एक उनाड वाट भाग 10
"इंदिरा फक्त तीन जोडी कपडे घेऊन जाशील तु त्या करोडपती आजीची असिस्टंट बनून तिथं राहायला?" मिनूनं इंदिराला विचारलं.
"हो. त्यात काय एवढं !"
"अगं मी म्हटलं 2-3 टॉप ऑर्डर करते मिंत्रा वरून तुझ्यासाठी. मला फार्म हाऊसचा ऍड्रेस देऊन दे मिस्टर सुबोधला विचारून."
"मिनू, असू दे गं ! जॉब करायला जात आहे तिथं मी. ह्या तीन जोडी कपड्यात होईल माझं."
"तु तीच इंदिरा आहेस ना जिला प्रत्येक सणवाराला, वाढदिवसाला आणि लग्न कार्याला नवीनच कपडे लागायचे. आणि लग्नासाठी तर तु किती कपड्यांची खरेदी केली. ते बघून तूझ्या बाबांना चक्कर आली होती असं ऐकलं मी आता नागपूरला गेली तेव्हा."
"हो गं मिनू, खूप नसती खर्चाची कामं केली मी. बघ ना इतकं काही फक्त त्या एका दिवसासाठी. मूर्खच होती मी. म्हणूनच ठरवलं आता अजिबात ह्या चिंध्यांसाठी पैसे खर्च करायचे नाही."
style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">
"बरं बाई ! तूझ्यापुढे देव आले तरी नाही ऐकणार तु."
"हो. "
इंदिराचा फोन वाजला.
"यस सर !"
"मी आलो आहे बिल्डिंगसमोर कार घेऊन." सुबोध इंदिराला फार्म हाऊसवर घेऊन जायला आला.
"हो सर, आलीच मी."
"इतक्या लवकर आला हा माणूस?"
"मिनू बारा वाजले दुपारचे. चल जाऊ खाली."
"आय मिस यु !" इंदिराला मिठीत घेऊन मिनू रडू लागली.
"वेडे रडतेस कशाला? तुला जेव्हाही आठवण आली माझी, येऊन जायचं फार्म हाऊसवर. मी तिथं असे पर्यंत आपलंच घर आहे ते."
"हो, काहीही !"
"काय ओम, बरोबर ना माझं?"
"साष्टांग नमस्कार माते." ओमने इंदिराला गंमतीत हात जोडले.
"माझ्या मैत्रिणीचं लक्ष ठेवा ओम."
"हो, नक्कीच ठेवेल. तुही स्वतःला जप आणि काहीही मदत लागली तर निसंकोच आम्हाला कॉल कर."
"हो, मी रोज रात्री तुम्हा लोकांना कॉल करत जाईल. खूप सवय झाली तुमची. तुमच्या वाचून कसं होईल माझं?"
"मग नको जाऊ अशी एकटी. राहू दे !"
"मिनू बॉण्ड साइन केला आहे मी, जावं तर लागणारच. तुमचंही काम सुरु होईल लगेच. आपण आपल्या कामात बिझी होऊन जाऊ. मग इतकी कमी नाही भासणार एकमेकांची."
"आता काय म्हणू तुला?"
"लवकर भेटू, असं म्हण !"
"चालायचं?" ब्लॅक पोर्श (Porsche) कार समोर ब्लॅक सूटमध्ये उभ्या असलेल्या सुबोधने इंदिराला विचारलं.
"हो." इंदिरा हो म्हणाली तसा ड्रायव्हर डिक्की उघडून तिच्या बॅग घ्यायला पुढे झाला, "अरे राहू द्या. माझ्याकडे ही छोटी पर्स आणि ही एक छोटी बॅकपॅक इतकंच आहे."
इंदिराला कम्फर्टेबली बसता यावं म्हणून सुबोध ड्रायव्हिंग सीटच्या शेजारच्या सीटवर बसला. इंदिरा तिच्या बॅग सोबत मागच्या सीटवर आरामात बसली आणि सर्वांना बाय बाय करत गाडी कर्जतला रवाना झाली.
style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">
"कसं वाटतंय मग? टेंशन नाही आलं ना?" सुबोधने इंदिराला विचारलं.
"हा थोडंस आलं आहे. म्हणजे पहिल्यांदा असं चारचाकीत, तेही पोर्श गाडीत बसून जातेय ना. सगळं वेगळंच वाटतेय."
"मी आशा आजीला भेटण्याबद्दल, नवीन लोकांमध्ये राहण्याबाबत टेंशन आलं का विचारतोय."
"नाही त्याबद्दल अजिबात नाही. सांभाळून घेईल. लाईफ या 15-20 दिवसात इतकी चेंज झाली आहे की आता काहीच वाटत नाही. पण एका प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायची उत्सुकता आहे. विचारू?"
"हो विचार ना. आपल्या जवळ भरपूर वेळ आहे."
"आशा मॅमला त्यांचा NRI मुलगा सोबत का नाही घेऊन राहत. म्हणजे इथे कर्जतला एका फार्म हाऊस वर त्यांना एकटं ठेवलं आहे. त्यांच्यासाठी सात आठ माणसं ठेवली आहेत. इतका ताम झाम त्यापेक्षा सोबत ठेवणं कधीही चांगलं ना."
"हुम्म्म !" सुबोधला तिचा विचार पटला. स्मित करत त्यानं स्वतःला सांगितलं 'ही मुलगी सरांची वाट लावणार !'
"काही म्हटलं का?"
"नाही."
"मग सांगा नं मला आशा मॅमच्या कुटुंबाबद्दल ! म्हणजे मला त्यांना असिस्ट करतांना कसं वागायचं ते समजणार."
"इंदिरा, काय आहे ना काही घरात कर्ता माणूस दिवसभर कामात असतो आणि म्हातारी मंडळी घरात. त्यामुळे बाहेरचा माणूस घरी येताच त्यांना उत्सुकता असते की त्या माणसानं दिवसभरात काय केलं काय नाही हे आपल्याला सांगावं, चार गोष्टी आपल्याशी बोलावं. पण जो बाहेर कामाला जातो त्याला वाटतं या म्हाताऱ्या व्यक्तीला आपण काय केलं काय नाही ते सांगून काय उपयोग? काय करणार आहेत हे ते ऐकून? आणि मग त्यांच्यात वाद जन्माला येतात. असंच काही इथेही आहे. आशा मॅमचा मुलगा म्हणजे माझे सर, अमन सिन्हा यांचा काही वर्षांपूर्वी डिव्हॉर्स झाला."
"अमन सिन्हा म्हणजे आशा मॅमचं पूर्ण नाव आशा सिन्हा !माझ्या नशिबात सगळे सिन्हाच आहेत का?" इंदिरानं स्वतःला विचारलं.
"काही बोललीस का?"
"नाही. तुम्ही पुढे काय झालं सांगा ना !"
"हो तर सरांचा डिव्हॉर्स झाल्यावर त्यांची पहिली पत्नी मालती मुलाला घेऊन वेगळी राहायला गेली. सरांनी दुसरं लग्न केलं. एक किशोरवयीन मुलाचा बाप असतांना असं दुसरं लग्न करणं आशा मॅमला ते पटलं नाही. त्या, का? कशाला? कशामुळे? असे प्रश्न करायच्या. साहेबांना उत्तर देणं महत्वाचं वाटत नव्हतं. वाद वाढत गेले. त्यातच मॅमला लखव्याचा अटॅक आला. साहेबांना व्यवसायानिमित्त दौऱ्यावर राहावं लागतं. मॅमला त्यांच्या दुसऱ्या बायको सोबत राहायचं नव्हतं म्हणून मग साहेबांनी त्यांना इथे कर्जतला फार्म हाऊसवर ठेवलं."
"अच्छा ! मग त्यांच्या मुलाचं आणि बायकोचं काय झालं?"
"त्यांचा मुलगा एक..... " सुबोध बोलता बोलता थांबला. त्यानं एकदा इंदिराकडे पाहिलं, 'ही तर माझ्याकडून पूर्ण माहिती काढून घेत आहे. आणि मी बोलण्याच्या ओघात तेही सांगणार होतो जे नाही सांगायचं.
"काय झालं सर?"
"अगं बाहेर बघ. तो दिसतोय ना, तो डोंगर, ते माथेरान आहे." सुबोधने विषय बदलला.
"खरंच! माथेरान इतक्या जवळ आहे कर्जतच्या?"
"हो. कर्जतवरून नेरळला जायचं आणि ट्रेनने माथेरानला."
"किती सुंदर निसर्ग रम्य !" कारच्या खिडकीतुन बाहेर डोकावून निसर्गाचा आनंद घेऊ लागली. सुबोधच काम झालं.
"पावसात खूप मज्जा येईल इथे." इंदिरा दुतर्फा झाडांना पाहुन म्हणाली.
"हो !" एक टी पॉईंट सुबोधला दिसला तसं तो ड्रॉयव्हरला म्हणाला, "दिपक गाडी थांबवं."
"वडा पाव खायचा गरम गरम." त्यानं इंदिराला विचारलं.
"नेकी और पूछ पूछ!"
गरमा गरम वडा पाव पोटात गेल्यावर कार सरळ एका हिरव्या गार गवत आणि आंब्यांच्या झाडांनी घेरलेल्या टुमदार कौलारु वाड्यासमोर येऊन थांबली. वाड्याच्या भिंती जुन्या लाल दगडाने बांधलेल्या दिसत होत्या. वाड्याच्या एका बाजूला मोठया तोंडाची विहीर तर दुसऱ्या बाजूलाच एक पवन चक्की सारखा फॅन लावला होता.
इंदिरा त्या वाड्याला निरखून पाहु लागली.
"हिच आपली मंजिल !" सुबोध तिला म्हणाला.
"हा वाडा तर अगदी गाव खेड्यातल्या सारखा दिसतोय. माझ्या बाबांच्या आजोबांचं.... "
"म्हणजे पंजोबांचं !" सुबोध मधेच बोलला.
"हो तेच ते, पंजोबांचं घर असंच आहे गावाला. पण त्याला काहीच किंमत नाही आता. गुरांचा वाडा झालाय तो कारण माणसांना शहरं प्यारी झालीत. पण मला नेहमी वाटायचं की मी तिथे जाऊन राहावं." इंदिराच्या चेहऱ्यावर मोट्ठी स्माईल आली.
"हा प्राणी अजबच आहे ! इतरांना ज्याचा तिटकारा येतो ते हिला आवडते." आतापर्यंत शांत असलेला ड्रायव्हर दिपक, सुबोधला म्हणाला.
style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">
सुबोधने तोंडावर बोट ठेऊन त्याला चुप राहायचा इशारा केला.
"अरे वा मग तर तुझ्या मनातलं झालं. यांचंही हे आजोबा पंजोबांनी बांधलेलं घर आहे." सुबोधने माहिती पुरवली.
"मस्त ! चला आत जाऊन बघू." इंदिरा अशी बोलली जसं काही ती तिच्या मामाच्या घरी आली. सुबोधने तिला थांबवलं.
नर्स आशा आजीला घेऊन बाहेर आली. अंगावर पिवळा प्रिंटेड गाऊन, काळे केस (ओरिजिनल ), कपाळावर काळी टिकली, नाकात छोटीशी बेसर, कानात सोन्याची नाजूक डोरली, गळ्यात मोत्यांची माळ, हातात चांदीच्या जाड पाटल्या, पायात चांदीचे तोडे, अशा व्हिलचेयरवर बसलेल्या आजीला पाहताच इंदिरा त्यांच्या पाया पडली.
"बस, मला हे असलं प्रदर्शन अजिबात आवडत नाही." पहिल्याच भेटीत इंदिराला त्यांच्या रागाला सामोरं जावं लागलं. ड्रॉयव्हर दीपक, सुबोध, माळी दादा, स्वयंपाकी काका, घरकाम करणारी शोभा आणि नर्स उषा सर्व मंडळ शिक्षा दिल्यासारखे हातांची घडी, तोंडावर बोट ठेऊन एकमेकांना टकमक पाहु लागले.
"माणसाच्या मनात भाव असायला हवा. या सुबोधने सांगितलं का काही माझ्याबद्दल?" आजीनं सुबोधकडे पाहुन इंदिराला विचारलं.
"नाही अजिबात नाही. मी तर माझ्या आजीच्या पाया पडून दर्शन घेते त्यांचं, तसंच तुमचंही घेतलं."
"इतका आदर आजीबद्दल ! मग तिला सोडून का आलीस?"
"बाबा माझं लग्न हुंडा देऊन एका मुला सोबत लावणार होते."
"त्यात काय नवीन? लग्न म्हटलं की हुंडा पाणी आलंच."
"हो आमच्या लग्नाच्या दिवशी तो ऑफिसरची परीक्षा पास झाल्याचं कळलं आणि त्यानं अचानक कारची मागणी केली. मला वाटलं आताच हा इतका त्रास देतोय पुढे मुलबाळ झाल्यावर कसं करायचं? म्हणून मी मंडपातच लग्न मोडलं. घरी सर्व खूप नाराज आहेत. म्हणून... "
"म्हणून पळून आलीस."
"नाही, सांगून आली."
"त्यात फरक काय?" आजीने फणकारलं, "जाऊ दे ते इथे कशाला आलीस?"
"तुम्हाला असिस्ट करायला, तुमच्या सोबत राहायला."
"हे चार पाचही माझ्या सोबतच राहतात. यांच्यात आणि तुझ्यात फरक काय?"
"मी तुम्हाला कधीच एकटं नाही वाटू देईल आणि बोर नाही होऊ देईल." इंदिरा आत्मविश्वासाने म्हणाली.
"ठीक आहे लाग कामाला."
"म्हणजे?"
"मला बोर होतंय. कर काही ज्यानं मला छान वाटेल."
"इथे?"
"हो इथेच. मला छान वाटलं, माझी बोरीयत दूर झाली तरच तुला आत एंट्री मिळेल नाहीतर आलीस तशी निघून जा या सुबोध सोबतच." आशा आजींनी हुकूम सोडला.
नर्स उषाला इंदिराची कीव आली तर माळी दादा आणि स्वयंपाकी काका, 'अब तेरा क्या होगा कालिया?" अशा तर्हेने इंदिराला बघू लागले. सुबोधला मात्र खात्री होती की ही मुलगी इथून परत जाणार नाही.
इंदिराने आजूबाजूला पाहिलं. जमिनीवर छोटे छोटे खडे विखुरलेले दिसले. त्यातील दहा बारा गोलाकार, गुळगुळीत खडे तिने जमा केले. जाऊन आजी समोर अंगणात बसली. सर्व खडे हवेत फेकून उलट्या हातावर झेलले. जमिनीवर पडलेले गेले आणि झेलले इंदिराचे. मग तिनं उलट्या हातावर झेललेले खडे परत सरळ हातावर झेलून बाजूला ठेवले आणि एक खडा हवेत उडवून इतर खडे उचलायचा प्रयत्न केला. पण ती ते इतर खडे उचलायच्या आधीच हवेतील खडा खाली आला.
"ए हरली तु. चल मी खेळते." आजीला काहीतरी हरवलेलं गवसल्या सारखं झालं. त्यांनी माळीला हुकूम सोडला, "लवकर तो माझ्या मांडीवर ठेवायचा पाट आन."
पाट मांडीवर ठेऊन त्या खेळू लागल्या. त्यांना ते खेळतांना मज्जा येऊ लागली.
"काय गं तुला हा खेळ कसा माहित?"
"माझ्या आजीनी शिकवला मला आणि माझ्या बहिणीला. ती खेळायची आमच्या सोबत."
"नाव सांग मग या खेळाचं."
"नाव?" इंदिरा डोकं खाजवून विचार करू लागली. नाव तर आठवतच नव्हतं. छोटे छोटे खडे म्हणून ती म्हणाली, "गोटया!"
"गधडे, फक्त गोटया नाही सागरगोटया म्हणतात या खेळाला आणि हे खडे नाही, सागर गोटया वापरता खेळायला."
"हो पण आम्ही खड्यांनीच खेळायचो."
"घे तुझी डाव. खेळ!"
इंदिरा शांतच बसलेली. तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं तिला काहीतरी त्रास होतोय म्हणून.
"खेळ ना ! काय झालं?" आजीनी लटक्या रागातच विचारलं.
"वॉशरूमला जायचंय." हाताची करंगळी दाखवत इंदिरा म्हणाली, "खूप जोरात आली."
"इथेच करणार का मग?" त्यांनी गंमतीने विचारलं," जा बाथरूम मधे." इतकं म्हणून आजी खूप हसल्या. शोभाने इंदिराला बाथरूम दाखवलं.
"मी काय करू? जाऊ की थांबू?" सुबोधने विचारलं.
"ती आत गेली ना !"
"हो."
"मग तुझं काम संपलं.'' आजीनी नर्सला व्हिल चेयर आत घ्यायला खुणावलं, "शोभा इंदिराच्या बॅग गेस्ट रूममधे नेऊन ठेव."
शोभा बॅग घ्यायला दिपकजवळ आली, "कसा आहेस तु?"
"मजेत !" दिपक तिच्याकडे लाडानं बघत म्हणाला, "तु कशी आहेस?"
"मीही मजेत." ती दोन्ही हातांची बोटं एकमेकांत गुंतवून आणखी लाडात म्हणाली.
"बॅग शोभा !'' आजीनी परत आवाज दिला.
तशी शोभा दिपकच्या हातातल्या बॅग घेऊन पळत आत गेली.
...................
काय मज्जा येतेय की नाही वाचायला?
आपला प्रतिसाद मला भारावून सोडतोय. खूप खूप आभारी !
style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">
धन्यवाद !
©®अर्चना सोनाग्रे वसतकार
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा