Login

हिमानी भाग 3

I like to read.

हिमानी भाग  3

(सादर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.)

हिमानीचा रिझल्ट समजल्यावर  तिचे आई ,बाबा , आजोबा भेटायला आले होते.सोबत रीमा व सोहन पण होते. सगळेजण खूप खुश होते.हिमानी दोन वर्षांनी  सर्वाना भेटली होती.

काकूंची बहीण म्हणजे अनुची मावशी आणि काका पण आले होते. सोबत त्यांची दोन मुलं   राहुल आणि सागर होते.  मावशी त्याच सोसायटी मध्ये  दोन बिल्डिंग सोडून राहत होती.या दोन वर्षात हिमानीची सगळ्यांबरोबर खूप छान बॉंडिंग झाली होती.
राहुल लॉ च्या 2nd इयर ला होता .सागर आणि ती एकाच वयाचे होते.तो पण 12th  फर्स्ट क्लास मध्ये पास झाला होता.
पाच जणांची टीम झाली होती. हिमानी, अनन्या,अश्विन राहुल आणि सागर.  कधीतरी रेवतीताई पण असायची.

आज खूप दिवसांनी घर माणसांनी भरलं होत.
जेवून झाल्यावर सगळे निवांत हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते.

"हिमानी,  उदया काकांबरोबर  जाऊन बी एड . चा फॉर्म घेऊन ये. ठीक आहे".बाबा
"बाबा, मला बी.एड. नाही करायचंय."हिमानी हळूच खाली मान करत म्हणाली.तिला वाटलं बाबा आता तिला ओरडणार.

"मग काय करायचंय. "बाबांनी शांतपणे विचारले.खरतर त्याना तिला घेऊन जायचं होतं.पण आता तिची पुढे शिकण्याची जिद्द पाहता ते गप्प होते.

"बाबा मला  ग्रॅज्युएशन करायचंय . BBA करायच ठरवलंय."हिमानी
"नंतर  पुढे  अजून माहीत नाही.बाबा प्लिज हो म्हणा ना."हिमानीने चेहरा छोटा केला.

"ठीक आहे. पण नंतर तुला जे काही करायचंय ते तिकडे  करायच.आताच तुझ्यासाठी स्थळ येताहेत." बाबा

"दादा ,ती एव्हडी बोलतेय तर . हो म्हण की. तुझ्या शब्दाबाहेर आहे का ती.समजून घे.कधी कुठला हट्ट करत नाही. काही मागत नाही."भास्कर काका

ठीक आहे. पण फक्त अभ्यासच करायचा,नाहितर मोठ्या कॉलेज तिथली मुलंमुली बघून तस वागायचं नाही.चुकूनपन कोणतीच चूक नाही व्हायला पाहिजे,लक्षात ठेव. "बाबा थोडासा आवाज वाढवून बोलले.

हो, बाबा मी लक्षात ठेवेन.मला तुमची काळजी कळतेय.मी अस काही करणार नाही जे तुम्हाला आवडणार नाही.फक्त  अभ्यासच करेन." हिमानी
हिमानीला खूप आनंद झाला होता. तिला आता तिच्या मनासारखं शिकायला मिळनार होत. बाबा पण हो म्हणाले होते.
"झालं ना तुझ्या मनासारखं,खुश आता" आई
"हो आई, थँक्स सगळं तुझ्या मुळे आणि बेस्टी आजी मुळे झालंय."हिमानी

थोड्यावेळाने हिमानीला घेऊन आई किचन मध्ये आली.
"मनू हे घे.तुझ्या बेस्टी ने दिलंय." आईने तिच्या हातात एक बॉक्स दिला.
"अरे वा, बघू"  म्हणत तिने तो बॉक्स घेतला.
त्यात एक हार्ट शेप मध्ये H अक्षर पेंडंट असलेली गोल्डन चैन  होती. त्याबरोबर एक चिठ्ठी होती.
डियर हिमु ,
"कशी आहेस.तुझ्या यशाबद्दल तुझं खूप अभिनंदन.आणि हे छोटस गिफ्ट.  लगेच घाल  आणि मला दाखव. उगाच मला नको वैगरे बोलून परत करू नको.
हा माझा आशीर्वाद आहे. काळजी घे. "
तुझीच बेस्टी.

तिने लगेच ती चैन गळ्यात घातली. आणि  बाहेर येऊन सर्वाना चैन दाखवली.
"मनू आजीला कॉल करून थँक्स बोल."बाबांनी त्यांचा फोन तिला दिला.
तिने पटकन 2 ते 3 वेळा फोन लावला पण फोन उचलत नव्हती. तिचा चेहरा पडला.
"काय ग, काय झालं"आई
"अग ती फोन उचलत नाहीये"हिमानी
एक काम कर माझ्या फोन मध्ये रुद्राक्ष चा नंबर आहे. त्याला कॉल कर." बाबा
ठीक आहे .म्हणत ती फोन लावतच मोबाइल नेटवर्क मुळे ग्यालरीत गेली.
पहिल्या रिंगमध्येच फोन रिसिव्ही झाला.
  "हॅलो,रुद्राक्ष पाटील हियर "एक भारदस्त आवाज कानावर आला.
  "हॅलो, मला आजीशी बोलायचं.प्लिज तिला फोन देशील का. ती फोन उचलत नाहीयेत."
  "कोण बोलतंय."रुद्राक्ष
   "मी हिमानी बोलतेय. सॉरी तुला डिस्टर्ब केल."
   डिस्टर्ब तर केलंच आहेस.जरा होल्ड कर ,मी आजीला   
   फोन देतो."
   "हिमु कशी आहेस बाळा ,अभिनंदन खूप छान मार्क्स मिळाले.गिफ्ट आवडलं का?"
"हो आवडलं ,थँक्स फॉर द गिफ्ट. तुझी खूप आठवण येते आहे.
दोघीही भरभरून बोलत होत्या.खूप दिवसांनी असा बोलण्याचा योग आला होता.
शेवटी  रुद्राक्षने आजीच्या हातातून फोन काढून घेतला.
   "हॅलो मकडीन,किती बोलते ग चल फोन ठेव आता.मला              काम आहे. आणि  हो अभिनंदन ".बोलून पटकन त्याने फोन कट केला.
तिला दोन सेकंद कळलंच नाही. ऐकून पण नाही घेतल लगेच ठेवला पण.
अजून तसाच आहे. रुक्ष रागीट चिडका .

दुसऱ्या दिवशी आई बाबा आजोबा आणि  रीमा ,सोहम गावी निघून गेले.
_______________
हिमानीने रेवतीताई बरोबर जाऊन कॉलेज ऍडमिशन करून घेतलं.  बरोबर मोहिनी होतीच. पुन्हा एकदा त्या दोघी एकाच क्लास मध्ये होत्या.
शहरातलं बेस्ट कॉलेज होत.तिला तर खूपच आवडलं. अश्विन दादा पण त्याच कॉलेज ला होता.
फक्त त्यांची कॉलेज ची वेळ वेगळी होती. तीच कॉलेज सकाळी होत.
सकाळी कॉलेज आणि दुपारी रेवतीताईकडे ट्युशन  मग संध्याकाळी काकुला जमेल तशी घरात मदत आणि अभ्यास असा तिचा  दिनक्रम चालू होता.
कॉलेज सुरू होऊन दोन महिने झाले होते. ती ट्युशन वरून निघत होती .
हिमानी,मला जरा तुझ्याशी बोलायचं होत."रेवती
हा,बोल ना ताई
"तू इथून गेल्यावर संध्याकाळी काय करतेस."रेवती
"काही खास नाही ग अभ्यास तर माझा सगळा इथेच होतो. मग थोडस काकुला मदत करते.आणि काकू समोर परत थोडासा अभ्यास करते."
"म्हणजे तशी तू फ्री असतेस. मग संध्याकाळी  जॉब करशील 5 ते 8. "
"जॉब कुठे, काय मला कस". हिमानी गोंधळून विचारलं.

"अग , थांब की जरा. आधी माझं नीट एक. आपल्या सोसायटीच्या बाजूला ती पॅथॉलॉजी लॅब माहितेय.
तिथे माझी मैत्रीण  आहे.  ती तिथे काम करते पण ती 6 महिन्यांसाठी सुट्टीवर  जाणार आहे .
तर त्यांना 12th पास आणि बेसिक कॉम्पुटर येणारी मुलगी हवीय.  त्यांची बिल्स आणि रिपोर्ट वैगरे बनवायला. सॅलरी पण ठीक आहे. फक्त 6 महिने , तेव्हढाच तुला अनुभव मिळेल.
तू करशील का?जास्त लांब पण नाहीये.
हवं तर आधी आपण जाऊन बघूया. मग तू काकांशी बोल. किंवा आधी काकांशी बोल.आणि मला उद्या सांग."
"चालेल मी आजच काकांशी बोलते."हिमानी

---------------------------
क्रमशः

कथेचा भाग कसा वाटला नक्की सांगा.














 

0

🎭 Series Post

View all