ही कथा आहे संजना आणि अक्षयची. एकाच ऑफिस मध्ये ते जॉब करत होते.दोघांची पोस्ट मात्र वेगवेगळी. तरीही घट्ट अशी मैत्री होती दोघांची. कशी ते पाहूया या कथेतून....
संजना ही गरीबीत वाढलेली मुलगी. तिला दोन बहिणी असून ती सर्वात मोठी होती. घरची परिस्थिती नाजूक असतानाही तिच्या आईने तिला खूप शिकवलं. तिच्या आईला मुळातच शिकण्याची खूप आवड होती पण स्वतःला शिकता आले नाही म्हणून तिने तिच्या मुलींना शिकण्यापासून वंचित केले नाही. परिस्थिती कशीही असो पण तिने संजनाला शिकवले. संजना ही खूप हुशार मुलगी होती. आपल्या मातृभाषेत तर ती हुशार होतीच पण इंग्रजीवरही तिने लहानपणापासूनच वर्चस्व मिळवलं होतं.
कॉलेजचं शिक्षण पार पाडून ती आता जॉब पाहत होती. एके ठिकाणी तिला चांगल्या पोस्ट साठी ऑफर आली. त्या पोस्टसाठी तिला इंटरव्ह्यू देण्याची गरज होती. त्यामुळे ती पोस्ट घेण्यासाठी खूप जण इंटरव्ह्यू देणार होते. त्यामध्ये अक्षय हा ही होता.
अक्षय हा मोठया घरात वाढलेला. शिक्षणही भरपुर झालेले. पण त्याला ना श्रीमंतीचा गर्व,ना शिक्षणाचा. सर्वांशी हसून खेळून राहणारा असा अक्षय.
ऑफिस मध्ये त्या पोस्ट साठी त्याचीही निवड करण्यात आली होती. आता बाकी होता तो सर्वांचा इंटरव्ह्यू.
ऑफिस मध्ये.....
इंटरव्ह्यू देण्यासाठी एकेक जण केबिन मध्ये जात होते.
खुप जण रिजेक्ट झाले. आता संजनाचा नंबर आला होता.. ती आतमध्ये गेली. तिला खूप प्रश्न विचारले गेले. काही सोपे तर काही कठीण. पण त्या सर्व प्रश्नांची अचूक आणि व्यवस्थित उत्तरे तिने दिली.
इंटरव्ह्यू घेणाऱ्यांनी तिचे सिलेक्शन करून तिला फायनल राऊंड साठी बाहेर थांबण्यास सांगितले. थोडेफार जणांचे इंटरव्ह्यू झाले असता अक्षयचा नंबर आला. बराच वेळ अक्षय बाहेर बसला होता आणि संजना ही तिथेच बसून होती. संजना फोनवर आईशी बोलत होती की, "मी सिलेक्ट झाली आहे आणि आता आपली गरिबी नाही राहणार आई. मलाच मिळावा हा जॉब."

संजना हे सर्व हळूच आईशी बोलत असली तरी अक्षयला मात्र तिचे हे सर्व बोलणे ऐकू जात होते. अक्षय शांत होता पण त्याने मनोमन ठरवले होते की, ह्या जॉब साठी तिचीच निवड व्हावी.
अक्षयला केबिनमध्ये बोलवण्यात आलं. तू इंटरव्ह्यू देण्यासाठी आत मध्ये गेला. पण त्याने सर्व प्रश्नांची उत्तरे अगदीच मोजक्या शब्दात दिली. हुशारी दाखवली पण मुद्दामच स्वतःचा कमीपणा जानवू दिला. पण त्यालाही त्यांनी बाहेर थांबण्यास सांगितले.
थोड्या वेळाने फायनल राऊंड झाल्यावर संजनाचे त्या पोस्ट साठी सिलेक्शन झाले. पण अक्षयला तिचा सेक्रेटरी होण्यासाठी ऑफर केली. त्याला पण ही ऑफर आवडली. कारण त्याने संजनाला पाहिल्या पासून, त्याला तिच्या बद्दल सहानुभूतीची भावना जाणवू लागली होती. त्यामूळे त्याने या जॉब साठी लगेच होकार दिला.
दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये......
आज दोघांचाही ऑफिसमध्ये पहिलाच दिवस होता, त्यामुळे दोघेही लवकर आले होते. अक्षय लवकर येऊन थांबला.तशी थोड्या वेळात संजनाही आली होती. ती येताच त्याने तिला "गुड मॉर्निंग मॅम"असे म्हणत तिचे स्वागत केले.
आज दोघांचाही ऑफिसमध्ये पहिलाच दिवस होता, त्यामुळे दोघेही लवकर आले होते. अक्षय लवकर येऊन थांबला.तशी थोड्या वेळात संजनाही आली होती. ती येताच त्याने तिला "गुड मॉर्निंग मॅम"असे म्हणत तिचे स्वागत केले.
तिनेही आल्या आल्या त्याला गुड मॉर्निंग म्हणत त्याच्याकडे पाहून हसली. दोघेही आता कामाला लागले. संजना खूप ॲक्टिव होती. पण तिच्या पेक्षा जास्त अक्टिव अन् हुशार अक्षय होता. कोणताही प्रॉब्लेम असो तो तिला लगेच सोडवण्यात मदत करत असे. तिलाही त्याचे म्हणणे पटत असे. त्यामूळे प्रत्येक वेळी ती त्याची मदत घेत असे.
कधी कधी तर ती कामात एवढी बिझी असायची की तिला जेवण करायचे ही लक्षात रहायचे नाही. पण अक्षय तिच्या साठी जेवण करायचं थांबत असे. तिला सोबत घेऊनच दोघेजण टिफीन खात असत.
कधी कधी तर ती कामात एवढी बिझी असायची की तिला जेवण करायचे ही लक्षात रहायचे नाही. पण अक्षय तिच्या साठी जेवण करायचं थांबत असे. तिला सोबत घेऊनच दोघेजण टिफीन खात असत.
अक्षयला मनोमन ती खूप आवडू लागली होती. तिच्या प्रेमळ स्वभावावरती तो फिदा झाला होता. त्याला खूप वेळा वाटले की तिला सांगाव की,"संजना मला तू खूप खूप आवडते." पण त्याची हिम्मत मात्र कधीच झाली नाही.
अक्षयचा मित्र निखिलला हे सर्व माहीत होते. की संजना त्याला खूप आवडते. आणि त्याच्या मुळेच तिला हा जॉब मिळाला आहे. पण अक्षय मुळे तो हे संजनाला बोलू शकत नव्हता.
पण एके दिवशी संजना थोडी निराश होती. त्यात भर म्हणून की काय, कधीही न चुकणाऱ्या अक्षय कडून काम करत असताना थोडी चूक झाली. तिने तिचा सगळा राग अक्षयवरती काढला. अक्षय काहीच न बोलता तेथून निघुन गेला. हे सर्व निखिल ने पाहिले.
निखिलला आता हे सगळ पाहवत नव्हते. त्याने ठरवले की संजनाला आज सगळे काही समजलेच पाहिजे. त्याच रागात तो तिची परवानगी न घेताच तिच्या केबिन मध्ये गेला. अन् तिला बोलू लागला.
"अग संजना तू आत्ता इथे या खुर्चीवर बसली आहेस ना ते फक्त अन् फक्त अक्षयमुळेच. तुला हा जॉब, ही पोस्ट मिळावी म्हणून त्याने स्वतःचा इंटरव्ह्यू ही नीट दिला नाही. तू कधी विचार तर केला आहेस का की, अक्षय एवढा हुशार असून तो तूझ्या हाताखाली का काम करत असेल? नाही ना केला कधी विचार...
मी सांगतो,** तू खूप आवडतेस त्याला**मी रोज त्याला पाहत असतो तूझ्यासाठी झुरताना. पण तू कधीच त्याच्याकडे पाहिले नाही संजना... जा जाऊन बोल आज त्याला.....
इतके बोलून निखिल तिथून रागातच निघून गेला...
संजना मात्र विचार करत राहिली. तिला क्षणभर काहीच सुचेनासे झाले होते. खूप वेळ विचार करून ती खुर्चीवरुन उठली आणि निखिल कडे गेली. निखिलला तिने विचारले की अक्षय कूठे असेल आत्ता. त्याने संजनाला सांगितले की अक्षय आत्ता ऑफिसच्या बाहेर गार्डन मध्ये असेल.

संजना निखिलला थँकयु म्हणून तिथून निघुन गेली. बाहेर गार्डन मध्ये जाताच तिला एका बेंचवर बसलेला अक्षय दिसला. ती ही हळूच त्याच्या शेजारी जाऊन बसली. त्याने तिला पाहिले अन् तो मुद्दामच जरासा लांब सरकला. संजना थोडी कासावीस झाली. पण त्याला ठीक आहे, म्हणत ती त्याच्या पासून थोडी दूरच बसली.
अक्षय तिला म्हणाला, "इथे कशाला आलात मॅम! कामं असतील ना तुम्हाला भरपुर. जा तूम्ही इथून, वेळ नका वाया घालवू माझ्या मुळे तुमचा."असे म्हणत तो तिथून उठणारच होता, तेवढ्यात संजनाने त्याचा हात पकडला आणि त्याला म्हणाली की,....
"मला माफ कर अक्षय. मला कधी समजलेच नाही तुझे प्रेम. तुझं ते मला जेवू घालणं... माझ्या पुढे पुढे करणं.. माझ्या प्रेमासाठी तू स्वतः रोज झुरत राहणं... सारे काही आता जाणवतेय मला."
"मला माफ कर अक्षय. मला कधी समजलेच नाही तुझे प्रेम. तुझं ते मला जेवू घालणं... माझ्या पुढे पुढे करणं.. माझ्या प्रेमासाठी तू स्वतः रोज झुरत राहणं... सारे काही आता जाणवतेय मला."
ती असे म्हणताच अक्षयने तिच्या कडे पाहीले असता, संजनाने क्षणाचाही विचार न करता अक्षयला एक मिठी मारली. घट्ट अशी मिठी होती ती. तिच्याही प्रेमाची कबुली होती, त्या मिठीत. अक्षयचा सारा राग शांत झाला होता.
संजनाने तिथलेच फूल तोडून त्याला देत म्हणाली, अक्षय माझ्याशी लग्न करशील का? सात जन्म तूच माझा प्रियकर होशील का? असे म्हणत तिने अक्षयला प्रपोज केले.
अक्षयने पण तिचे फूल स्वीकारत, तिला हो म्हणाला.... आज दोघेही खूप आनंदीत होती.
एकमेकांचे हात पकडून उशीर पर्यंत ते दोघे जण त्याच बेंच वर बसून एकमेकांत रमून गेले होते...
अक्षयने पण तिचे फूल स्वीकारत, तिला हो म्हणाला.... आज दोघेही खूप आनंदीत होती.
एकमेकांचे हात पकडून उशीर पर्यंत ते दोघे जण त्याच बेंच वर बसून एकमेकांत रमून गेले होते...
– सौ. अनिता खारगे