विषय - प्रेमावरचा विश्वास.
भाग -1
भाग -1
" संपदा तुला काय वाटतं तोह लग्न करेल का तुझ्याशी ? " संपदा ची कॉलेज मैत्रीण मुग्धा बोलते.
संपदा आणि मुग्धा कॉलेजपासुन च्या चांगल्या मैत्रिणी आणि आता कॉलेज संपल्यानंतर दोघी ही चांगल्या कंपनीत कामाला लागल्या होत्या. पण दोघींची मैत्री मात्र तशीच टिकून होती.
संपदाला कॉलेज मध्ये असताना विशालशी प्रेम झालं, आता तोही चांगल्या कंपनीत कामाला लागला. पण तिचं अजुन ही त्याच्यावरच प्रेम आहे, आणि हे विशाल ला चांगलंच माहित आहे.
दोघेही एकमेकांना भेटणे, बाहेर हॉटेल मध्ये जेवायला जाणे. सुट्टीच्या दिवशी एकमेकांसोबत वेळ घालवणे सारं चालुच होतं.
" हो गं पण असं का विचारतेस..? आणि त्याच्या घरी तर आमच्या बद्दल माहित आहे. " संपदा बोलते.
" अगं पण हे कुठे माहिती की तोह तुझ्यावर प्रेम करतो ते, त्याने तुला तसं स्पष्ट सांगितलं का..? " मुग्धा तिला आठवण करुन देते.
मुग्धाच हे बोलणं ऐकुन तिला ही प्रश्न पडतो, पण इतक्या वर्षाच्या प्रेमावर अविश्वास कसा दाखवणार.
कॉलेज संपुन सात वर्ष झाली होती म्हणजेच त्या दोघांच्या प्रेमाला तितकी वर्ष उलटली होती.
" अगं असं काही नाही, आणि तसं ही मि पर्वा त्याच्या घरी जाणार आहे तेव्हा कळेलच की." संपदा तिला समजावते पण ती स्वतःच्या मनाला ही समजावत होती.
" तु त्याला स्पष्ट विचारावं असं मला तरी वाटतं, नाही तर उद्या असं नको व्हायला की प्रेम तुझ्याशी आणि लग्न दुसरीशी. तुला कळतंय ना मला काय म्हणायचं आहे ते..? " मुग्धा तिला समजावत होती, मुग्धा ने जे वाटलं ते तिला सांगितलं होतं.
संपदाच्या डोक्यात सतत तोच तोच विषय मुग्धाच बोलणं भोंग्या सारखं घोंगावत होतं.
संपदाच ऑफिस सुटतं, संपदा चालतं पायी ऑफिस च्या रस्त्यावरून निघाली होती, " खरंच असं होईल का, मुग्धा जे म्हणाली ते घडणार नाही ना.. माझ्याशी प्रेम आणि दुसरीशी लग्न असं तर विशाल करणार नाही ना.. " ती स्वतःशीचं बोलतं होती.
ती बॅग मधुन फोन काढते आणि विशालला फोन लावते, पण त्याचा फोन रिंग होऊन कट होतं होता.
" कुठे गेला असेल हा..? एव्हाना ह्या वेळेला त्याचा फोन लागतो. असो कदाचित घरी पोहचला नसेल म्हणुन.. जाऊदे घरी जाऊन आरामात बोलेन. आणि विशाल माझा विश्वास कधीच तोडणार नाही. " संपदा स्वतःशीचं बोलते.
आणि घरी येते, खांद्यावरची बॅग सोफ्यावर बाजुला ठेवुन थोडं आरामात बसते..
" काय गं आलीस... बरं तु फ्रेश हो तो पर्यँत मि जेवणाचं पाहते.. " आई संपदाला बोलते.
संपदा आई वडिलांची एकुलती एक मुलगी, बाबा लहानपणीच हृदय विकाराच्या झटक्याने गेले. त्यामुळे संपदावर आई ची जबाबदारी आली, शिक्षण चांगल असल्यामुळे नोकरीची काळजी नव्हती. आज चांगल्या पगारावर ती चांगल्या कंपनीत नोकरी करतेय.
क्रमश...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा