नमस्कार मित्र मैत्रिणींनो, बऱ्याच दिवसानंतर आज लिहायचा योग आला. वाचकांच्या मागणीनुसार आपण ईरावर माहितीपूर्ण असे ब्लॉग पोस्ट करणार आहोत. यात साहित्य, कला, तंत्रज्ञान, वैद्यकीय असे सर्वसमावेशक असे ब्लॉग असतील.
मी ज्या विषयावर लिहिणार आहे तो सर्वांच्या आवडीचा आणि ज्ञानात भर घालणारा आहे. तो विषय म्हणजे "व्यवसाय". व्यवसाय क्षेत्रात अनेक चढउतार, वेगवेगळ्या कल्पना आणि त्यातून मिळालेले यश याचा दीर्घ अनुभव गाठीशी असल्याने मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजावू शकेन याची खात्री आहे.
तुम्ही बघतच असाल, आजकाल नोकरी करण्यापेक्षा स्वतःचं काहीतरी असावं या मताकडे सर्वांचा कल दिसून येतोय. त्यात सोशल मीडिया, शार्क टॅंकसारखे कार्यक्रम आणि अनुकूल असे सरकारी धोरण यामुळे व्यवसाय क्षेत्राला अजूनच चालना मिळत आहे. आपल्यापैकी बरेच जण गृहिणी असाल किंवा जॉब करत असाल आणि साईड इन्कमसाठी प्रयत्न करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. महिन्याभराचे बजेट बसवताना आपल्या नाकी नऊ येतात आणि वाटते की आपली ओतर हौसमौज पूर्ण करायला साईड इन्कम असला तर किती बरं होईल ना?
ईरा वाचकांनी वाचनासोबतच आपला स्वविकास साधावा, प्रगती करावी आणि यशाच्या नवनवीन संधी शोधाव्यात यासाठी ईरा कायम प्रयत्नशील आहे. "थांबला तो संपला" या उक्तीनुसार आता प्रत्येकाने या मार्गावर स्वतःच्या क्षमता तपासून पाहाव्यात असं आम्हाला वाटतं. आहे त्या जागी थिजून न जाता सतत कार्यरत असावं आणि अनुभवाने शिकत जावं. काहीतरी धडपड करत राहिलो तर वाया जात नाही, एक तर 'यश' मिळते नाहीतर 'अनुभव', हे दोन्ही अत्यंत मोलाचे आहेत.
तर, प्रत्येकाला करता येतील अश्या काही व्यवसायांची माहिती मी तुम्हाला देणार आहे ते विषय खालीलप्रमाणे
1. फ्रिलांसिंग (freelancing)
2. कोचिंग
3. Youtube
4. Influencer
5. Amazon marketplace
6. Website designing
7. Online selling and marketing
2. कोचिंग
3. Youtube
4. Influencer
5. Amazon marketplace
6. Website designing
7. Online selling and marketing
सदर विषयांवर इथंभूत माहिती मी आपणास देणार आहेच, पण या विषयाव्यतिरिक्त तुम्हाला अजून काही माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा. आपले तज्ञ लेखक त्या विषयावर तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील.
ही लेखमाला लिहिण्यासाठी नेहमीच्या ब्लॉगपेक्षा जास्त मेहनत असणार आहे, वाचकांचा प्रतिसाद असेल आणि ईच्छा असेल तरच ही सिरीज पुढे सुरू राहील त्यामुळे कमेंटमध्ये आपले मत नक्की कळवा.
