रात्रीचे अकरा वाजले होते.
घरभर निस्तब्ध शांतता पसरली होती. सगळं काही इतकं शांत, की टेबलावर ठेवलेल्या घड्याळाच्या सेकंद काट्याचाही आवाज स्पष्ट ऐकू येत होता.
स्वरा तिच्या खोलीत अभ्यासात बुडाली होती. पुढच्याच आठवड्यात तिचा महत्वाचा परीक्षेचा पेपर होता, म्हणून ती एकाग्रतेनं अभ्यास करत होती. टेबललॅम्पच्या मिणमिणत्या प्रकाशात पुस्तकावर सावली पडत होती. खोलीत बाकी सगळं अंधारात हरवून गेलं होतं.

बाहेर हलकासा वाऱ्याचा आवाज येत होता.कधी एखादं कुत्रं दूरवरून भुंकतं, तेवढंच.
स्वराच्या मनात काही विचार घोळत होते, पण ती त्याकडे दुर्लक्ष करत पुन्हा पुस्तकात डोकं घालू पाहत होती, इतक्यात
"ट्रिंग ट्रिंग..."मोबाईलचा अचानक आवाज झाला.
ती दचकली. घड्याळाकडे पाहिलं तर ११:०२ वाजले होते.
इतक्या रात्री कोण फोन करतंय?
इतक्या रात्री कोण फोन करतंय?
मोबाईल स्क्रीनवर लिहिलं होतं “Unknown Number”
क्षणभर तिच्या हाताला थोडं थरथरल्यासारखं झालं. अनोळखी नंबर... या वेळेला?
तिने भीत भीत कॉल उचलला.
तिने भीत भीत कॉल उचलला.
"स्वरा... घरातून बाहेर पड. लगेच!"
आवाज शांत होता, पण त्यात एक प्रकारची अस्वस्थ करणारी घाई होती जणू काही वेळेचा श्वास चालला आहे.
आवाज शांत होता, पण त्यात एक प्रकारची अस्वस्थ करणारी घाई होती जणू काही वेळेचा श्वास चालला आहे.
"कोण बोलतंय?" ती कापऱ्या आवाजात विचारत होती.
पलीकडून उत्तर आलं "जास्त वेळ नाही, स्वरा. खिडकीच्या बाहेर बघ."
क्षणभर तिला काही समजलंच नाही. अंगावर काटा आला.
तिने टेबलपासून खिडकीपर्यंतचे अंतर हळूहळू पार केलं.
खिडकीच्या काचेतून बाहेर पाहिलं.
तिने टेबलपासून खिडकीपर्यंतचे अंतर हळूहळू पार केलं.
खिडकीच्या काचेतून बाहेर पाहिलं.
रस्त्यावर एक काळसर रंगाची स्कॉर्पिओ गाडी उभी होती.
गाडीच्या आत, समोरच्या सीटवर कुणीतरी बसलेलं दिसत होतं.
ते अस्पष्टपणे, पण ठामपणे, तिच्या दिशेने हात हलवत होतं.
गाडीच्या आत, समोरच्या सीटवर कुणीतरी बसलेलं दिसत होतं.
ते अस्पष्टपणे, पण ठामपणे, तिच्या दिशेने हात हलवत होतं.
स्वराच्या अंगातून सगळं रक्तच निघून गेल्यासारखं वाटलं.
आई-बाबा गावाला गेले होते. ती घरात एकटीच होती.
आई-बाबा गावाला गेले होते. ती घरात एकटीच होती.
तिचा कोणीतरी पाठलाग करतंय का?
त्यांना तिचं नाव कसं माहीत?
त्यांना तिचं नाव कसं माहीत?
ती विचारांच्या गर्दीत हरवली आणि तोपर्यंत फोन कट झाला होता.
पण त्याच क्षणी पुन्हा फोन वाजला.
पण त्याच क्षणी पुन्हा फोन वाजला.
स्वरानं थरथरत फोन उचलला.
"जर तू ५ मिनिटांत बाहेर आली नाहीस, तर तुझं आयुष्य कायमचं बदलून जाईल..."
आवाज आता अधिक गंभीर आणि धोकादायक वाटत होता.
आवाज आता अधिक गंभीर आणि धोकादायक वाटत होता.
त्या शब्दांनी स्वराचा अंतर्मन हादरलं.
फोन तिच्या हातातून पडला.
तो जमिनीवर आदळला आणि बंद झाला.
फोन तिच्या हातातून पडला.
तो जमिनीवर आदळला आणि बंद झाला.
स्वरानं घड्याळाकडे पाहिलं ११:०५वाजले होते.
क्षणाचाही वेळ न दवडता ती वेड्यासारखी पळत खाली आली.
दाराजवळ पोहोचली. आतून कडी उघडली. पण
दाराजवळ पोहोचली. आतून कडी उघडली. पण
दार उघडण्याआधीच बाहेरची स्कॉर्पिओ गाडी सुरु झाली.
इंजिनचं गुरगुरणं कानात घुमलं आणि ती गाडी संथपणे घराच्या दिशेने येऊ लागली.
इंजिनचं गुरगुरणं कानात घुमलं आणि ती गाडी संथपणे घराच्या दिशेने येऊ लागली.
स्वरा दारातच थबकली.
तिला कळेना पळावं की लपावं?
तिचा श्वास अडकलेला होता. काळजाचा ठोका थांबलेला...
तिचा श्वास अडकलेला होता. काळजाचा ठोका थांबलेला...
त्या गाडीत कोण होतं?
त्यांना तिचं नाव कसं माहीत?
इतक्या रात्री तीच्यावर नजर का?
त्यांना तिचं नाव कसं माहीत?
इतक्या रात्री तीच्यावर नजर का?
आणि सर्वात महत्वाचं त्यांना तिच्याकडून नक्की हवं तरी काय होतं?
स्वरासमोर एक गूढ, पण गंभीर प्रश्न उभा होता "बाहेर पडायचं... की आत लपायचं?"
(क्रमशः...)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा