Login

जोगिण - मीरा आणि जनी

Meera And Jani Great Female Devotees

एक जोगीण
फिरते दारो दारी
खऱ्या भक्तीची भुकेली
उच्चारिते हरी हरी

कोणी तिला मीरा
म्हणती कोणी जनी
नावे जरी वेग वेगळी
भक्ती तिची खरी

मिरा सोडून संसार
झाली संन्याशीणी
जनी होऊनिया दासी
राबते नामदेवा घरी

हरी साठी वेड्या
झाल्या त्या अभाग्या
दंग झाल्या भक्ती रंगी
ठायी ठायी दिसे हरी

भक्ती रसात डुंबती
जन जोगिण म्हणती
त्याचं सम्राज्ञी असती
सावळ्यास प्रिय होती

मिरे चा श्याम सावळा
जनीचा विठ्ठल तो काळा
देह भक्तीत झिजविला
अंतकाळी हरी उभा राहिला


...... योगिता मिलिंद नाखऱे