सुरज आणि रमेश घराबाहेरील अंगणात गप्पा मारत बसलेले होते.
“ कोणीतरी विचारलं तुमची ओळख काय म्हणून..मी एकच शब्द बोलून गेलो..
‘बुजगावणं’..
एकच हशा पिकला.मला कळलंच नाही, ते मला हसले की माझ्या आतील बुजगावण्याला? तरीही स्वतःला सावरत माझ्यातील विनोदी शैली आजच्या आपल्या ऑफिसमधील् हास्यस्पर्धेत पुढे कँटीन्यू करणं खरंच सोपं नव्हतं माझ्यासाठी!”

“ सुरज सर,तुम्ही आज अचानक असं का बोलताय?”
( मिश्किलपणे हसत)
“ रमेश,अरे तु तर इमोशनल झालास..”
“ रमेश,अरे तु तर इमोशनल झालास..”
“ नाही सर.तुम्ही आज काहीतरी वेगळं बोलताय.म्हणजे तुम्हांला काहीतरी गहन सांगायचं आहे.सर,मी तुमच्या सोबत दहा वर्षांपासून आहे.एवढं तर मी तुम्हाला नक्कीच ओळखतो..”
(पुन्हा मिश्किलपणे हसत,रमेशच्या खांद्यावर हात ठेवत ),
“हाय राम! शेवटी ओळखलंस तू..”
“हाय राम! शेवटी ओळखलंस तू..”
“ सर,प्लिज आता मस्करी नको.मी एकटाच आहे ना इथे?म्हणून तुमचं कन्फेशन किंवा मनातील जी काही जळमटं असतील ती आज झटकून टाका..प्लिज..”
धीर गंभीर होत,रमेशपासून दोन पावले पुढे जात सुरज म्हणाला,
“ आता बघ ना,घरासाठी रोज दहा दहा तास् काम करूनही,
बायको म्हणते,’तुझ घराकडे लक्ष नसतं,केवळ पैसा कमावणे आयुष्य नाही!’
मुलगी म्हणते,’माझा बाबा मला वेळच देत नाही.’
आई वडील म्हणतात,’तूच एकटा नोकरी करतोस ? आम्हीही केली आहेत कामं..’
”
सुरजने जोरात उसासा टाकला.

रमेश सुरजचा असिस्टंट होता पण तरीही आपल्यासारखीच् परिस्थिती सुरजची देखील आहे हे पाहून तो सुन्न झाला.
सुरजचे डोळे पाणावले.तो पुढे म्हणाला,
“बुजगावणे म्हणजे काय रे? शेतातील पिकांचे पाखरांपासून रक्षण करण्यासाठी उभी केलेली एक मानवनिर्मित पुतळासदृश्य वस्तू.असं म्हणतात की याचा उपयोग पक्ष्यांना 'भीती' दाखविण्यासाठी होतो. कोणीतरी व्यक्ती उभी आहे म्हणून पक्षी पिकांचे नुकसान करीत नाहीत.काड्यांचे 'अधिक' (+) असे चिन्ह तयार करून त्यास शर्ट/अंगरखा घातला जातो.मग छोट्या मडक्याला ओल्या चुन्याने डोळे,नाक व तोंड रंगविले जाते व ते वरच्या टोकास उपडे घालण्यात येते.तयार झालेल्या अश्या बुजगावण्यास मग पिकांमध्ये रोवण्यात येते.झाला शेताचा रक्षणकर्ता तयार.मी सुद्धा ,असाच उभा आहे कुटुंबासाठी,त्यांच्या रक्षणासाठी,ज्याला काहीच किंमत नाही. ”

क्षणभर दोघेही शांत बसले..
तेवढ्यात् सुरजला सुजाताने आवाज दिला. सुरजसह रमेश सुजाताच्या( सूरजची पत्नी) आग्रहात्सव घरात आला.
सुरजची मुलगी विशू, सुरजला पाहताच म्हणाली,
“ बाबा,भाजीवाले काका सांगत होते की,त्यांच्या शेतात एक बुजगावणे आहे म्हणून!हे बुचगावणं शेतातील पिकांचे रक्षण करतं तसेच इतरांच्या वाईट नजरेपासूनही शेताचा बचाव करतं. मग बाबा, एवढं इम्पॉर्टंट आहे का हे बुजगावणे शेतकऱ्यांसाठी?”

सूरज आणि रमेश एकमेकांकडे पाहू लागले.
परिस्थिती व्यवस्थित हाताळत सुजाता मध्येच् म्हणाली,
“ हो,मग! आता बाबाच बघ ना! ते आपल्यासाठी बुजगावणे कम हिरो आहेत.”
परिस्थिती व्यवस्थित हाताळत सुजाता मध्येच् म्हणाली,
“ हो,मग! आता बाबाच बघ ना! ते आपल्यासाठी बुजगावणे कम हिरो आहेत.”
आता मात्र सुरज आणि रमेश जवळपास उडालेच.
सुजाता पुढे म्हणाली,
“आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी दिवसातील दहा घंटे बाबा ऑफिसमध्ये असतात्. त्यांचे शिक्षण आणि संस्काररूपी रंगरंगोटी तुझ्या आजी आजोबांनी केली.त्यांना स्वतःच्या पायावर उभ केलं. माझं आणि प्रीती आतूचं घरातील पुरुष म्हणून वाईट नजरांपासून संरक्षण देखील बाबा करतात.बाबा अगदी अभेद्य अशा बुजगावण्यासारखे आपल्या सर्वांच्या पाठीशी उभे आहेत् म्हणून आज आपण सुरक्षित आहोत असे सर्वांना वाटते.हो की नाही हो? ”

सुजाताच्या प्रश्नावर गोंधळून सुरजने मान डोलवली. रमेशने चोरी पकडल्यागत सुरजकडे पाहिले.जवळपास दोन तीन मिनिट ते दोघेही असाहाय्य झाल्यासारखे उभेच होते.
“ येताय् ना जेवायला?”
सुजाता दोघांना उद्देशून म्हणाली.
सुजाता दोघांना उद्देशून म्हणाली.
एव्हाना सुरज आणि रमेशला कडाडून भूक लागली होतीच.
“ हो.”सूरज म्हणाला.
विशूचा हसरा चेहरा सुरजला नेहमीच समस्यांचा विसर पडायला भाग पाडत असे. त्यामुळे सर्वांनी आंनदात जेवायला घेतलं.
विशूला मात्र आपला बाबा ‘बुजगावणं’ कम सुपरहिरो वाटत होता. आज ती बराच वेळ तिच्या बाबाकडे,सुरजकडेच बघत होती.तिच्या नजरेत बाबाबद्दल एक वेगळीच चमक जाणवत् होती.
थोड्या वेळातच सर्वांची जेवणं आटोपली.रमेश् देखील त्याच्या घरी गेला.
सुरज खोलीत गेला.सुजाता पुस्तक वाचत बसली होती.
“ काय म्हणालीस तू मला मघाशी?”सुरज्
“ काय म्हणालीस तू मला मघाशी?”सुरज्
“ कशाबद्दल बोलतो आहेस तू?” सुजाता
“ तू मला बुचगावणं म्हणालीस?”सुरज
सुजाता चांगलीच घाबरली. आपले चुकलेच असा ग्रह मनात करून ती ओशाळली.
“ माफ कर सुरज मला. मी खरंच चुकले. विशूला समजावण्याच्या नादात मी काय बोलून बसले याचा मलाही थांगपत्ता लागला नाही.”सुजाता
सुरजने फणकाऱ्यातच भिंतीकडे तोंड केले.
‘सुरज माझ्यामुळे फारच दुखावला गेला ,मी त्याचा स्वाभिमान दुखावला,मीच त्याचा आत्मविश्वास कमी केला,’हा विचार सुजाताला सतावू लागला.तिने सुरजचे पाय पकडले आणि म्हणाली,
“माफ कर मला सुरज.मी तुला सर्वांसमोर असे म्हणायला नको होते. हवं तर तू मला कुठलीही शिक्षा दे पण तू असा माझ्यावर रागावू नकोस.प्लिज..”
सुजाता अगदी काकूळतीला येऊन बोलत होती.
सुजाता अगदी काकूळतीला येऊन बोलत होती.
सुरजने सुजाताला हळूच उभे केले. तिचा हात हातात घेतला व् म्हणाला,
“ वेडाबाई,बुचगावणं ही परिभाषा समजून सांगितल्याने तू मला माझा स्वाभिमान,आत्मविश्वास,जगण्याचं ध्येय सार काही मिळवून दिलं आहेस. माझ्या मनातील ओझे हलके झाल्याने आता मला खुप् छान वाटतंय. माझ्या विशूसाठी आता मी रिअल सुपरहिरो ठरलो आहे.”

“ तू आहेसच आमचा बुचगावणं कम सुपरहिरो..”
लहानगी विशू मागून येत दोघांनाही अलींगन् देत म्हणाली.
लहानगी विशू मागून येत दोघांनाही अलींगन् देत म्हणाली.
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा