Login

ती आणि तिचं कुटुंब - भाग 44

Ti Aani Tich Kutumb
ती आणि तिचं कुटुंब भाग - 44


डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा


विषय - कौटुंबिक


वास्तववादी कथा मालिका आहे. विनंती वाचून कमेंट नक्की करा.



सूनिता - "आई, दत्ता दादा, बाबा तुमच्या मोबाईल वर या क्लिप टाकते पहा जावयाचे पराक्रम."


सूनिता मोबाईल वर पाठवते हे सगळे पाहतात. गणेश सगळे कसे झाले. जावयाने कसे स्वतः च्या तोंडाने कबूल केले. ती कथा सांगतो. आई, बाबा, दत्ता मोबाईल मध्ये क्लिप बघतात. सगळी कथा ऐकल्यावर दत्ताचा संताप अनावर होतो.

आई (मालती)-"अरे दत्ता शांत हो बाबा. "


दत्ता दादा -"मी गणेशला म्हणालो होतो. माझा संशय खरा ठरला."


गणेश -"चांगल्या जोरात दोन दिल्या त्याच्या कानाखाली मी. आमची जोरात झटापट झाली. ईरा रडत उठली जोरात मग शांत झाले."


बाबा-"अरे मारू नका त्याला. तुमच्या बहिणीला इथे नांदायचे आहे. तुमचा मेहुणा आहे तो किती केले तरी."


सूनिता -"मला नाही संसार करायचा असा म्हणजे हा कुठे गेला याचा अंदाज लावत बसू, संशयी होऊ आणि जाऊन आला की काय त्या बाई कडे यात झुरू, रडू.. त्याची वाट पाहत बसू. रडत रडत स्वतः ची कीव येते मला. किती घरात कामं केली. किती एकनिष्ठ मी आहे. किती काय काय केले संसारासाठी. आता गरोदरपण, बाळंतपण, सीझर काय काय सहन केले. त्याची पण मुलगी आहे ती. मी रात्रं रात्रं जागते. तो बाप म्हणून काय करतो."



आई-" लग्न झाले तुझे हेच घर आहे तुझे. तुला मुलगी आहे तिला बापाचं नाव लावायला लागेल. लोक काय म्हणतील नाव काय तिच्या बापाचं? एकट्या बाईला जग सुखाने जगू देतं नाही. माहेरी हे भाऊ त्यांना आपले आपले संसार आहेत. काय आयुष्यभर तुलाच पाहत बसतील का? त्यांना पोरं, बाळ आहे. त्यांचे शिक्षण, लग्न, करियर करायचे त्यांना. तू ओझं होशील. आई, बाप जन्माला पुरतं नाही कुणाला. माहेरपण काही दिवसाचं असतं. चोळी, बांगडी केली झाले. तुझं सासरच तुझं घर आता. हे पक्क समजून घे. पदरात मुलगी आहे तिच पहायचे जवाबदारी आहे तुझी. आई आहे तू. तुला इथेच नांदायचे आहे. मुलीच्या माहेरासाठी आईला सासरी नांदावच लागत सुने. समजून घे बाळ. रडत रडत सांगते. मी तुला चांगलच सांगते. तूझ्या भल्याच. "


सूनिता-"आई, बाबा करत रडत आईच्या मिठीत जाते. काय परिस्थिती झाली आहे माझी? माझा काय दोष मी काय पाप केले आहे ग? म्हणजे स्त्री ची अवस्था दोन घर सासर आणि माहेर असून कोणतंच घर आपले नाही. धोबी का कुत्ता घर का ना घाट का.... अशी आहे."


आई-"असा नकारार्थी विचार नको करू. पोरी कडे पहा. तिच्यात जीव रमवं. तिचं सगळे चांगले कर. तिचं खाण, पिणं, कपडा लत्ता, शिक्षण, लग्न पाहू दे. पैसा बापाला लावू दे. घेऊ दे जवाबदारी. त्याला सोडायचे नाही. मलाही त्याचा राग आला आहे. आम्ही अधे मध्ये येत जाऊ. तू अधे मध्ये येत जा माहेरी पण कायमच नाही. हे लक्षात ठेव. तुला सासरी नांदण आहेच. तुला मुलगी आहे."





क्रमशः
सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
©®


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all