठी थोडी खुश रहात जा..

हे म्हंटल्यावर मेघे काकूंना कळते हा टोमणा माझ्या साठी होता..पण तरी एक सवय झालेली असते अश्या लोकांना ,किती ही कळत असले तरी इतरांचे सुख बघवत नसते...सासू इतकी भिनलेली असते की आपण ही स्त्री आहोत हेच विसरतात..
©®अनुराधा आंधळे पालवे