भाग -2
विषय - प्रेमावरचा विश्वास.
विषय - प्रेमावरचा विश्वास.
आईच्या बोलण्याकडे संपदाच लक्ष नसतं, आई जेवणं घेऊन बाहेर येते तरी संपदा सोफ्यावरच बसुन असते.
आईला काही तरी बिनसल्याच जाणवतं, " काय गं संपदा कसल्या विचारात बसली आहे. अगं जा जाऊन फ्रेश हो, मि जेवणं वाढते. "
संपदा भानावर येते, जाऊन फ्रेश होते. आणि जेवणाच्या ताटावर येऊन बसते.
आई तिला विचारते, " काय गं काही टेन्शन वगरे आहे का..? ऑफिसमध्ये काही झालंय का..? "
" नाही अगं काही नाही, ऑफिस चं कामं बाकी काही नाही." मुद्दाम ती आईला मनातलं सांगत नाही.
जेवणं होतात सगळं आटपून संपदा तिच्या रूममध्ये येते, आणि विशाल ला कॉल लावते तो पर्यँत तिच्या जीवात जीव नसतो. समोरून विशाल कॉल घेतो, कॉल उचलल्या उचलल्या, " अरे आहेस कुठे किती कॉल केला पण घेतलास नाही..? "
" अगं ऑफिस मधुन आता सुटलो, महिना अखेर ना कामाचं लोड खुप होता.. " विशाल बोलतो.
" बरं जरा बोलायचं होतं, तु लग्ना बद्दल घरी कधी बोलणार आहेस..? नाही आपण एकमेकांना खुप वेळ दिला, आता लग्नाचं उरकून टाकूया.. " संपदा बोलते.
" अगं इतक्यात नको, मला थोडं सेटल व्हायला वेळ हवा आहे. " विशाल बोलतो.
संपदाला भिती वाटते, " वेळ सेटल व्हायला.. अरे पण सेटल झालास ना मग अजुन किती होणार आहेस..? " संपदा विचारते.
" प्लीज यार थोडं समज, तुला विश्वास आहे ना माझ्यावर..?" विशाल बोलतो.
" आहे पण.. बरं ठीक आहे घे तु वेळ.. " आणि संपदा फोन ठेवते.
सुट्टीचा दिवस उजाडतो, संपदा त्याला काही न कळवता त्याच्या घरी जाते.
ती दारावरची बेल वाजवते, त्याची आई दरवाजा खोलते,' अरे वाह संपदा... ये ना आत ये.. " त्याची आई तिला आत घेते.
छान स्वागत करते, " बरं तु बस मि तुझ्यासाठी पाणी आणते.. " असं बोलुन त्याची आई पाणी आणायला आत किचन मध्ये जाते. संपदा ची नजर सारखी आत विशालला शोधत असते.
छान स्वागत करते, " बरं तु बस मि तुझ्यासाठी पाणी आणते.. " असं बोलुन त्याची आई पाणी आणायला आत किचन मध्ये जाते. संपदा ची नजर सारखी आत विशालला शोधत असते.
तो सुट्टीच्या वेळी जरा उशिराच उठतो, म्हणुन ती लवकर गेली होती.
त्याची आई पाणी आणुन तिच्या हातात देते, ती पाणी घेते,' काकु विशाल उठला नाही का..? "
" अगं उठला की आणि बाहेर सुद्धा गेला, तु त्याला कॉल नव्हता केलास का..? " त्याची आई बोलते.
" काय.. नाही मला वाटलं तो घरी असेल, म्हणुन म्हटलं सरप्राईज देऊया.. " संपदाला कळेनाच की काय बोलु.
सकाळचे दहा वाजले आणि हा घरी नाही आणि शिवाय मला काही बोलला देखील नाही.
सकाळचे दहा वाजले आणि हा घरी नाही आणि शिवाय मला काही बोलला देखील नाही.
क्रमश...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा