भाग-१
"आई... मला या गावात अडकून राहायचं नाही गं. मला माझं आयुष्य माझ्या मर्जीने जगायचंय."
राधाचा आवाज हलकासा थरथरत होता, पण डोळ्यांत मात्र एक ठाम निश्चय चमकत होता. त्या नजरेत केवळ बंडखोरी नव्हती; तिथं एक नि:शब्द प्रश्न दडला होता"मी ठरवलंय, आई. आता मागे वळून बघायचं नाही."
आई काही क्षण गप्प राहिली. हातातला चहाचा कप तसाच थिजून गेला. कपातून उठणाऱ्या वाफेसोबत तिचं मन कुठेतरी विरघळून गेलं होतं. कदाचित त्या दिवसांत, जेव्हा तिनं स्वतःची सगळी स्वप्नं गाडून टाकली होती, फक्त मुलांच्या भविष्यासाठी.
राधानं पुन्हा हळू आवाजात सांगितलं,"आई, मला माहित आहे तू आमच्यासाठी किती केलंस. स्वतःच्या इच्छा बाजूला सारून आमचं आयुष्य उभं केलंस. पण माझ्या मनातही एक स्वप्न आहे. ते असंच मरून जाऊ देऊ शकत नाही."
घरभर शांततेचं गडद जाळं पसरलं. भिंतींवर घड्याळाचा टिक-टिक आवाजसुद्धा आज वेगळा वाटत होता. त्या शांततेत आईच्या मनातील असंख्य प्रश्न, चिंता, काळजींचं वादळ फिरत होतं.
राधाची नजर आपोआप आजीकडच्या खोलीकडे वळली. कपाटावर ठेवलेला बाबांचा फोटो मंद दिव्याच्या उजेडात उठून दिसत होता. बाबांचं हसणं नेहमीसारखंच होतं, पण आज त्या डोळ्यांतून जणू एक नि:शब्द प्रश्न पडला होता
"राधा, तुझा निर्णय खरोखर इतका पक्का आहे का?"
"राधा, तुझा निर्णय खरोखर इतका पक्का आहे का?"
त्या जुन्या घराच्या भिंतींमध्ये कितीतरी आठवणी गुंतून होत्या.
सकाळी आईचा देवाच्या जपाचा मंद स्वर, गॅसवर उकळणाऱ्या दुधाच्या वासात मिसळलेलं वाचनाचं ताणलेलं मन, भावासाठी स्वतःचा हिस्सा लपवून ठेवणारी आईची हातची उब सगळं काही जिवंत झालं होतं.
सकाळी आईचा देवाच्या जपाचा मंद स्वर, गॅसवर उकळणाऱ्या दुधाच्या वासात मिसळलेलं वाचनाचं ताणलेलं मन, भावासाठी स्वतःचा हिस्सा लपवून ठेवणारी आईची हातची उब सगळं काही जिवंत झालं होतं.
राधाच्या डोक्यात एकामागोमाग एक चित्रं तरळू लागली शाळेच्या फिससाठी घेतलेलं अजून न फेडलेलं कर्ज, आईच्या तब्येतीवर येणारा रोजचा नवा ताण, आणि अजूनही लहान भाऊ पाठीवर दप्तर लटकवून शाळेकडे धावत जाणारा.
सगळंच जणू मनाला ओढत होतं,
"थांब गं, अजून थोडं थांब पुन्हा विचार कर."
सगळंच जणू मनाला ओढत होतं,
"थांब गं, अजून थोडं थांब पुन्हा विचार कर."
पण आज राधाच्या डोळ्यांत हट्ट नव्हता. तो बंडखोरीचा ज्वालामुखी नव्हता.
होता तो एक शांत, खोलवर रुजलेला निश्चय.
तिक मन आतून कुजबुजत होतं"या वेळेस मी माझ्यासाठी चालणार. या वेळेस माझं स्वप्न कुणासाठीच थांबवणार नाही."
होता तो एक शांत, खोलवर रुजलेला निश्चय.
तिक मन आतून कुजबुजत होतं"या वेळेस मी माझ्यासाठी चालणार. या वेळेस माझं स्वप्न कुणासाठीच थांबवणार नाही."
आईनं हळूवार कप टेबलावर ठेवला. तिच्या डोळ्यांतून एक न उलगडलेलं भावविश्व चमकलं राधाबद्दलचं प्रेम, काळजी, आणि कदाचित थोडी भीतीही. पण त्या शांततेत राधाला आईच्या मनातलं सगळं वाचता आलं.आजचा संवाद संपला नव्हता तो आता सुरू होत होता.
कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा.जान्हवी साळवेला फॉलो करा पुढील भाग मिस होऊ नये म्हणून!तुमच्या प्रतिक्रिया, शब्द, प्रेम माझ्यासाठी अमूल्य आहेत. कथा लेखनाधिकार जान्हवीकडे सुरक्षित. कृपया नावासह शेअर करा. लेखन चोरणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.
-जान्हवी साळवे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा