वर्गमित्र भाग 21

मैत्रीच्या हळुवार नात्याला अलगद उलगडणारी भावस्पर्शी कथा.

#वर्गमित्र-21
®©राधिका कुलकर्णी.

"काय,गेलीस की तिकडचीच झालीस तू? काही मेसेज नाही,फोन नाही.
सगळे ठिक आहे ना?"
प्रसादनी फोन करून प्रश्नांची सरबत्तीच लावली आज.
"अरे हो हो..जरा उसंत घे.किती प्रश्न."
"अग काय मग!
किती हा दुर्लक्षितपणा.!
पुण्याहून निघाल्या नंतर साधा पोहोचल्याचा ही मेसेज नाही तूझा.पोहोचल्यावर घाईत विसरली असशील उद्या येईल मेसेज,परवा येइल करता करता आज 4 दिवस झालेत सखी.तू विसरलीस हं मला."
             # ## ## ## ## #
काहीशा तक्रारीतच बोलत होता प्रसाद.
त्याची काळजी जाणवत होती शब्दा गणिक.
किती छान असते ना हे की कुणीतरी आपला एवढा विचार करतेय, आपली काळजी घेतेय.आज पहिल्यांदाच मला त्याचे हे रूप दिसत होते.
एरवी हेच चित्र उलटे असायचे.
मागील काही घटनांमधे तर प्रसादमूळे कित्येकदा मी रात्र रात्र त्याच्या विचारात आणि काळजीत घालवल्या होत्या.
पण आज तो माझी काळजी करताना बघून मला खरच खूप भरून आले होते.
         # ## ## ## ## #
"अरे,काय सांगू,इकडे आलो आणि रात्री  ऋषी ला ताप भरला होता.सकाऴी उठून बघतेय तर पूर्ण अंगावर लाल पुरळ उठलेले.ताबडतोब डॉक्टरकडे घेवून गेलो.तर गोवर निघाला होता.ते पुरळ दूखून ठसठसीने पुरता बेजार झालेला.सारखी रडरड अन् चिडचिड चाललेली त्याची.त्यामुळे लक्षातूनच गेले रे तूला निरोप करायचा.
सॉरी डिअर.प्लिज अंडरस्टँड.माफ कर आणि आता चिडू नकोस रे."
बर.आता कारण कळलेय म्हणून सोडतोय तूला.पण कळवायचे ना यार हे सगळे.
किती काळजीत होतो मी.
ठिक आहे, तू काळजी घे मुलाची.
मी करेन फोन.
           # ## ## ## ## #
आणि हो लग्नाचे फोटो आलेत.
तू मोकळी झालीस की सांग तूला पाठवतो बघ किती सुंदर आलेत फोटोज्.
हो रेऽऽऽ,
सध्या तर मला घरातल्या कामातून च डोके वर काढायला फूरसद नाहीये.
त्यात श्री पून्हा बेंगलोरला चाललाय टूर साठी.ऋषीकडे घराकडे सगळीकडे मलाच बघायला हवे ना.खूप गुंतून गेलेय.

त्यात आता 4 तारखेपासून मी ही क्लासेस सूरू करतीय.
ह्या वर्षी आमचे फिरणे झाले त्यामूळे क्लासेस लवकर सुट्टय़ा दिल्या.आता पोर्शन कम्लिट करायला लवकर सुरू करणे भाग आहे.

बर माझे जाऊ दे सगळे.तू कसाएस?
घरी सगळे मजेत ना.आणि तूझी गुडन्युज जी तू मला भेटल्यावर सांगणार होतास.इतके बोललो पण तेच सांगितले नाहीस.

काय आहे ती न्यूज? मी जरा उत्सुकतेनेच त्याला विचारत होते.
होग्.मलाही सुचले नाही अचानक तूला समोर बघून.
काहीच बोलणे झाले नाही.

अग् गुड न्यूज ही की,माझा तो फ्रॉड केलेला कलिग सापडलाय आणि त्याने त्याचा गुन्हा पण कबूल केलाय.पोलिस केस चालू आहे.
पण आता माझ्या मागचा ससेमिरा सुटला चौकशीचा.

ते सारखे फोन्स.पोलिसांची वेगळीच संशयीत नजर.खूप धास्तावलो होतो.
कसा पार पडणार ह्या दूष्ट चक्रातून ह्याचाच दिवस रात्र विचार यायचा.

फक्त त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणजे नौकरीवरून काढून नव्हते टाकले.त्यामुळे जरा तरी विश्वास आहे लोकांचा ही एक जाणीव मनाला उभारी देत होती.
        # ## ## ## ## #
अरे वाह्!! ही तर खूपच आनंदाची बातमीय.आणि तू मला ती इतक्या कोरड्या पद्धतिने देतोएस? नॉट फेअर प्रसाद.मला राग आलाय तूझा.

बर मग सांग काय करू.काय हवेय.कशी माफी मिळणार ह्या पामराला.
बोल,तू म्हणशील ते..

काही करू नकोस सध्या तरी.
पण भेटल्यावर पार्टी हवीय.भरपूर मजबूत कापणार तूला.
अग ए.कापणार काय! खाटकाच्या दूकानात रवानगी करणारेस की काय माझी.काय हे!!

अरे देवा! तूम्ही पुणेकर नेहेमी अर्थाचे अनर्थ का करता रे?
ही मुंबईय्या लँगवेज आहे.
कळेल हळुहळू.
कापणार म्हणजे भरपूर वसूली करणार पार्टीत.
मी हसत हसतच त्याला टोमणे मारले.तोही एेकून हसत दूजोरा देत होता.
         # ## ## ## ## #
खूप फ्रेश वाटत होता आवाजा वरून.
"मग कधी भेटतेस सांग. पार्टी काय तू म्हणशील तेव्हा म्हणशील तिथे यार."
"बघूया.पण निवांत भेटू नक्की.

बर चल निघते आता.ऋषीचे स्पजिंग करायची वेळ झालीय.दोघेही उठून बसलेत.

पण छान वाटले रे बोलून.परत फोन करशील असाच तूला सवड झाली की.?जरा निवांत गप्पा मारू."
"हो ग.मी करतो.करेन.
मलाही तूझ्याशी बोलले नाही की दिवस सूनासूना वाटतो.
करेन मी कॉल.
काळजी घे सगळ्यांची.
बाय.."
        # ## ## ## ## #
मला आज खूप दिवसांनी असे आवर्जून वाटायला लागले की मित्र असणे ही किती सुखावह बाब आहे.
किती हक्काने मी सहजपणे त्याला पून्हा फोन कर म्हणू शकले.

किती छान वाटते की कुणीतरी आपल्या शिवाय दिवस सूना जातो म्हणते.
हे खूप सुंदर आहे आणि मी ती भाग्यवान होते जिला असे म्हणणारा एक जिवलग मित्र होता.
जो फक्त तिच्या आणि तिच्याच सुखाचा विचार करतो.
(क्रमश:21)
®©राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला हा भाग?
वर्गमित्र कथा आवडतेय की नाही ?
हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all