नमस्कार, नुकतच एक पोस्ट वाचत असताना एक कल्पना सुचली दररोज एक शब्द घ्यायचा आणि त्यावरून लघुकथा लिहायची असेच मी 40 शब्द निवडले आहेत त्यावरून मी 40 कथा लिहायचा प्रयत्न करत आहे मला आशा आहे हा कथा संग्रह तुम्हाला नक्की आवडेल
आजचा शब्द - माणुसकी
मीना आणि सौरभ दोघेही एका मोठ्या कॉर्पोरेट कार्यालयात उच्च पदावर काम करणारे सहकारी होते. दोघांनीही खूप कष्ट घेऊन ही पदे मिळवली होती. मात्र दोघांच्या स्वभावात मात्र खुप वेगळेपण होत मीना अतिशय मितभाषी, शांत आणि कामावर लक्ष केंद्रित करणारी मुलगी होती, तर सौरभ बोलका आणि लोकांमध्ये पटकन मिसळणारा. मुलगा होता त्यामुळे सौरभच खुप कौतुक होत असे, तसेच बॉसही त्याचं विशेष कौतुक करत असे. मीनाही तितक्याच मेहनतीने काम करत असली, तरी तिच्या शांत स्वभावामुळे तिचं विशेष कौतुक क्वचितच केलं जात असे. तरीही दोघांच्या विचारांमध्ये मात्र खुप साम्य होत.
एके दिवशी लंच ब्रेकमध्ये सर्व सहककारी गप्पा मारत बसले होते. तेव्हा अचानक सौरभच्या छातीत जोराचे दुखू लागले. पण कोणीही याकडे फार लक्ष दिलं नाही, पण मीनाच्या ते लक्षात आलं. तिने क्षणाचाही विलंब न करता डॉक्टरांना कॉल केला. डॉक्टर लगेच आले आणि प्राथमिक तपासणी केली. त्यांनी सांगितले की सौरभला माइल्ड हार्ट अटॅक आला आहे, आणि जर काही मिनिटं उशीर झाला असता तर मोठा धोका झाला असता. मीनाने हे ऐकताच ऍम्ब्युलन्स ची व्यवस्था केली.
तिने ताबडतोब बॉसकडून सौरभच्या घरच्यांचा नंबर घेऊन त्यांना कळवले. काही क्षणात सौरभला रुग्णालयात नेण्यात आले. आणि काही क्षणातच त्याचे कुटुंबीय ही रुग्णालयात पोहोचले आणि लगेच त्याच्यावर उपचार सुरू झाले. सौरभ च्या कुटुंबियांनी मीनाचे मनापासून आभार मानले आणि काही दिवसांत सौरभची तब्येत सुधारू लागली.
मीना बोलकी नव्हती, पण तिची माणुसकी तिच्या शब्दांपेक्षा खुप मोठी होती. तिने दाखवलेली संवेदनशीलता सर्वांना भावली.
"माणुसकी हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे," हे वाक्य त्या दिवशी सर्वांच्या मनात कोरलं गेलं.
अश्याच सुंदर लघुकथा "चाळीस शब्द चाळीस कथा" च्या रूपात तुम्हाला या कथा कश्या वाटत आहेत हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चांगल्या कथां साठी मला फॉलो ही करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा