प्रभा आणि विनीत आज दोघांनी मिळून केलेला संसार छानच बहरला होता... त्यांचा मोठा मुलगा फक्त नीट मोठ्या मराठी नॅशनल कंपनीमध्ये नुकताच कामाला लागला होता.... तर छोटी मुलगी प्रणाली तिचे कॉलेज शिक्षण पूर्ण करत होती..... प्रमाणे आपला संसार आपली मुलं खूप छान पद्धतीने सांभाळली होती.... ती दोन्ही मुलं आपल्या आई-वडिलांसोबत मन मोकळेपणाने बोलत होते..... असेच काही महिने निघून गेले....
एक दिवस प्रणित ने आपल्याला आपल्या ऑफिसमधली एक मुलगी आवडत असल्याचे घरच्यांना सांगितले.... घरच्यांनी तिची व्यवस्थित चौकशी केली आपल्या मुलाची आवड म्हणून प्रभा आणि विनीत दोघांनीही त्यांच्या लग्नाला मंजुरी दिली..... मोठ्या थाटामाटात लग्न करून दिव्या त्यांच्या घरात आली....
सुरुवातीचे दिवस चांगले गेले, पण जसे हळू वेळ जात होता दिव्या त्या घरात खुश नसल्याचे दिसून येत होते....... तिला एवढ्या माणसांमध्ये राहण्याची सवय नव्हती...... तिला तिचा एकांत पाहिजे होता.... हळूहळू प्रभाच्या या सगळ्या गोष्टी लक्षात येऊ लागल्या....
प्रभा ने विनीतला समजावले...... त्या दोघांनी प्रणित सोबत बोलून त्यांना दुसऱ्या घरात राहण्याचे सांगितले... त्यांचा निर्णय ऐकून दिव्या तर मनातून खूप खुश झाली होती परंतु प्रणितला ही गोष्ट मान्य नव्हती..... शेवटी प्रभा ने पुढाकार घेऊन आपल्या मुलाची समजुत काढली आणि त्या दोघांनी वेगळे राहण्यासाठी जाण्याचे ठरवले....
दिव्या त्या दुसऱ्या घरात मनमोकळे पणाने राहत होती.... तिची लाईफ एन्जॉय करत होती , पण प्रणित मात्र तिकडे पहिल्यासारखा खुश नव्हता..... त्याला त्याच्या आई-वडिलांची, बहिणीची आठवण येत होती..... दिव्या पण त्याच कंपनीत कामाला असल्यामुळे तिचाही मोठा फ्रेंड सर्कल होता..... दिव्याला घरची काम फारशी आवडत नव्हती...... फ्रेंड्स ला भेटणे, पार्टी करणे या गोष्टीतच तीचा दिवस जात होता.....
त्यांचे घर काही अंतरावरच असल्यामुळे प्रणित अधून मधून आपल्या घरात चक्कर मारत होता..... घरी आल्यावर आईच्या हातचे जेवण आवर्जून खात होता..... स्वतःसाठी आणि दिव्या साठी डबा बनवून घेऊन जात होता.....
" आता तर दुसरीकडे राहत आहे , त्यांच्या मनाप्रमाणे जगत आहे..... तरीही इकडूनच स्वतःसाठी आणि बायको साठी डबा घेऊन जातो..... तुझ्या बायकोला घरी करायला का नाही सांगत..... " खूप दिवस बघून शेवटी प्रणालीने आपल्या भावाला टोमणा मारलाच.....
" असू दे ग ! जशी दिव्या तिचे हट्ट पुरवण्यासाठी तिच्या माहेरी जाते, तसेच माझा मुलगा पण त्याचे हट्ट पुरवून घेण्यासाठी त्याच्या माहेरी येतोय.... " सभा ने गोड शब्दातच आपल्या मुलीची समजत काढली......
कधीकधी अधून मधून त्यांच्या घराकडे जाऊन प्रभा ने दिव्यालाही समजावण्याचा प्रयत्न केला .... आधी तर तिला त्यांचे म्हणणे पटत नव्हते परंतु हळूहळू विचार केल्यानंतर तिलाही काही प्रमाणात त्यांचे म्हणणे पटायला लागले......
आता दिव्याने घरात काम करण्यासाठी एक बाई ठेवली होती.... ती रोज त्यांना सकाळचा नाश्ता आणि टिफिन बनवून देत होती परंतु प्रणितला तिच्या हातचे जेवण फारसे आवडत नव्हते..... त्याला सतत आपल्या आईच्या जेवणाची आठवण येत होती.... तरीही त्याने कधीही दिव्याला आपल्या मनातले गोष्ट बोलून दाखवली नाही.... त्याच्या मनात घरच्यांबद्दल असलेली ओढ तिला सांगितली नाही.....
त्यांना वेगळे राहून आता जवळ जवळ वर्ष होत आले होते..... वेगळे राहायला गेल्यानंतर ती जास्त सासरी आलीच नव्हती, परंतु सासूच्या हातचा डबा मात्र आवर्जून खात होती..... आपल्या नवऱ्याचे बदललेले वागणे हळूहळू दिव्याच्या ही लक्षात येऊ लागले...... त्या व्यतिरिक्त आपल्या सासू-सासर्यांची ही आठवण तिला येऊ लागली ...... त्यांनी कधीच तीला कोणत्या बंधनात ठेवण्याचा प्रयत्न केला नव्हता, प्रणिता सारखं मुलीप्रमाणेच ते दिव्याला मानत होते....... तीलाच स्वच्छंद जगायचे होते म्हणून तिने वेगळ्या घरात राहणे निवडले होते, परंतु असे वेगळे राहून संसार होत नाही ही गोष्ट आता तिच्या चांगलीच लक्षात आली होती...... आपल्या नवऱ्याचे सुख कशात आहे हे तिला चांगले समजले होते.......
एक दिवस दिव्याने स्वतः प्रणित कडे सगळ्यांना भेटायला जाण्याचा विषय काढला..... प्रणितच्याही चेहऱ्यावर मोठीच्या मोठी स्माईल पसली..... दोघेही खूप आनंदाने आपल्या आपल्या घरी आले होते...... आपली सून येणार म्हणून आज प्रमाणे सगळ्या तिच्या आवडीचा स्वयंपाक बनवला होता....
दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती म्हणून सगळे मिळून छान गप्पागोष्टी करत जेवण करू लागले......
" आई मला माफ करा... " दिव्या मध्येच हळव्या आवाजात प्रवाहाच्या जावई येऊन बोलू लागली.....
" काय झालं ? अशी का बोलत आहे ? " प्रभा प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघून तिला विचारू लागतात.....
" आई मी फक्त माझ्याच सुखाचा विचार केला आणि म्हणून घरापासून वेगळी राहिले..... काय करू मला पहिल्यापासून वेगळीच राहण्याची सवय होती.... कॉलेजला असताना मी हॉस्टेललाच राहत होते आणि लग्नाच्या आधी पण त्यामुळे एवढ्या सगळ्या माणसात राहणे मला जमले नाही, पण मला आता चांगले समजले आहे की, संसार हा फक्त दोघांचा नसून यात पूर्ण परिवार असणे ही गरजेचे असते..... आपल्या सुखा दुःखात आपला परिवारच आपल्या मदतीला धावून येतो.... प्रणित आहे तुम्हा सगळ्यांना सोडून माझ्यासोबत आला होता, पण तो मनापासून खुश नव्हता...... " दिव्या रडक्या स्वरातच प्रभा आणि विनीत कडे बघून बोलू लागली......
" अग वेडा बाई, यात सारखे काय आहे.... जसा प्रणित आमचा मुलगा आहे तशी तू ही आता आमचीच मुलगी आहे.... मुलांच्या चुका आई-वडील पदरात नाही घालणार तर कोण घालणार.... आम्हाला तुमच्या वागण्याचा कधीच राग आला नाही....
एकच सांगेल, संसार जरी दोघांचा असला तरी तो सावरण्यासाठी त्यांना पूर्ण परिवाराची गरज लागते..... " प्रभा तिला आपल्या मिठीत घेऊन प्रेमाने समजावू लागली......
" आई आता मी दोघेही इकडे तुमच्या जवळच राहणार.... " दिव्या एक नजर प्रणित कडे बघून प्रभा ला बोलली पण तिचा हा एक निर्णय ऐकून प्रणित सोबतच घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद पसरला होता तो अतुलनीय होता.......
खरच तर आहे संसार हा फक्त दोघांचा असला तरी त्यात इतर माणसांचा सहभागही तेवढाच गरजेचा असतो. .. नातवंडांना त्यांच्या आजी आजोबांचे प्रेम मिळणे ही गरजेचे असते..... आपल्या डोक्यावर आपल्या थोरा मोठ्यांचे छत्र असणे फार आवश्यक असते....
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा