Login

स्वछंदी मन

बालपणीच्या आठवणी व स्वछंदी मन सांगणारी कविता

मधुसिंधू काव्य

शीर्षक:- स्वछंदी मन

लहानपण
छान भातुकली
हाती ती बाहुली
रम्य ते क्षण

किती त्या खोड्या
भावंडांशी मस्ती
पाण्यात सोडती
कागदी होड्या

तो रानमेवा
खाऊ होता मस्त
होते सर्व स्वस्त
तो काळ तेव्हा

आजीचे प्रेम
गोधडी ऊबेची
चव त्या हाताची
तिचे ते नेम

स्वछंदी मन
हरवून गेले
डोळे पाणावले
आठवे क्षण