रणजित ला रागिणीचा स्वभाव खूप आवडतं होता म्हणूनच तर तिला पहातच फिदा झाला होता, जे लोक मनाने चांगले असतात ते चूक झाले की माफी मागायला ही कमी करत नसतात ,भले ही ते मानाने किती ही मोठे असो... त्यात ही त्यांना मोठेपणाचा वाटतो..रागिणी आणि रणजित ही दोघे स्वभावाने बऱ्यापैकी सारखेच होते.. किती तरी ती त्याच्या मनासारखे वागत होती.. तिला ही रणजित असाच पहिल्या भेटीतच पसंत पडला होता... इतकी मुले आली होती पण रणजित खास होता... माहिती नाही पण तिने ही रणजित सोबत लग्न करायचे असे ठरवले होते.. ती लाघवी बोलणारी, मनकवडी..लगेच भावुक होणारी, सगळ्यांचा विचार करणारी मुलगी होती.. तिला माणिनी ची ही खूप दया येत..आता आई होतांना आई न झालेल्या माणिनीच्या मनाचे दुःख किती खोल असेल हे आज कळले होते.. तिला ही म्हणूनच तर तिच्या तयारीत तिने सामावून घेतले होते.. तू ही माझ्यासोबत परत आई होण्याचा आंनद घे... कुठे तरी असे समज तुझाच मुलगा देवाने नव्या रुपात पण माझ्या ओटीत देऊन गेला आहे... त्याच्या थोरल्या आईच्या खुशीत...मग तू वेगळी कशी असणार... तू ही त्याच वेळी आई होणार ज्या वेळी मी.. तिच्या ह्या बोलण्याने माणिनीच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या.. खरंच जे तिच्या मनात होते तेच तर रागिणीचे अचूक ओळखले होते... दोघी गळ्यात पडून माये पोटी रडत होत्या... तिकडून रणजितचा भाऊ ही डोळ्यातील मुल गमवल्याचे दुःख की आता मोठ्या वाहिनीचा मोठेपणा, की परत माणिनीला आई होण्याचे सुख आणि मान रागिणीने तिच्यासोबत माणिनीला ही मोठ्या मनाने बहाल केला होता... नाहीतर काही तर सावली ही पडू देत नाहीत.....
रणजित. . हम्मम आता बास झाले ,कौतूक रागिणीचे आता जरा माझे ही करा... जसा मी वडील होणार आहे तसा सुहास काय जबाबदारीतून सुटणार नाही, त्याला ही छोटे पप्पा म्हणून जबाबदारी पहावी लागणार आहे, मग चल आत्तापासून सुरू कर,आणि त्या सगळ्या frames लाव...
रागिणी... काय हे,त्यांना आधी चहा तर घेऊ द्या मग बघू
माणिनी... थांबा भाऊजी मीच तुम्हाला सगळ्यांना बेस्ट चहा घेऊन येते... एकदम फक्कड तुम्हाला हवा तसा
सुहास... आज काय एकदम रडवलेच रे वहिनीने, त्यांना कसे समजते सगळ्यांच्या मनातले देव जाणे, पण आज खूप गरज होती माणिनीला ह्याची
रणजित.... ती समजून घेऊ शकते एका आईचे दुःख तेच समजून ती वागली
सुहास.. दादा माझी वहिनी ग्रेट आहे, ग्रेट !!
रणजित... रागिणीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कौतुकाने बघत उभा होता... त्याचा उर भरून आला होता, माझी रागिणी खरंच किती ग्रेट आहे समजदार आहे, गुण घ्यावे तितके कमी
रागिणी... तिकडून इशारा करून....आहो आता याल की नुसते बघत रहाल,बाकी कामे तुम्हाला करायची आहेत...
सुहास... जा दादा, तू हो पुढे, जरा वेळ घालावं त्यांच्यासोबत तुझी वाट बघत असतील केव्हाही
रणजित... हो चल, चहाला खाली भेटू तू ही फ्रेश हो, आईसाहेब येतीलच
आईसाहेब...खाली उभ्याच होत्या आणि त्या ह्या चौघांचे बोलणे ऐकत होत्या, पदर डोक्यावर घेऊन फर्मान सोडला ,तुमचा चहा मानीणीने तयार केला आहे घ्यायला या...
रागिणी.... सगळे समान आवरून चहासाठी खाली जाण्याच्या तयारीत असते,सोबत रणजित ला ही आवरून खाली येण्यासाठी तगादा लावत असते...
चल लवकर आईसाहेब बसल्या आहे वाट बघत..
अग आलो तू हो पूढे... हे फोटो लावतो बाळांचे
मी मदत करू का तुला... रागिणी
नको ग आधीच तू खूप करत असतेस आता काही भरी सामान नको उचलूस.. रणजित
मला मन रमायला तू हवा असतोस पण तुही नसला की बोर होते म्हणून हे मी करत असते.. ती
बरं ,पण आता नाही ...खूप सजवलीस तू रूम बाळासाठी पण तो आता कुठे खेळणार, त्याला अजून येऊ तर दे ह्या जगात मग कर हवं ते... तो
हो तो आला की सगळं घर डोक्यावर घेईल,मला तर तो दमून टाकेन दिवसभर... ती
हम्म, असेच होत असते जेव्हा एक छोटे कोणी तरी घर भर फिरत असते.. तो
मी तर ठरवलंय की काही वेळ मी संभाळेन काही वेळ माणिनी ,काही वेळ आईसाहेब आणि काही वेळ तू....रागिणी
Ok, चल मी ready आहे आता खाली गेले पाहिजे नाहीतर आवाज येईल इथपर्यंत आईचा ..रणजित
ते दोघे पायऱ्या उतरत असतात आणि अचानक रागिणीला चक्कर येऊन ती पाय घसरून पडते... तिला काहीच कळण्याच्या आत ती पोटावर पडते.. इकडे सगळेच हादरून जातात.. आता सगळे स्तब्ध झालेले असतात... सगळी कडे रागिणी, रागिणी हा आवाज घुमत असतो... रणजित पळत येतो तोपर्यंत ती शुद्ध हरपून बसते.. आईसाहेब ही मटकन खाली बसतात.. त्यांनी तिला पडतांना पाहिले असते... तिला डोक्याला जखम होऊन त्यातून रक्त घळघळ वाहू लागते... रणजितचा सगळा पंधरा कुर्ता रक्ताने भरून जातो... तो तिला तातडीने उचलून गाडीत टाकतो आणि सुहासला गाडी चालवायला लावतो,
क्रमशः.....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा