वाव ! अमृतसर, वैष्णवी देवी ,काशी ,उज्जैन, कृष्णा नगरी, पिंक सिटी, चामुंडा देवी गीता उपदेश स्थान ,सिद्धिविनायक ,महाड ,आग्रा अजून कितीतरी जास्त ठिकाणे जी मला पाहायची होती. फायनली आय एम गोइंग टू ट्रीप १५ डेज. किती मजा येईल.It will be lot of fun ☺️. Yes definitely .हो पण मला नाही माझ्या आईला .बिकॉज ती जाणार आहे ट्रीपला मी नाही. उद्या किंवा परवा परत येईल ती . पण एकदा पप्पांनी , एकदा माझ्या भावाने , एकदा माझ्या मित्राने त्याचे पण आई गेली आहे ट्रीपला .तो पण विचारतो कधी येणार आहे ? दोन दिवस झाले की पुन्हा तोच प्रश्न.
कदाचित तसेच आम्ही पण वाट पाहतोय, जशी ती आमची आम्ही कॉलेजला असताना वाट पाहायची . जेव्हा आम्ही घरी यायचो एक्झाम झाल्यानंतर किंवा दिवाळीला. पण फरक हा आहे की यावेळी पोझिशन चेंज झाली आहे, तिच्या ऐवजी आम्ही घरवाले वाट पाहतोय तिची. घरी येताना एक एक दिवस कमी होता ना ती जशी आमची वाट पाहत असेल आणि दिवस मोजत असेल तसं आम्ही करतोय.आपल्या जीवनाच्या , आयुष्याच्या अशा अविभाज्य भागाची , आपल्या हृदयातल्या एकदम जवळच्या व्यक्तीची वाट पाहणे काय असते हे आम्ही अनुभवत आहे . नेहमी आपण तिला सोडून जात असतो पण तिचे सोडून जाणे काय असते, हे समजते आणि शिकवते जेव्हा हळूहळू आपणही तिच्या सारखेच घरात वागत असतो पण ती होणे कधी शक्य वाटत नाही.
या 15 दिवसात मीही घरातली थोडीशी जबाबदारी घेतली आणि म्हणाले मी आहे तुझा तू जा ट्रीपला . पण जबाबदारी घेणे आणि निभवणे यात खूपच अंतर आहे , हे समजले . याआधी माझी किंवा आपल्या कोणाचीही एखादी गोष्ट सापडली नाही . तर आपण लगेच आईला मागतो. काय ग आई कुठे ? आहे तूच ठेवली असशील ना? शोधून दे ना . तुझ्या कसं काय लक्षात नाही ? घरातील असंख्य वस्तू सांभाळत असताना आपली एखादी वस्तू अचूकपणे ती आणून देते. शिवाय सल्लाही मिळतो स्वतःच्या वस्तू प्रॉपरली ठेवत जा आणि गंमत म्हणजे या पंधरा दिवसात दररोज उठून किचनकडे गेले तर मला पहिल्यांदा काल रात्री ठेवलेली पक्कड शोधायला लागायची . तेही चहा उतरवताना. बापरे कुठे गेली ही पक्कड ? असं म्हणत .
एखाद्या भाजीमध्ये कधी मीठ कमी जास्त झालं तिखट झालं , तर आपण लगेच म्हणतो मला दुसरी भाजी आहे का ती दे . तसेच जेव्हा आपल्याकडून होतं . तेव्हा समजतं ते कसं झालं ? भाकरी करताना चुकून कधी तरी लागणारी क्षणासाठी का होईना ती गरम माफ किती तीव्र चटका देते ते समजते .सकाळची सगळी काम उरकून दुपारच्या वेळी काहीतरी करत राहून पुन्हा संध्याकाळची तयारी असं करत पूर्ण दिवस आपल्या आईचा किती बिझी जात असतो ना.देवाने सृष्टी निर्माण केली पण कदाचित सगळ्यांची जबाबदारी त्यांना प्रेम देण्यासाठी त्याने आई दिली. आई आपल्या घराचा आज आत्मा आहे हो ना. जेव्हा ती घरी असते तर आपलं घर किती आनंदी आणि नेहमी हर्षित असते. या पंधरा दिवसात मला एक नक्की समजले की , मी कधीही परत गमतीतही आईला तुला कुठे काय जास्त काम आहे? घरातले केले की झालं .असं कधीच म्हणू शकणार नाही .आई निस्वार्थपणे आपले घर , आपल्यासाठी प्रेमाने सगळ्या गोष्टी करत असते आणि त्याप्रती आपण तिला दिलेले प्रेम , आदर आणि आपल्या आयुष्यातल्या अचिव्हमेंट मध्ये तिने दिलेल्या साथीचे कौतुक करतो. तोच तर तिचा मोबदला असतो ना?
माझ्या मते , या जगातील सर्वात हायली पॅड कोणता जॉब असेल, तर तो आईचाच असेल . पण तो इतका अनुमोल , बहुमोल आहे की त्याची किंमत कोणीच ठरवू नाही शकत . म्हणून तर म्हणतात ना ...
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा