वाड्याच्या मागच्या जुनाट, अर्धवट पडलेल्या खोलीत स्वराने आणि अर्णवने आसरा घेतला होता. खोलीत केवळ एक जुनाट कंदील, धूळ भरलेली विटांची भिंत आणि कोपऱ्यात पडलेली मोडकळीची कपाटं होती. बाहेर पावसाचा जोर, विजांचा कडकडाट आणि एका काळकुट्ट भयाचं सावट पसरलं होतं.
गाडीचा आवाज ऐकून स्वरा थरथर कापू लागली. तिचे डोळे काळजीने अर्णवकडे वळले.
"मी आहे इथे," अर्णवने तिचा हात हातात घेत आत्मविश्वासाने म्हणाला, "काही होणार नाही."
अचानक जोराचा गडगडाट झाला. दरवाज्याच्या फटीतून एक सावली आत येताना दिसली. कुणीतरी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होतं. एक गोळी येऊन भिंतीवर आदळली. त्या गोळीच्या आवाजाने स्वरा दचकली. अर्णव तिला कवेत घेत तिच्या समोर उभा राहिला.
"मी पोलिसांना कॉल केला आहे. ते येतायत. थोडा वेळ... थोडा वेळ थांब!"
त्याच क्षणी दुसरी गोळी खोलीच्या खिडकीतून आत झेपावली. पण त्या पाठोपाठ एक आवाज दुमदुमला तो आवाज सायरनचा होता!
एकदम बाहेर गोंधळ माजला. पोलिसांची धावपळ, सूचना, बंदुकींचा आवाज. काही क्षणांतच गुन्हेगाराला पकडण्यात आलं. पोलिसांनी सगळं व्यवस्तीत सांभाळले होतं.
अर्णवने पोलिसांसमोर एक फाईल सादर केली. तीच फाईल जिच्यात एका मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा आणि एका गुन्हेगारी जाळ्याचा पुरावा होता. त्या रात्रीच्या घटनेने एक काळी रहस्यांची गुंतागुंत उजेडात आली होती.
स्वरा अजूनही हादरलेली होती, पण तिच्या चेहऱ्यावर आता एक नवे आत्मविश्वासाचे तेज झळकत होते. तिचं संपूर्ण आयुष्य एका रात्रीत बदलून गेलं होतं. पण तिच्या शेजारी उभा असणारा अर्णव तिचा रक्षक, तिचा सहकारी... की अजून काहीतरी वेगळंच?
सकाळचा सूर्य वाड्यावर प्रकाश टाकत होता. सर्वत्र शांतता होती, पण स्वराच्या मनात मात्र काळजीचे वादळ घोंगावत होतं. अर्णवने तिचं प्राण वाचवलं, पण त्याचं तिथं अचानक प्रकट होणं... सायबर क्राईम विभागातलं त्याचं काम... पोलिसांपर्यंत अगदी बरोब्बर माहिती कशी पोहोचली?
ती काही वेळ त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग शेवटी न राहवून विचारलं,
"अर्णव... तू खूप आधीपासून माझ्यावर लक्ष ठेवत होतास ना?"
"अर्णव... तू खूप आधीपासून माझ्यावर लक्ष ठेवत होतास ना?"
अर्णव थोडा गडबडला. त्याच्या चेहऱ्यावर क्षणभर एक अपराधगंड उमटला.
"हो..." तो म्हणाला हळू आवाजात, "पण कारण तुझं रक्षण होतं. तुझ्या बाबांनी मला एक फाईल दिली होती. त्या फाईलमध्ये गुन्हेगारांविषयी महत्त्वाचा पुरावा होता... आणि तो फार संवेदनशील होता."
"हो..." तो म्हणाला हळू आवाजात, "पण कारण तुझं रक्षण होतं. तुझ्या बाबांनी मला एक फाईल दिली होती. त्या फाईलमध्ये गुन्हेगारांविषयी महत्त्वाचा पुरावा होता... आणि तो फार संवेदनशील होता."
स्वरा उठली. तिचा चेहरा कठोर झाला.
"ती फाईल कुठे आहे आता?"
"ती फाईल कुठे आहे आता?"
अर्णवने नजर टाळत उत्तर दिलं,
"माझ्याकडे आहे..."
"माझ्याकडे आहे..."
तेवढ्यात स्वराचा मोबाईल खणखणला. एक अज्ञात नंबर होता. तिने उचलला.
एक सावध आणि थंड आवाज फोनमधून ऐकू आला "अर्णववर विश्वास ठेवू नकोस... तोच खरा धोका आहे."
एक सावध आणि थंड आवाज फोनमधून ऐकू आला "अर्णववर विश्वास ठेवू नकोस... तोच खरा धोका आहे."
स्वराच्या अंगात एक थरकाप झाला. तिच्या हातून फोन खाली पडला. डोळ्यात अविश्वास, चेहऱ्यावर संताप.
"अर्णव?" ती कुजबुजली. तो काहीच बोलला नाही.
"अर्णव?" ती कुजबुजली. तो काहीच बोलला नाही.
"तू माझा विश्वासघात केला ....मला फसवलंस?" तिचा आवाज कंपित झाला. डोळे पाणावले, पण त्यात रागही होता.
अर्णव तिच्यासमोर सरसावला. त्याच्या नजरेत पश्चात्ताप होता.
"हो, सुरुवातीला मी मिशनसाठी तुझ्याजवळ आलो होतो... पण नंतर, तुझ्यात गुंतलो स्वरा. खरंच."
"हो, सुरुवातीला मी मिशनसाठी तुझ्याजवळ आलो होतो... पण नंतर, तुझ्यात गुंतलो स्वरा. खरंच."
स्वरा काही क्षण स्तब्ध होती. त्याच्या डोळ्यात खरंच काहीतरी अस्सल होतं. पण तिच्या मनात आता एक लहानशी दरार निर्माण झाली होती. जी भरून निघणं शक्य नव्हतं.
"माझं आयुष्य खेळ नव्हतं अर्णव," ती म्हणाली, शांत पण ठाम आवाजात,
"जर तू खरंच प्रेम करत असशील तर एक शेवटचं काम कर. ती फाईल पोलिसांकडे सुपूर्त कर आणि निघून जा. कायमचं."
"जर तू खरंच प्रेम करत असशील तर एक शेवटचं काम कर. ती फाईल पोलिसांकडे सुपूर्त कर आणि निघून जा. कायमचं."
अर्णव गप्प झाला. काही क्षण तो तिला बघत राहिला तिच्या डोळ्यांतली वेदना, धिटाई आणि तुटलेला विश्वास... हे सगळं त्याला स्पष्ट दिसत होतं. तो काही बोलला नाही. फक्त मान हलवली मागे वळला आणि हळूहळू चालत निघून गेला त्याने एकदाही मागे वळूनही पाहिलं नाही.
स्वरा तिथंच उभी राहिली. अश्रू तिच्या गालांवरून ओघळले. पण आज ती एकटी नव्हती ती मजबूत होती, अनुभवांनी परिपक्व झालेली आणि पुढे चालत जाण्याची तयारी ठेवणारी.
त्या रात्रीपासून स्वराचं आयुष्य खरच बदललं होतं. तिच्या मनात सतत अर्णवचा चेहरा, त्याचे शब्द आणि त्या व्हिडिओतून उमटलेली काळजी हे सारं झपाटल्यासारखं तिच्या विचारांवर हावी झालं होतं.
ती ऑफिसला जात होती, दिवस जात होते तसे जगत होती, पण मनानं सतत एका प्रश्नात अडकलेली "तो खरंच परत येईल का?"
दरवाजाच्या खिडक्या, प्रत्येक ड्रोनचा आवाज, प्रत्येक अनोळखी चेहरा तिला अर्णवसारखा वाटायचा.
अश्याच एके दिवशी, ती तिच्या जुन्या लॅपटॉपवर काही फायली चाळत होती, तेव्हा एक फोल्डर तिला दिसला त्याचे नाव होतं "Swara_Only". तो तिने कधीच पाहिला नव्हता. भीती आणि आश्चर्य एकत्र घेऊन तिने तो उघडला.
त्यात एक वर्ड फाईलमधे पत्र लिहले होतं.
"स्वरा,
हे शेवटचं पत्र तुला लिहितो आहे.
हे शेवटचं पत्र तुला लिहितो आहे.
माझं आयुष्य वेगळं आहे, पण तुझं नको त्या वळणावर खेचणं मला कधीच मंजूर नव्हतं.
तू मला प्रेम शिकवलंस, माणूसपण शिकवलंस. म्हणूनच मी गुन्ह्यांच्या त्या काळ्या जाळ्यातून स्वतःला बाहेर खेचायचं ठरवलं.
माझी साक्ष, ती गुप्त फाईल, मी सरकारी यंत्रणेला दिली आहे. आता मी न्यायालयात आत्मसमर्पण करतो आहे फक्त एक विश्वास ठेवून, की एक दिवस मी मोकळा होईन आणि तू, माझ्यासारख्या गुन्हेगाराला नाही, तर माझ्या खर्या प्रेम करणाऱ्या मनाला पुन्हा स्वीकारशील.
जर कधी तुला वाटलं की मी परत यायला हवा तर तू माझी वाट बघ.
– फक्त तुझा,
अर्णव.
स्वराच्या डोळ्यांत अश्रू आले. तिच्या ओठांवर हसू आलं ते जणू दुःखाने आणि आशेने भरलेलं होत.
ती उठली, आरशात स्वतःकडे पाहिलं आणि म्हणाली,
"मी वाट बघेन, अर्णव तुझ्या सुटकेची, आणि आपल्या प्रेमाच्या नवीन सुरुवातीची."
"मी वाट बघेन, अर्णव तुझ्या सुटकेची, आणि आपल्या प्रेमाच्या नवीन सुरुवातीची."
तीन वर्षांनंतर...
एके निवांत रविवारी. स्वरा एका कॅफेमध्ये बसलेली, कॉफी घेत होती. समोरच्या खुर्चीत एक शिडशिडीत पण स्थिर आवाज तिचं लक्ष वेधून घेतो.
"Excuse me ही सीट रिकामी आहे का?"
स्वराने डोळे वर केले.
तो अर्णव होता . केस थोडे वाढलेले, चेहऱ्यावर शांतपणा, आणि डोळ्यांत पुन्हा एकदा तिच्या नावाची जाणीव.
"स्वरा" तो हळूच म्हणाला.
ती क्षणभर स्तब्ध झाली आणि मग हलकंसं हसून म्हणाली,
"हो जागा आहे. पण अर्णव म्हणूनच बसायचं आहे, लक्षात ठेव ."
तिचे बोलणे ऐकून अर्णवच्या चेहऱ्यावर हसू फुललं.
त्याचं गुन्हेगारी आयुष्य मागे पडलं होतं. स्वरा त्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा स्थैर्य घेऊन आली होती.
आता ना सायबर जगाची भीती होती, ना फाईल्सचा गोंधळ.
फक्त दोन जीव सत्य, समर्पण आणि प्रेमाच्या आधारावर नव्यानं आयुष्य जगायला सज्ज.
फक्त दोन जीव सत्य, समर्पण आणि प्रेमाच्या आधारावर नव्यानं आयुष्य जगायला सज्ज.
कथा समाप्त.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा