Login

दहावीचा व्हाट्स अप गृप..

बालपणीच्या मिञमैञिणींची मज्जा
*दहाविचा व्हाॅट्स अप गृप*
©®वैशाली देवरे..


*सोशलमिडिया म्हणजे मायाजाळ त्याचा नाद म्हणजे एक जंजाळ* ....

ह्याच गर्तेत अडकलेल्या जींवाना व्हाॅट्स अप नावाच खेळण मिळाल व बघता बघता रंगू लागला एकमेकांशी संवादाचा खेळ...

फेसबुकच्या फ्रेडशिपच्या मिलापात बरीचशी अनओळखी मंडळी भेटू लागली व त्या ओळखपरेडीतून जुन्या पुराण्या मिञांची तुटलेली नाळ जुळू लागली...बदलेल्या चेहेर्यांआड कुठेतरी ओळखीचे धागे मिळू लागले व त्यातून छेडू लागल्या गुर्पच्या तारा...

आमका गृप, तमका गृप ,करत करत एका एका गृपमध्ये वर्णी लागू लागली व रंगू लागल्या मैफिलीच्या फैरी...

पण ,

ह्या सगळ्या गृपमध्ये "*जिवंतपणा*
ओतणारा गृप हिरा ठरतो....तो म्हणजे बालपणीच्या शाळेतल्या मिञांचा गुर्प....

*दहावीचा गृप*

काय?बरोबर बोलते ना मी....

हो का?तुम्हालाही पटलच म्हणायचं...

तर मिञमैञिणींनों ह्या मिलन-मिलनाच्या समुहात एखाद्या जुन्या मिञ किंवा मैञिणीचा नंबर सापडला कि दोन जणांचा संवाद होतो बोलण्यातून ओढ लागते .ती तेव्हा सोबतीला असणार्या मिञ मैञिणींची....एक एकाचा नंबर मिळता मिळता हळुहळू पाच पंचविस जणांचे नंबर जमतात व एखादा धनवान मिञ गृपची धुरा घेऊन "*संस्थापक अध्यक्ष*" होतो ...पहिल्या भेटितला दोस्त सोबत घेऊन मग भरू लागते गृपची पटवारी....जर कोणी लक्ष्यात येत नसेल तर मग रजिस्टरवरच्या नावांची सुरू होते उलटतपासणी व खेचून आणली जाते त्या व्यक्तीची ओळख ...गाव ,नातेवाईक,जवळच्या व्यक्तीकडून मिळतो त्याचा फोन नंबर व भरती करून घेतली जाते गृपवर...
असा असतो त्या व्यक्तीचा गृपपर्यन्त येण्याचा प्रवास...

खरतर गृप अनेक असतात व त्या गृपच्या संकल्पनाही वेगळ्या बरं का?...

जस की "*काॅलेजचा गृप* "म्हणजे एकदम शिस्तप्रिय कानात बोलणारा एखादा मिञ गृपमध्ये भरती झाला की ..लगेच कुजबुज..."अरे तो हाच ना?....मागे लट्टू होता तो.."
मुलगी असेल तर...."हि तीच ना....."पण,ही कुजबुज एकदम कानातच बरं का?...पर्सनल पर्सनल चालते ...गुर्पवर त्याचा सुगावा लागणार नाही अशीच ..

काही" *बिझनेस गृप*"एकदम प्रोफेशनल काम ऐके काम चालणारे ....

काही आताचे "*जवळचे मिञ असलेला गृप*" त्यात आपली आण बान शान जपत चाललेला असतो संवाद...

व ह्या सगळ्यांच्या गर्दीत एकदम सुसाट .....भरमसाठ वेगात ....मेसेजच्या धो धो पावसात भिजत असतो एक वेगळाच गृप तो म्हणजे....

आठवला ना?

काय ?म्हणतात ओळखला तुम्ही सगळ्यांनी ...

बरं बरं...

अगदी बरोबर ओळखला हं...!

हो बाबांनों ..."*दहावीचाच गृप* " ... ..

काय?स्मित आल बघा सगळ्यांच्या चेहेर्यावर ..

अरे मिञ मैञिंणींनों ह्या गृर्पच लयभारी असतो बघा...आपल्याला खरा ओळखणारा ,आपले खरे व निरागस चेहेरे प्रत्येकाच्या मनात कोरून ...निरागस मैञीत भिजवून गेलेला...कट्टीबट्टी,...धक्काबुक्की...विट्टीदांडू ते गजाच्या शर्यतीत रंगलेला ...भांडणातला राग वर्गातील एखाद्या कडक शिक्षकाच्या हातून समोरच्या पार्टीला मार कसा बसेल ह्याचा कट रचणारा....ओशाळलेल्या मिञांना साथ देणारा ..‌.घाबरलेल्या मैञिणीला हात देणारा...
सिनिअर मुलांच्या तावडीतून मैञिंनींना सावध करणारा...
एका तालावर नाचणारा....प्रसंगी एकजुट होणारा निरागस,निर्मळ.‌..तितकाच निर्भिड.....सच्चेपणाचा...
बरोबर ना.

मग आठवा बरं....तो दिवस ज्या दिवशी तुम्ही ह्या गुर्पचा भाग झालात...
आठवलं ना?...
काय मज्जा आली होती नाही..
तुम्ही गुर्पमध्ये आल्याबरोबर सुरू झाली होती ना मज्जा...
तेच तर ...
एकदम बिनधास्त ...त्या शाळेतल्याच शैलीत तुमची ओळखपरेड झाली नाही का?

काय? रे हा गण्याच ना....,
.....गावचा....,
.‌‌....काम करायचा,...
.......कडे राहायचा....,
बाबों....आता काय करतो रे..
म्हणजे जिंकल राव याने सार..
याची सोयरीक कुढली रे..
त्याला ती आवडायची बरं...
पण,बोलला नाही राव व फसला रे...

तो गुर्पमध्ये येत नाही तोच ...राॅगिंग सुरू .....पण,महाशय घाबरतत थोडी ...सगळ्यांना पुरून उरतात...व सगळ्यांचे उत्तर देतात...एखादा असतो जरा ह्या वयात जरा घरात भेदरलेला ...तो काय?कुणाच ऐकून घेत नाही राव...नाही पटत त्याला हे सारं...व आल्या पावली मंडळी गृर्पवरून बाहेर पडते...

इकडे माञ स्टिकर व इमोजींचा पाऊस पडू लागतो...
काय?पोकळ आहे राव हा...
अरे बायकोशी भांडला असेल..
नाही रे धाकात असेल...
भाऊ संशय घेत असेल...
किती तरी प्रश्न येथिल मिञांना पडतात बाबा...म्हणजे त्या व्यक्तीबद्दल सगळ्यांची मते येऊ लागतात...
पण,गेलेल्या त्यालाही ओढ असते त्या बालपणातील सवंगड्यांची व महाशय पुन्हा नव्याने प्रवेश करतात शाळेत‌..
हळूहळू रंगून जातात ह्याच दुनियेत आपली इगो सोडून...

मुलींच गत तर अगदीच वेगळी राव...
शोध तर घेतला जातो पण बरेचदा वेगळीच निघते ती...
दहावीतली छानसी मैञीण ...संसार व तीच्या जीवनाच्या चक्रात इतकी बदलते कि तिचा चेहेराही विसरतात सारे..(बंधण ,संस्कारशैली,घरचे वातावरण,आजुबाजूचा परिसर,गाव ,शहर ह्या गोष्टीं तिच्या बदलावाला कारणिभुत ठरतात)
फोटो टाक गं माय...
अशी शिफारस निघते...मग काय ?बाईला कोणता फोटो पोस्टवू प्रश्नच पडतो...(काय करणार भिती तर असतेच हो...परिवाराचा टाकू ,एकटीचा टाकू ...कि मुलांसोबत टाकु ...भयानक टेन्शन असत राव)
भित भित फोटो पोस्टवला जातो...ओखळणारे कोणीच नसते राव ...मग काय?जीव एकदम कासाविस होतो...फोटो मागे फोटोची मागणी वाढते पण,त्यावेळीचा फोटो कुठे मिळतो ..‌
तेव्हाची बायजा आज भाग्यश्री दिसते...
गृपवर मग चर्चेची मैफिल रंगते....
खतरनाकच असतो ...तो गृपवरचा पहिला दिवस मुलींसाठी...शाळेतल्या पहिल्या दिवसापेक्षा कठिण ...

खरी गंमत तर आडनावाची होते...

सासरच अडनाव ,....बदललेल नाव ,....माहेरच नाव.... माहेरच अडनाव...त्यात नवरा काय?करतो मुल किती?का?करतात...किती प्रश्नांच्या फैरी सुटतात राव ...आगदीच ओशाळल्यागत होत...त्यात आपण मुलगी. जास्त बोलण योग्य नाही. मग काय?गुर्पमध्ये असूनही शांत चिताने फक्त आपल्याबद्दल कोण काय बोलत हेच बघण सुरू असत....
दहात दोन /चार जरा बोल्ड असतात ...भरभरून बोलणार्या ..
कोणी आरे बोलल की....लगेच कारे करणार्या ...

ह्या पुर्वी काही बिनधास्तच असतात अस नाही हं...!!

शाळेत शांत संयमी असणार्या पण संसारात पडल्यावर एकदम भक्कम झालेल्या...‌
पण, काहीच उलट होत त्यावेळी बिनधास्त असणार्या पण आता बोलणही आवघड होणार्या...
दोन्ही प्रकारच्या मैञिणींना ह्या गुर्पवर भिती ही मुळीच नसते ....कारण आताच्या वयातील परिपक्वता व शाळेतील वयातील निरागसतेने मैञीची मर्यादा जपलेली जाईल ही खाञी असते....

एकदा ओळख झाली की वेध लागतात ..."*स्नेहमेळाव्याचे*"..
एक एक करून गोळा होतात सारी पाखरे....नसतो येथे कोणताही अहंभाव ...सगळ्यांना शाळेतील बालपणाचे क्षण अनुभवायचे असतात..आता कोण कसा दिसत असेल‌ बघायच असतं...फोटोची देवान घेवाण जरी असली तरी बरच बदललेल असतं...ठरलेल्या दिवशी सगळे समोर येतात ....कालचा पिंट्या आजचा भाऊ झालेला असतो...कुठेतरी पोटाचा डोगर उभा असतो...डोक्यावरच्या केसांनी रजा घेतलेली असते...एखाद्या मैञिणीत भारदस्त बाई दिसते...मान रूतबा सगळ विसरून गळाभेट होते...अरेतुरेच्या भाषेत भावनांची गर्दी होते...डोळ्यासमोर येतात त्या वर्गातल्या खोडी ...डोळ्यांची पारणे खर्या आर्थाने फिटतात....दहावीचे मिञमैञिणी जेव्हा पहिलेंदा भेटतात...
पहिल्यासारखेच जशी शाळा सोडली असते तसेच वय वाढल तरी त्याच बालवयातल्या जोश्यात ...

ह्या गुर्पवर वावरतांना कधी "*पण*"व "*का*"अडवा येत नाही हं..!!
बिनधास्त मनातल बाहेर येत...तेव्हाच व आताच वागण हळूहळू सगळ्यांच्या समोर उभं रहात...
मुला मुलींचे स्वभाव ,त्यांचे बदलाव व सोबतीला त्यांच्या जोडीदारांचीही छानपैकी ओळख होवू लागते...
एकदोन महिन्यांच्या चर्चासञात मुलं ,बायका,नवरे ,परिवारातील सदस्य ...एखाद्याचा प्लस पाईंट व एखाद्याचा विक पाईंट सापडतो म्हणजे सापडतोच...
त्यातून रोज भरणार्या शाळेला इंधन भेटू लागत...
येथे रंगतात गप्पा गैरहजर मिञ मैञिणींच्या...
भरपुर होतात जोक पण उपहास कधीच होत नाही..
न भेटलेल्या मुलींची आठवण रोज काढली जाते..
गृपमध्ये असलेल्या मैञिणींना शोधमोहिमेची शिफारस होते...
बरंच काय?काय ?घडत ह्या शाळेत ..
पण तेही तितकच हक्काच व सहजच विसरण्यासारख ....
बालपणीच्या कट्टीबट्टीसारखं...

दुसर्या गुर्पच सोडा हो ...!!!
पण,१०वीच्या गुर्पवर कितीही बिझी असणारा येऊन डोकावतोच बरं...!!
कारण येथे का?कुणास ठाऊक जीवनातील जिवंतपणाचा खरा आंनंद भेटतो...
बोलता बोलता चेहेर्यावर येणार हसू...
हसता हसता हलकेच विसरायला लागणारे टेन्शनसं...
मिञमैञिणींच्या गप्पांमधून आपल्याच चुकलेल्या वाटांची लागणारी लिंक...
हताश झालेल्या मनाला मिळणारा "*अल्हादायक* "आधार...
जिवनाचा भरभरून आस्वाद घ्यायला शिकवणारा हा स्टेज..
व हे व्यासपिठ गाजवणारे...गृपवरचे आक्टिव्ह मेंबर्स...
हे सार रसायण अजब गजबच असतं बरं...

पंधरा सलाईन्सवरही माणसाला तरतरी भरणार नाही इतकी पावर असते ह्या गृर्पवर....

गृर्पची खाशियतच निराळी असते...
विषय कितीही गंभिर असो....तो येथे सहज व सोपा होतो...एक आधार दिला जातो...चुकलेल्या मिञांची जोरदार धुलाई होते...उपदेशांचे डोस नसतात मुळी हक्काची धमकी असते...सावरायला वेळ असतो...पडणार्याला धीर येथेच मिळतो...जगण्याची रीत येथेच कळते...संस्कारांची शिदोरी येथे गुण्यागोविंदाने नांदते..आश्लिलतेला थारा नसतो...गर्वाचा पारा नसतो...अहंकाराला ह्या शाळेत वेळीच बुक्यांचा मारा असतो...गरीबाचा सन्मान असतो ...श्रीमंतालाही थारा असतो...उच्चनिच्च अस काहीच नसतं...

"आपण सारे"....हाच ऐकोप्याचा वास असतो...

म्हणुन तर मिञमैञिणींनों...

"*दहावीचा व्हाट्स अप गुर्प* "

आपला जीव की प्राण असतो...

जीवनाच्या ह्या धावपळीत ,कोणाला थांबायला वेळ असतो ...आयुष्याच्या शर्यतीत चढाओढ तर कायमचीच असते ...एखादा मिञ आज खुप मोठा झालेला असतो ..एखाद्याच्या नशिबाचे फासे उलटे पडत असतात...एखादी मैञिण तिच्या ञासात गुंतलेली असते...बरंच असत प्रत्येकाच्या मनात पण बोलण सोप थोडीच असतं...भडाभडा बोलणारा लपवत असतो आपल दु:ख त्या शब्दांच्या फैरीत....अबोलपणा घेणारा विसरलेला असतो सुखाचे क्षण.....पण ,गृपवरच्या चर्चेतून सावरायला येतात अनेक हात...

मिञमैञिणींनों पैसा,संपत्ती ,मानसन्मान,भरभराट हे जीवनात गौण असतं..खरतर मिञमैञिणींचा सहवास लाभण हे पुर्वजन्माच संचित असतं....
बोलत रहा...
हसत रहा...
व्यक्त होणं आजकाल महत्वाच आहे...
उद्याची सकाळ ही उष:काळात दडलेली भाबडी आशा आहे...
जपा ह्या ऋणानुबधांना ...
वेळातवेळ काढून भेटत जा...
मैञीच्या ह्या माळेला जरा मनापासून पुजत रहा...

"*दोस्तों के बिना जिंदगी बहोत खाली खाली हैं बचपन के साथी मिलना एक सुनेहरी कहाणी हैं*..."

सर्व बालमिञमैञिणींना समर्पित....

®वैशाली देवरे...