"रोहन मला नोकरी करणारी सून नको, बाकी तू कशीही शोध.. जात, पात, धर्म, रंग काहीही अट नाही माझी..फक्त तिने नोकरी करायला नको.."
"म्हणजे जात धर्म वेगळा चालेल पण नोकरी नको? तुझं तर भलतंच आपलं.."
"होय, तू अशी सून घरात आण, मग तिला मी एक कामही करू देणार नाही, आयतं हातात देईन.."
"मग ती नोकरी करणार नाही, घरातली कामं करणार नाही..मग करणार तरी काय ती?"
"काहीही करूदेत..पण माझी ही अट शेवटची.."
रोहन डोक्यावर हात मारून घेतो.. त्याच्यापुढे मोठा पेच उभा राहतो.. त्याची प्रेयसी राधा..खूप महत्वाकांक्षी आणि स्वाभिमानी मुलगी. दोघांमधील प्रेम इतकं उत्कट होतं की दोघेही एकमेकांशिवाय दुसऱ्या कुणाचा विचारही करू शकत नव्हते.
रोहनला मोठा प्रश्न पडला. एकीकडे राधा लग्नासाठी घरी बोल म्हणून मागे लागली होती आणि दुसरीकडे आईची ही अट तिच्यापुढे कशी मांडावी हे त्याला समजत नव्हतं.
पण आता शांत राहून चालणार नव्हतं, राधाला आईची ही अट सांगावीच लागणार होती. संध्याकाळी तिने भेटायला बोलावलं.
कॅफेमध्ये दोघेजण बसले. राधा तिच्या नवीन नोकरीवरून खूप खुश होती, ती तेच सांगत होती..
"अरे रोहन, तुला माहितीये मला आधीच्या कंपनीपेक्षा या कंपनीत दुप्पट पगार मिळतोय.मी खूप खुश आहे, आता बघ असं काम करेन की इथेही पटापट प्रमोशन मिळेल मला. तुला मी एकदा म्हणाले होते बघ, की माझं एक स्वप्न आहे..मला स्वतःचं एक छोटंसं का असेना घर घ्यायचं आहे...ते आता लवकरच पूर्ण होणार असं वाटतंय.."
*****
*****
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा