Login

अजब गजब लग्न - भाग 44

पाखी आणी राज एकत्र येतील का? त्यांच्या आणी तिच्या आजोबांना सगळे समजेल का? त्यांचे पुढे काय होईल.

दीर्घकथा लेखन स्पर्धा  डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न - भाग 44



आज पाखी खूप उदास होती. मन काही केल्या स्थिर होत नव्हतं.

राज आज असे अचानक का निघून गेले असतील? आज मला त्यांना नीट बघताही आलं नव्हते…

तिच्या मनात प्रश्नांचा गोंधळ सुरू होता.

मला का एवढा फरक पडतोय? ते ऑफिसमधून गेले, तर गेले… पण मन का बेचैन आहे?

तिने स्वतःलाच थांबवायचा प्रयत्न केला.

मी त्यांना आवडायला लागले आहे का? नाही… नाही… हे चुकीचं आहे.
ती स्वतःशीच पुटपुटली.

त्यांचं लग्न झालं आहे… आणि माझं… माझं लग्न?

क्षणभर तिचं मन थांबलं.

माझ्या लग्नाला काहीच अर्थ उरला नाही आहे… फक्त कागदावरचं नातं आहे ते.

ती खोल श्वास घेते.

ज्या वकिलाने आमचं लग्न केलं… त्यांना भेटायला जावं का? सगळं नीट समजून घ्यावं का?

पण लगेच दुसराच विचार आला.

आता हे सगळं विचार करून काय फायदा?

पाखी घरी आली होती.bघरातली कामं करत होती भांडी, आवर, स्वयंपाक…

पण हात काम करत होते आणि मन मात्र कुठेतरी हरवलं होतं.

तिला आजोबांची आठवण आली.

आजोबांना भेटायला हवं… मन हलकं होईल.

ती खिडकीत उभी राहिली. बाहेर संध्याकाळचं शांत आकाश होतं.

पाखीच्या डोळ्यांत प्रश्न होते, मनात गोंधळ होता,
आणि हृदयात नकळत उमलत असलेली भावना… जिचं नाव द्यायची तिला भीती वाटत होती.


---

पाखी आजोबांना भेटायला निघाली होती. मन अजूनही अस्वस्थ होतं.

हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावर चालत असताना,
अचानक तिचं लक्ष समोर गेलेल्या एका ओळखीच्या चेहऱ्याकडे गेलं.

वकील…?

ती क्षणभर थांबली. तोच तो वकील, ज्यांनी तिचं लग्न लावून दिलं होतं.

मनात धडधड वाढली. पाखी स्वतःला आवरून त्यांच्या जवळ गेली.

“नमस्कार…” पाखी हळूच म्हणाली.

वकील तिला बघताच थोडे आश्चर्यचकित झाले, पण लगेच ओळख पटली.

“अरे पाखी! तू इथे?” ते म्हणाले.

“हो… आजोबांना भेटायला चालले होते,” पाखी म्हणाली, पण आवाज थरथरत होता.

वकील क्षणभर शांत झाले. मग म्हणाले

“तुला माहीत आहे का? आज त्यांचे आजोबा आले होते माझ्याकडे.”

पाखीचा श्वास अडखळला.

“त्यांचे आजोबा?” ती गोंधळून म्हणाली.

“हो,” वकील पुढे म्हणाले,
“ते तुझ्या मिस्टरांचे सगळे कागद घेऊन गेले आहेत. मॅरेज सर्टिफिकेट, सह्या… सगळं.”

पाखी स्तब्ध झाली.

“ते… ते असं का?” तिच्या ओठांतून शब्द कसेबसे बाहेर पडले.

वकील शांतपणे म्हणाले
“आता फार दिवस लपवून ठेवायचं नाही असं त्यांना वाटतंय. ते लवकरच तुला घेण्यासाठी येतील.”

हे शब्द कानावर पडताच, पाखीला क्षणभर भोवळ यायची बाकी होती.

मला… घेण्यासाठी? म्हणजे… सगळं खरं आहे?

वकील घड्याळाकडे पाहतात.

“मला थोडं काम आहे, मी निघतो. पण घाबरू नकोस… सगळं ठिक होईल.” वकील म्हणाले.

इतकं बोलून ते निघून गेले.

पाखी मात्र तिथेच उभी राहिली.

मनात विचारांचा प्रचंड कल्लोळ सुरू झाला.

आजोबा कागद घेऊन गेले… कोण माझे मिस्टरआहे, ती विचार करू लागली…

पाय आपोआप हॉस्पिटलकडे वळले.

हॉस्पिटलमध्ये पाऊल टाकतानाच
तिच्या मनात एकच प्रश्न घुमत होता

आता माझं आयुष्य नेमकं कोणत्या वळणावर येऊन उभं राहिलं आहे?


---



क्रमश

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all