बाबा आता तो धक्का पचवू शकतील का ह्या वळणार येऊन कालच्या कथेचा शेवट झाला होता
वसू चे बाबा वसुला समोर असे अचानक पाहिल्यावर आता नक्की कसे react होतील ह्याची काळजी डॉक्टर करत होते... ती चादर काढली आणि अचानक वसू दिसल्याचा भास आहे की खरच ती वसुच आहे हे त्यांना बराच वेळ समजले नाही...
त्यांची बोलती बंद झाली होती..कुठून तरी अशी जाणीव होत होती की श्वास बंद पडला आहे आणि श्वास घेता ही येत नाही..फॅन चालू असून ही संपूर्ण अंगाला घामाच्या धारा लागल्या होत्या...
ते चक्कर येऊन पडणार इतक्यात डॉक्टर ओरडले आणि बाहेरून आलेल्या वहिनीने आणि डॉक्टर यांनी त्यांना सावरले...
ते जमिनीवर कोसळले...तरी त्यांनी शुद्ध हरपली नव्हती...एक हात वसू कडे दाखवून काही तरी म्हणत आहेत जणू असे वाटत होते...
त्यांना हा धक्का खूप मोठा होता...पचनी पडला नव्हता...पचनी पडत नव्हता.... त्यांना आता वसू ची आई जोर जोर्यात हवा घालत होती... त्यांची छाती चोळत होती...
तिला वाटले की अटॅक तर नाही आला परत...डॉक्टर ने त्यांना उठून बसवले होते... बेड च्या बाजूला असलेल्या सोफ्यावर...
जणू वीज चमकली होती डॉक्टर च्या समोर की आता माझ्या मित्राचे काही खरे नाही...पण त्यांनी त्याला खुर्चीवर बसवून एक injection दिले होते..
त्यांना injection च्या टोचणार्या कळी पेक्षा वसुला पहिल्या नंतर ची कळ काळजाला खूप भिडली होती.... त्यांना वसू दिसत होती पण विश्वास बसत नव्हता...
कोणी असे निघून जाते की परत काय बेतले असेल आपल्या प्रिय जणांवर याची ही ह्या लोकांना भ्रांत रहात नाही आणि मग जे नको ते घडत जाते... त्या जाणाऱ्या माणसाच्या आयुष्यात ही आणि तिच्या मागे तिच्या प्रिय जणांच्या ही आयुष्यात....
बाबा थोडा वेळ भिंतीकडे बघत तर कधी बाजूला पडलेल्या वसू कडे बघत...
ते आता वसुच्या आईचा हात धरून म्हणत होते अग हे काय झाले ,कसे झाले ग...कोणासोबत आली ही... कशी आली ही....
तिच्यासोबत तो होता का... की त्याने सोडले म्हणून वसू परत घरी आली असेल ग... मला वाटत होतं हे कधी तरी घडणार...ती येणार...पण खूप उशीर केला तिने यायला....
ती तीच वसू आहे असे मला वाटत नाही अशी ती दिसत आहे.... हातावर बघ बघ कसे मारल्याचे व्रण आहे... अग मी कधी साधे तिला बोट ही लावले नव्हते ग...
मी बाप म्हणून काय कमी केले होते ग... माझ्या प्रेमात काय कमी पडले होते ग...की त्याचे चार दिवसाचे प्रेम माझ्या प्रेमावर भारी पडले होते.... माझ्याच ह्या वसुने माझ्या विरुद्ध त्याच्यासाठी बगावत केली होती... कसे बोलू मी तिच्याशी...कसे विचारू तिला हे प्रश्न..
आई...तुम्ही धीर धारा, आता वसू आपलीच वसू परत आली आहे... तिने बहुतेक त्याची साथ सोडली असणार...शेवटी का असेना योग्य मार्गावर ती आली आहे...
आई म्हणत होती तिला प्रश्न विचारणे म्हणजे तिच्या मनावर आणि हृदयावर झालेल्या जखमा ताज्या करणे होईल...
आईम्हणाली काही दिवस जाऊद्या वे मी म्हणते मग तीच आपल्याला सर्व सांगेल....माघार म्हणजे मरणाचे द्वार नको वाटायला ना तिला... आपण समजून घेऊ ना.. घेऊ तिचे पाप पोटात...परत हा विषय नको..मला आता वसुला ह्या धोक्यात आणि धक्क्यातुन बाहेर काढायचे आहे... मला वसू परत हवी आहे..
माझी ती पहिली वसू...माझं गुणी बाळ..
डॉक्टर दोघांच्या ही विचार ऐकून घेत असतात..ते आता मित्राची साथ ना पण वहिनीच्या विचारांवर विचार करत असतात... आता त्यांचे ही टार्गेट वसुच असते....
त्यांनी ही एक हात मित्राच्या मांडीवर आश्वासक म्हणून ठेवलेला आहे... डोळ्यात एक जुजबी इशारा करत आहे... सांगत आहे वसुला एक संधी द्यायला हवी हे माझे ही मत आहे.... आणि तुझे ही मन तेच सांगत आहे जे मला तुझ्या डोळ्यात दिसत आहे...
अरे हरी बाप माणूस म्हणून किती ही कडक असला तरी त्याला एका बापाचे काळीज ही देवाने दिले आहे रे.. मी तर विराटच्या प्रत्येक निर्णयात त्याची सोबत करत असतो...तो चुकला की मी साथ सोडत नसतो....
डॉक्टर म्हणत होते त्याला जे हवे ते देतोच पण फक्त एक नायब मन नाही देऊ शकलो...इथेच मी हरलो..
त्याला त्या एका मुलीवर खूप प्रेम होते पण मीच त्याला तसे करण्याची मान्यता नाही दिली..
वसूचे वडील.... ते ही थोडे बोलू लागतात.. त्यांना आता बरे वाटू लागते.... ते आपला एक हात मित्राच्या मांडीवर ठेवून वचन देतो की मी वसुला परत एक संधी देईल...
खरे तर वारंवार देईल...ती चुकली तरी मी तिची साथ देईल...आणि दुसरा हात वसू च्या तळपायावर ठेवलेला असतो... मन आवरत असतात..आणि डोळे अश्रूने भरलेले असतात... डबडबल्या डोळ्यातून अश्रु आता तिच्या पायावर पडत असतात....
आईचा हात त्यांच्या खांद्यावर असतो...धीर देत असते ती माऊली.... वसू आता खऱ्या अर्थाने शुद्धीवर येणार याची सगळेच आतुरतेने वाट बघत असतात... बराच वेळ तिच्याच अवती भोवती ते तिघे असतात...
तिचा आवाज ऐकायला उतावीळ झालेले असतात डॉक्टर आणि तिचे बाबा... ते गोल काळेभोर डोळे... कधी बोलके आणि हलके होतील तिच्यातील साठलेल्या दुःखातून...कधी ती बाबा म्हणेन असे आता बाबाला ही वाटत होते...
ती अजून ही उठत नव्हती....बाबा काळजीत होते आता जास्तच अधीर होते... तिला बोलताना हसताना किती दिवसांनी बघणार होते... तिला कवटाळून घेणार होते ते आपल्या उराशी...तेव्हा कुठे मनाला शांती लाभणार होती...किती दिवसांचा तो दुरावा कधी कडवट तर कधी जीवघेणा होता...
बाबा म्हणत होते....डॉक्टर तिला भेटायला विराट येऊ शकतो का...त्याला सांग तो खूप खुश होईल वसू आल्याचे ऐकून...किती जीवापाड प्रेम करायचा ना वसू वर...
मला अजून ही आठवते की तो त्या दिवशी किती आनंदात आला होता घरी..तिला डॉक्टर ची degree मिळाल्याचे सांगायला सगळ्यात आधी त्याने तुमच्या नंतर वसुलाच सांगायचे हे म्हणून आला होता.... पण त्याने जे हे पहिले अन त्या दिवशी नंतर तो परत ह्या घरी आलाच नाही.... पण त्याच्या डोळ्यात एक प्रेम मी पाहिले होते....
डॉक्टर मी खरंच सांगतो विराट वसुवर खूप प्रेम करत असणार...पण ते ह्यावेळी मैत्रीचे नव्हते वाटत ...डॉक्टर तुला काय वाटते रे..कधी वाटले होते का रे असे तुला... खरे तर माझ्या मनात होतेच वसू साठी विराटचे स्थळ कायम ..पण मला वाटायचे आपली जात आडवी आली तर... मग मी तुला कधी बोललोच नाही..
डॉक्टर.... हरीचे दोन्ही हात धरून ,एकदम शांत होते... जणू एक वेळ वाटले की त्याला हरीचे म्हणणे पटले नसावे.. पण आता जर ते चुप बसले तर परत ते ह्या संबंधा बाबत कधीच बोलू शकणार नाही... आणि आपल्या विराट साठी वसुचा हाथ कधीच मागू शकणार नाही..
डॉक्टर.....खरे बोलायचे तर ज्या मुलीवर विराट प्रेम करत होता ती मुलगी म्हणजे तुझी वसू होती.. त्याला वसू मनापासून खूप आवडतं असायची अगदी त्याचे तिच्यावर लहानपणापासून प्रेम होते.... तुझ्या घरी मी जाणार आहे असे कळल्यावर तो लगेच आनंदात तयार होत असायाचा.... त्याला माहित नव्हते पण नेहमीच म्हणायचं बाबा मी लग्न करेन तर फक्त वसू सोबत... तीच माझी बायको होणार.... लहान असताना हो रे हो.... तुझीच होणार वसू म्हणत असत मी....पण मोठे झाल्यावर मात्र कुठे ही हे नाते हे प्रेम शक्य होईल असे वाटत नव्हते.. मग हळूहळू तो शिक्षणात रमला...इतके असून ही तो तिला नाही म्हणजे नाहीच विसरू शकला..तो आज ही कित्येक दा वेड्या सारखा आस लावून असत की वसू येईल बाबा... i know... की जेव्हा decisions असे baseless असतात ना तेव्हा भली भली माणसे माघार घेतात... बघाच तुम्ही ती येईल...आणि तरी ही ती मन सांगते की ती माझीच होईल....
बघू आता विराट मलेशिया हून आल्यावर वसुला बघून त्याची जशी reaction असेल,अजून ही त्याचे प्रेम तसेच असेल का...की बदललेले असेल..कोणी त्याच्या आयुष्यात आलेली असेल का.... जी ह्या दोन मनांना जवळ येऊ देईल का..
वसुला तर आता आई बाबा डॉक्टर यांना आधार आहे पुन्हा नवीन जीवन सुरू करायला.. विराट ही असेल का ह्यातुन तिला बाहेर काढायला तो ही मदतीचा हात पुढे करेल का.... प्रेम मिळावे का विराटला...वसुने ही प्रेमाचा हात पुढे करावा का....आता तिला खरे प्रेम काय असते ते कळेल का... ती ही स्वतःला एक संधी देईल का....द्यायला हवी का
क्रमशः
