2 स्टेटस भाग ६

Story Of A Couple From Different States
2 स्टेटस भाग ६



मागील भागात आपण पाहिले कि कवलचा आणि श्रेयसच्या घरच्यांचे पंजाबी पद्धतीने लग्न करायचे ठरते.. आता त्यांचे नातेवाईक या लग्नाबद्दल काय म्हणतात ते पाहू..


"अहो, त्या कॅटररला आठवण कराल का बारा वाजेपर्यंत सगळे पाठवून द्यायची? बारा म्हटले कि एकपर्यंत येईल.. माणसे येतीलच आता आपली सगळी." शोभाताई घर आवरत होत्या.

" हो, परत एकदा करतो.. अग तुझा दादा आणि वहिनी आलेच.. आवर लवकर.." सुरेशराव म्हणाले..
हळूहळू श्रेयसचे आत्या, मामा, काका , मावशी असे सगळेच नातेवाईक त्यांच्या कुटुंबियांसमवेत जमले..

" आता तरी सांगाना भाऊजी.. कशासाठी बोलावले आहे. आता जमले कि सगळे.." श्रेयसची मावशी म्हणाली..
" असे सगळेजण जमले आहेत ना, मला तर हे लग्नघर वाटते आहे.." श्रेयसची काकू..
" हो.. तेच सांगायला बोलावले आहे.." सुरेशराव म्हणाले..
" काय?"
" कधी?"
" कोण आहे ती?"
" कधी ठरले लग्न? आम्हाला सांगितलेच नाही.."
एकच गलका सुरू झाला.. सगळ्यांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता..
" अरे हो..हो..हो .. जरा शांत व्हा.. लग्न श्रेयसने स्वतःच ठरवले आहे. रविवारीच आम्ही तिच्या घरच्यांना भेटून आलो.. ती त्याच्या ऑफिसमध्येच कामाला आहे.. तिचे नाव कवलजीत.. " सुरेशरावांनी सांगून टाकले..
" कवलजीत? आपल्या जातीची नाही का?" एक नाक मुरडले गेले..
"मग लग्न कसे करणार? पंजाबी कि आपल्या पद्धतीने?" दुसरा आवाज..
" हि आजकालची मुलेना स्वतःचेच खरे करतात.. पण आईबाबांनी तरी समजवायचे ना? एक कुजबुजता आवाज..
हे सगळे शोभाताई आणि सुरेशरावांना अपेक्षित होतेच.. पण त्यांनी लक्ष द्यायचे नाही असे ठरवले होते.. पण पुढची पिढी मात्र खूप उत्साहात होती.. 
" ए, वॉव.. पंजाबी पद्धतीने लग्न.. म्हणजे मेहेंदी आणि संगीत पण असणार?"
" अग , मग प्रत्येक समारंभाला वेगळा ड्रेस आणि वेगळी मॅचिंग ज्वेलरी.. बापरे कसली शॉपिंग करावी लागेल ना?"
शॉपिंग हे नाव ऐकून तमाम पुरूष मंडळींच्या पोटात गोळा आला..
" लग्न पंजाबी पद्धतीचे असले तरिही आपला मराठी बाणा सोडायचा नाही.. आपले पारंपरिक कपडेच घालायचे काय?"
" प्लीजच हां.. हि अशी लग्ने काय नेहमी नेहमी होतात का? आम्ही मजा करणार म्हणजे करणारच.."
" पण ताई तू तर म्हणत होतीस कि तुला श्रेयसचे लग्न छान विधीवत करायचे आहे.."
"लग्नाआधीचे आणि लग्नानंतरचे विधी आपल्याच पद्धतीने होणार. फक्त लग्न त्यांच्या पद्धतीने होणार आहे.. चला जेवायला जायचे का? स्वयंपाक थंड होतो आहे.." सुरेशराव विषय संपवत म्हणाले.. सगळ्यांनी जेवणानंतर कवलचा फोटो पाहिला.. सगळ्यांनाच ती आवडली.. आता लग्नाच्या खरेदीसाठी नक्की भेटू असे म्हणत सगळे आपापल्या घरी गेले..

श्रेयसच्या घरच्यांची प्रतिक्रिया तर ओके होती.. आता कवलजीतच्या घरी काय होते.. 

" सुखी, अरे ड्रिंक्सची तयारी केली का? आणि खाण्याची?" पापाजी म्हणाले..
" हो डॅड.. ऑल सेट.. अभी तो सिर्फ पार्टी शुरू होने कि देरी है.."
" तू क्या पागल है? ये पार्टी थोडी है?"
"हम कवलकी शादी कि बात सबको बताने वाले है.."
" डॅड.. खाना, पिलाना है, यह तो पार्टी हि हुई ना.."
" तुमच्या दोघांच्या गप्पा संपल्या असतील तर आवराल का? सगळे येतीलच आता.." मम्मीजी म्हणाल्या..

कवलचे चाचा, मामा, बुआ, मासी , मुंबईमध्ये राहणारे सगळे नातेवाईक जमले होते..
" क्या बात है दिलजीत ? आज बडा सबको याद किया?"
" और परमिंदर पहले यह बता, खाने में क्या है? बडी भूख लगी है.." सगळ्यांचे व्यवस्थित खाऊन पिऊन झाल्यावर पापाजींनी कवलचा रोका झाल्याची बातमी सगळ्यांना सांगितली.. टाचणी पडली तरी आवाज येईल अशी शांतता पसरली..

"रोका हो भी गया..और हमें अब बता रहे हो.. छोरीने कोई जल्दबाजी तो ना कि है?"

" आपभी ना जिजी कुछभी बोलती है. तो मुलगा कवलच्या ऑफिसमधला आहे.. ते दोघे एकमेकांना आवडतात.. त्याचे आईवडील भेटायला आले, रोका केला.. इतना सिंपल था.."
" फिर भी.. या कानाचा पत्ता त्या कानाला लागू नाही दिलास.. आम्ही काय परके आहोत का?" आत्याने रडायला सुरुवात केली..
" जो हुआ सो हुआ, अभी शादी मे बुलायेगें या वो भी बादमें बतायेंगे?"
कवलच्या चाचाने विचारले..
" क्या बात करते है आपभी? अपने बेटी कि शादी और आपको न बतायेंगे, कैसे हो सकता है?" पापाजी चिडलेल्या काकांची समजूत काढत होते..
" लडका है कौन? या वो भी शादी के वक्त हि दिखेगा?"
" नहीं.. उसका नाम श्रेयस है.."
" हे भगवान.. अपने जात का नही? इसिलिए कहते है, बेटी को ज्यादा पढाओ मत.. ये तो क्या कामपें भी जाती है.. कबसे कह रही थी मेरी पहचान का एक लडका है.. कमसे कम मिलतो लो उससे. पर नहीं.. यह सब चल रहा था ना.. अब क्या शादी भी उनके तरिकेसे ही होगी.." कवलच्या आत्याच्या तोंडाचा पट्टा थांबतच नव्हता.. शेवटी संधी मिळाली हे पाहून ममीजी बोलल्या, " नहीं जी शादी तो अपने तरिकेसे ही होगी.. हमने तो साफ साफ कह दिया उन लोगोंसे." हि गोष्ट ममीजी कधी बोलल्या हा विचार ईवल आणि सुखी करतच होते. 
" अच्छा हुआ.. उतनी तो अक्ल है तुझमें.."
आत्या शांत झालेल्या पाहून सगळ्या पुरूषांचा मोर्चा त्यांच्या आवडत्या गोष्टीकडे वळला.. नव्या पिढीला कवलचे कोणाशीही लग्न झाले तरी फरक पडत नव्हता.. लग्न होतय ना बस्स.. पण बायकांचे तसे नव्हते.. अजून देवाणघेवाण काय झाली हे त्यांना विचारायचे होते.. पुरूष तिथून गेल्यानंतर सगळ्या बायकांनी ममीजींना वेढा घातला आणि विचारायला सुरुवात केली.. 
" काय काय मागितले त्यांनी? कार कि डायमंड ब्रेसलेट?" काकीने विचारले..
" काही नाही.. उलट लग्नाचा खर्च अर्धा अर्धा करू असे म्हणत होते.." ममीजींच्या तोंडातून निघून गेले.. हे ऐकून सगळ्यांचे डोळे विस्फारले...
" मग तुम्ही काय म्हणालात?" आत्याने विचारले..
" म्हटले.. असे कसे.. आमच्याकडे सगळा खर्च आम्हीच करतो.." ममीजी मान खाली घालून म्हणाल्या.. सगळ्यांनी एक सुस्कारा सोडलेला ऐकू आला..
" फोटो, शोटो तो दिखाओ ऊसका.."
कवलजीतने लगेच आपल्या मोबाईल मधला श्रेयसचा फोटो काढून दाखवला.. तो बघून कवलच्या मावशीने विचारले, "इसका कोई भाई वाई है तो देख जरा, शादी के लिए. अपनी गुड्डी का ब्याह भी तो करना है." हे ऐकून सगळेच हसायला लागले.

आपल्या नातेवाईकांना पण श्रेयस आवडला हे पाहून कवलच्या जीवात जीव आला .. आता तिला माहीत होते कि शादी होणार ती पण जोरोशोरोसे.. विथ फूल एनर्जी... 
मग काय, लग्नाला जायचे कवल आणि श्रेयसच्या कि मेहेंदी, हळद, संगीत याला पण हजेरी लावायची हे सांगायला विसरू नका...

सारिका कंदलगांवकर 
दादर मुंबई

🎭 Series Post

View all