हॅपी बर्थडे टू यू....
हॅपी बर्थडे डिअर प्रणव....
हॅपी बर्थडे टू यू
हॅपी बर्थडे डिअर प्रणव....
हॅपी बर्थडे टू यू
'प्रणव'... थँक्यू नेहा....
नेहा प्रणवची समजूत काढत बोलते....प्रणव आज पार्सल पोहोचवण्याचे काम नको करूस... मी जॉब करत असताना , तुला असे घरोघरी जाऊन पार्सल पोहोचवण्याची गरज काय? मी माझ्या ऑफिसमध्ये तुझ्या जॉब विषयी सांगून ठेवलं आहे. नक्कीच तुला या महिन्यात चांगला जॉब मिळेल....
अगं पण जॉब मिळेपर्यंत असं घरात बसून राहणं मला नाही पटत. म्हणून मी हे पार्सल पोहोचवण्याचे काम करत आहे . मला चांगला जॉब मिळाला की मी हे काम बंद करणार....
अरे पण प्रणव... तू पार्सल पोहोचवण्याचे काम करतोस. त्यावरून माझ्या मैत्रिणी व सोसायटीतील लोक मला सतत टोमणे मारत असतात.
प्रणव बोलतो ....तू बाहेरच्या लोकांकडे लक्ष देऊ नको, अगं मी घरात बसलो तरी ते आपल्याला बोलणार आणि पार्सल पोहोचवण्याचं काम केलं तरी ते बोलणार....
बरं चल मी जातो जेवढे जास्त पार्सल पोचवले जातील तेवढे जास्त पैसे मिळतील...
बरं चल मी जातो जेवढे जास्त पार्सल पोचवले जातील तेवढे जास्त पैसे मिळतील...
नेहा त्याला बोलते ....प्रणव प्लीज ! आजच्या दिवस पार्सल द्यायचे काम करू नको....नको जाऊ ना! आज तुझा वाढदिवस आहे . मी ऑफिस मधून सुट्टी घेते आपण घरीच तुझा वाढदिवस सेलिब्रेट करूया....
अगं सकाळपासून काय बर्थडे सेलिब्रेट करणार! ... आज रात्री आपण छान बर्थडे सेलिब्रेट करूया....
नेहा बोलते तू काही माझा ऐकणार नाही. चालेल ठीक आहे. तु तुझे पार्सल पोहोचवण्याचे काम करायला जा....असे बोलून नेहा ऑफिसला जाण्यासाठी निघते...
तिकडे प्रणव देखील त्याच्या कामाच्या ठिकाणी जातो.
तिकडे प्रणव देखील त्याच्या कामाच्या ठिकाणी जातो.
ट्रेनमध्ये काही जनी गप्पा मारत असतात... त्यांचे शब्द नेहाच्या कानावर पडतात...दहा मिनिटात पार्सल पोहोचवणं म्हणजे अत्यंत जोखमीचे काम. रस्त्याला कुठे थांबायचं नाही . कुठल्या रस्त्याला ट्रॅफिक असेल ते बघायचं, शॉर्टकट रस्ता कुठून जातो हे शोधायचं आणि दहा मिनिटांमध्ये ते पार्सल ग्राहकांच्या घरी पोहोचवायचं...
त्यामुळे पार्सल देणाऱ्यांना गाडी देखील अत्यंत वेगाने चालवावी लागते....
त्यामुळे पार्सल देणाऱ्यांना गाडी देखील अत्यंत वेगाने चालवावी लागते....
हे शब्द ऐकल्यानंतर नेहाच्या डोळ्यातून नकळत अश्रू ओघळतात. ती मनातच विचार करते खरंच प्रणव किती जोखमीचे काम करत आहे. पण प्रणव हे काम अत्यंत काटेकोरपणे पार पाडत असे...
इकडे प्रणव एका ठिकाणी पार्सल द्यायला जात असताना त्याची गाडी नकळत दुसऱ्या गाडीला ठोकली जाते. तो गाडीवाला प्रणव सोबत वाद घालू लागतो. शेवटी प्रणव त्यांच्या गाडीची नुकसान भरपाई देऊन तिथून पटकन पार्सल देण्यासाठी मिळालेल्या पत्त्यावर पोहोचतो.
त्या पत्त्यावर पोहोचल्यानंतर तेथील ग्राहक त्याला ओरडू लागतात...दहा मिनिटांमध्ये डिलिव्हरी द्यायची होती आणि तुम्हाला एवढा वेळ का लागला.... मी तुमची कंप्लेंट आता तुमच्या ऑफिसमध्ये करणार...
प्रणव त्यांची माफी मागतो तिथून निघतो....
प्रणव त्यांची माफी मागतो तिथून निघतो....
इकडे स्वरा ऑफिस मधून लवकर घरी यायला निघते. आज प्रणव चा बर्थडे ! आज मी त्याच्यासाठी एक छानसा शर्ट गिफ्ट म्हणून देते. असा विचार करत ती घरी जात असते पण दुकानातून शर्ट घेतला तर माझी ट्रेन जाईल आणि पुन्हा घरी जाण्यासाठी उशीर होईल . त्यापेक्षा मी "१० मिनिट होम डिलिव्हरी वरून ऑनलाईनच शर्ट मागवते.
स्वरा घरी पोहोचते व ती प्रणासाठी एक ऑनलाईन शर्ट ऑर्डर करते. आता दहा मिनिटांमध्ये शर्ट येईल...
ती प्रणवला फोन करते ....
हॅलो प्रणव मी घरी आले आहे .तु लवकर घरी ये...
प्रणव बोलतो माझे सर्व काम कम्प्लीट झाले आहे..आता दोन पार्सल आहेत ते आपल्या सोसायटीमध्येच आहेत ते देतो म्हणजे झालं....
स्वरा घरी पोहोचते व ती प्रणासाठी एक ऑनलाईन शर्ट ऑर्डर करते. आता दहा मिनिटांमध्ये शर्ट येईल...
ती प्रणवला फोन करते ....
हॅलो प्रणव मी घरी आले आहे .तु लवकर घरी ये...
प्रणव बोलतो माझे सर्व काम कम्प्लीट झाले आहे..आता दोन पार्सल आहेत ते आपल्या सोसायटीमध्येच आहेत ते देतो म्हणजे झालं....
ओके चल बाय... येतो लवकर....
प्रणव मनातच बोलतो...आता तरी ही ऑर्डर वेळेत पोहोचायला हवी. नाहीतर तर पुन्हा माझी कंप्लेंट होईल...
असा विचार करत प्रणवचं वेगाने गाडी चालवत असतो...
असा विचार करत प्रणवचं वेगाने गाडी चालवत असतो...
गाडी चालवत असताना गाडीला कुत्रा आडवा येतो . तो पटकन त्याची बाईक वळवायला जातो तसं मागून ट्रक येतो. आणि त्याच्या गाडीला जोरदार धडक देतो...
त्या धडकेत प्रणव जागीच मृत्यू पावतो...
इकडे स्वरा प्रणवची वाट बघत असते. अर्धा तास होऊन गेला तरी अजून प्रणव आला कसा नाही? म्हणून ती पुन्हा प्रणवला फोन ट्राय करते पण त्याचा फोन लागतच नाही...
थोड्यावेळाने एका अनोळखी नंबर वरून स्वराला फोन येतो ...हॅलो प्रणव हे तुमचे कोण आहेत...
स्वरा बोलते आहो ते माझे मिस्टर आहेत....
अहो त्यांचा एक्सीडेंट मध्ये मृत्यू झाला आहे...
हे ऐकल्यानंतर स्वराच्या पायाखालची जमीन सरकते...
ते मोठ्याने ओरडते प्रणव ....तरी मी तुला बोलत होते पार्सल पोहोचवण्याचे काम करू नको म्हणून...
काही दिवसांनी प्रणवचा एक मित्र घरी येतो ...तो बोलतो ताई प्रणव जे पार्सल घेऊन निघाला होता, ते पार्सल तुमच्याच घरून ऑर्डर केलेलं होतं. आणि ती त्याची शेवटची ऑर्डर होती....
हे त्यानंतर स्वराला खूपच धक्का लागतो.
प्रणव चा मित्र बोलतो.... दहा मिनिटात पार्सल मागवणे इतकं गरजेचं होतं का? आपल्याला दहा मिनिटात घर बसल्या सर्व वस्तू मिळतात. "ऑनलाइन बिजनेस मध्ये सर्वात जास्त फायदा ज्यांचे प्रॉडक्ट आहे त्यांचा होतो. आणि ग्राहकांना ती वस्तू आपल्याला वेळेत मिळाली याचा आनंद होतो"... पण यामध्ये जीव जातो तो फक्त पार्सल पोहोचवणाऱ्या व्यक्तीचा...
तो आपल्या घरच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आपला जीव मुठीत घेऊन ते पार्सल वेळेवर पोहोचवण्याचे काम करतो , आपण जे पार्सल दहा मिनिटांमध्ये मागवतो. ते खरंच दहा मिनिटात मिळणं गरजेचं आहे का ? याचाही विचार केला पाहिजे.
" तुम्हाला घरपोच मिळणाऱ्या वस्तू एखाद्या व्यक्तीच्या जिवापेक्षा मौल्यवान नाहीत."
