Login

सावन में लग गई आग

हर एक फ्रेंड कमीना होता ह और जरुरी भी
मला मोठा आवाज आणि अंधार यांची खूप भीती वाटते. ते मिरवणूकीतील आजकाल वाजणारे मोठ मोठे डीजेनी तर एक दिवस हार्ट अटॅक येईल असं वाटतं.

सोडा ते तर आता नागपूरला वातावरण काय कल्पना असेलच सर्वांना. मुसळधार पाऊस सोबत विजांचा गडगडाट. इथवर ठीक होतं पण रात्री दोन ला एक जोरदार वीज लखलखली व लाईट्सही बंद झाली. झालं एका मागे एक सहा सात विजा कडकडल्या. बाजूला झोपलेल्या मुलाला भीती वाटेल म्हणून त्याच्या कानावर हात ठेवला सही पण तो गाढ झोपलेला अन माझं हृदय 120 च्या स्पीडने पळत होतं.

आधीच मोबाईल चाळत रात्री बाराला झोपलेली मी उठून बसली झाली. बेचैन वाटत होतं. इतक्या रात्री फोन करून कोणाला त्रास दिल्यापेक्षा व्हाट्सअप वरील मेसेज वाचून त्यात मन रामवायचा भोळा विचार माझ्या भाबड्या मनाने केला. व्हाट्सअप उघडून बघते तर अहाहा शाळेच्या ग्रुपमधे अजूनही चर्चा सुरु.

छान वाटलं. वाटलं उतरू चर्चेत म्हणजे लक्ष अंधार, आवाज यावरून दुर होईल. तर एक मैत्रीण म्हणते,

"आज सगळेच कसे जागी?"

मी आपली परिस्थिती सांगितली तर बया काय बोलली, "इसी मौसम में तो प्यार जवा होता है |"

दुसरी लगेच, "सावन में लग गई आग दिल मेरा हाय !"

मी म्हटलं, "काय ची आग? इथे जोरदार घेतोय तो वरचा आभाळावर बसून. वीज नाही म्हणून अंधार, गर्मी त्यात गडगडणारा आवाज.

उद्या ऑफिसला उशीर झाला तर बॉसने समजून घेतलं म्हणजे पावला देव."

तर मैत्रिणीचा मेसेज, "नक्की समजून घेईल गं. ती / तो ही बिझी असेल ना आता आगीत."

देवा, मेरे दिल को लगी गोष्ट ?. धन्य झाली मी इतक्या छान मैत्रिणी मिळाल्या.

असो उद्धीष्ट साध्य झालं माझं. धडधडनारं हृदय शांत होऊन हसू लागलं मेल्या मैत्रिणींमुळे❤️.

शुभरात्री.
0