Login

हिमानी भाग ८

I Like To Read

हिमानी भाग 8

( कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.)

"ती तुझी आई आहे,होती."बाबा
हिमानी ने एकदा तिच्या आईकडे बघितलं,
तर त्यानी हो म्हणत मान हलवली.
सगळ्या मुलांचे गोंधळलेले चेहरे बघून बाबांनी सांगायला सुरुवात केली.
"आमची लहान बहीण होती. आमची परी गोरीपान नाजूक, घारे डोळे, छोटस नाक,अगदी नावाप्रमाणेच कोणालाही आपल्या स्वभावाने सहज मोहित करेल अशी मोहिनी."

कॉलेज पूर्ण झाल्यावर बाबांनी तिच्यासाठी स्थळ बघायला सुरुवात केली. तिने तिचा जोडीदार आधीच निवडला होता, अगदी आम्हाला हवा असाच.गावातल्या कारखान्यात तीन वर्षांपासून मॅनेजर म्हणून नोकरीला होता. मुंबईवरून मित्राबरोबर त्याचं गाव आणि कारखाना बघायला आला. आणि इथेच राहिला. त्याचा मित्र माझा पण मित्रच.ओळख झाली तसं घरी येण जाणं वाढलं.
त्याने तिला स्वतःहून लग्नाची मागणी घातली.

आमची परी कधीच आमच्या शब्दाबाहेर नव्हती.पण यावेळी तिने आम्हाला तिचा निर्णय सांगितला.
तिचा पहिला हट्ट.त्याच्या मध्ये नाव ठेवण्यासारखं काहि नव्हतं.आईवडील तो 10वीला असताना एका अपघातात गेले होते.जवळच अस कोणीच नव्हतं. त्याच्या मित्राच्या कुटुंबाने त्याच्या वतीने लग्नाची जबाबदारी घेतली.
आम्ही तीच लग्न लावून दिल.

थोड्याच दिवसात त्याच्या मित्राने मुंबईच्या ऑफीसची जबाबदारी त्याला दिली. आणि मोहिनी तिच्या नवऱ्याबरोबर मुंबईला गेली. आठवड्यातून एकदा फोन करायची. आवाजावरून तर खूप खुश वाटायची. बघता बघता तिच्या लग्नाला सहा महिने पूर्ण झाले . आणि अचानक एक दिवस संध्याकाळी ती घरी आली.

निस्तेज चेहरा, खोल गेलेलं डोळे अवस्थेत होती. शरीरानेही खूपच बारीक झाली होती. हिमानीचे बाबा सांगताना मधेच थांबले. खुर्चीत डोकं मागे टेकवत एक दिर्घ श्वास घेतला.
" पुढे काय झालं बाबा?"हिमानी

भूतकाळ

संध्याकाळचे सात वाजले होते.
"अहो, चहा आणि हा या दिवसातला शेवटचा परत मागू नका मी देणार नाही. जेवण अर्ध बनवायचं ठेवून तुमचा चहा द्यावा लागतो. तो पण गरमागरम." रोहिणी ने सुरेश ला चहा दिला
"काय करू,तुझ्या हातचा चहा पिल्याशिवाय दिवसभराचा थकवा जातच नाही".सुरेश ने तिच्याकडून चहाचा कप घेतला.
"पुरे झाला मस्का. प्या लवकर नाहीतर थंड होइल". म्हणत ती स्वयंपाकघरात जायला वळली. तोच तिला दारात मोहिनी उभी दिसली. उदास चेहरा ,हातात मोठी बॅग,खांद्याला पर्स आणि रडून लाल झालेले डोळे.


"मोहिनी ताई तुम्ही. आत या ना."म्हणत रोहिणी ने पटकन पुढे होऊन तिला घरात घेतले.
मोहिनी, आत्ता या वेळेला चहा चा कप तसाच खाली ठेवत तो पण तिच्याकडे वळला.
तिला अश्या अवस्थेत बघून त्याच डोकं फिरल.लाडाची एक बहिण.तीची अशी अवस्था .

त्याने तिच्या पुढे हात पसरले. ती खूप आवेगाने दादाच्या मिठीत शिरली.आणि जोरजोरात रडू लागली.
थोड्यावेळाने रोहिणी ने हळूच तिला बाजूच्या सोफ्या वर बसवले.
"ताई , काय झाले. आधी तुम्ही शांत व्हा." तीने मोहिनीला पाणी दिले.

डोळे पुसले आणि तीने सांगायला सुरुवात केली.
'वहिनी,त्याने मला फसवले. त्याच कधीच माझ्यावर प्रेम नव्हते.फक्त तिच्या सांगण्यावरून त्याने माझ्याशी प्रेमाचं खोटं नाटक केलं आणि खोटं लग्न केलं."

"काय खोटं लग्न."
"हो.कारण आमच्या लग्नाच्या दोन दिवस आधीच त्याने कोर्टात तिच्याशी लग्न केलं होत."

क्रमशः:
मधुरा.