Login

एक उनाड वाट #मराठी_कादंबरी भाग-30

Thankyou

आधीचा भाग खालील लिंकवर वाचा

http://www.irablogging.com/blog/a-wandering-path-part-29_6427
एक उनाड वाट 30
इंदिरा पहाटे पाच वाजताच उठून बसली. अनुभवसाठी तिचं मन बेचैन झालं होतं. थोडावेळ डोकं पकडून बसलीच. मग उठून सकाळचे अंघोळ वगैरे आटोपलं. दुधपावडर पाण्यात मिक्स करून चहाचे आंधन गॅसवर ठेवलं. तोच जोरात कोणीतरी गाण्याची रिहर्सल करायला लागलं,

"तेरी खता है मेरे जिया,
तेरी खता है मेरे जिया,
उनपे भरोसा क्यू तुने किया,

सब झुठे झुठे वादे उनके,
चल पीछे पीछे आया तु जिनके,
वो पिया आये ना...... "

क्षण भरासाठी तिला वाटलं कोणीतरी तिच्यासाठीच हे गाणं म्हणत आहे. तिचा उर भरून आला. चहाचे आंधन करपले. ते बेसिनमधे टाकून इंदिराने पर्स घेतली आणि ती अनुभवला भेटायला निघाली. तिचा फोन वाजला.

"बोल मिनू. कधी येणार परत."

"आठ दिवस काहीच खरं नाही. मी इतकंच सांगायला फोन केला की त्या अनुभवला विसर. अजिबात भेटू वगैरे नको त्याला."

"मिनू प्रेम करणं काही गुन्हा नाही."

"मग तूझ्यासोबत काय सागरगोट्या खेळत होता का? तुला  तिकडे अभ्यासाला याचसाठी पाठवलं होतं का की त्याला अय्याशी करता येईल म्हणून."

"मिनू अशी का बोलतेस? त्यानं लग्न करून फसवलं नाही मला. खरं तर मला वाटतं तो मुद्दाम असा वागतोय. काहीतरी मजबुरी आहे त्याची."

"तु झोपेतून जागी हो. काहीच मजबुरी नाही त्याची. लवकरच तो एक किसिंग सीन देणार आहे मॅडम दिव्या सोबत. आजपर्यंत त्यानं कधीच कोणासोबत किसिंग सीन दिला नाही. म्हणून म्हणतेय दूरच राहा त्या स्वार्थी माणसापासून."

"मी प्रयत्न करते."

"ओके, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन !"

"तीन वेळा अभिनंदन?"

"एक मेन्ससाठी, दुसरं मुलाखतीसाठी आणि तिसरं तूझ्या जीवनात लवकरच नवीन येणाऱ्या some one special साठी."

"धन्यवाद !''

"मिनू इतके एफर्टस का घेतेय मी अनुभवकडे जाऊ नये म्हणून?" अनुभवच्या घरी जायला कॅबमधे बसलेली इंदिरा विचार करू लागली.

ती अनुभवच्या घरी पोहोचली तेव्हा दिव्या तिच्या अडीच तीन  वर्षाच्या मुलासोबत गार्डनमधे खेळत होती. तो बरोबर दुडू दुडू धावत,
"दीदी दीदी " करत इंदिराकडे आला. इंदिरानी त्याला उचलून कडेवर घेतलं. गोरा गोरापान फुलासारखा छान, सशासारखा मऊ, घाऱ्या डोळ्यांचा, गुलाबी ओठांचा. इंदिरा त्याचा लाड करू लागली. 

 तर दिव्या धावतच बंगल्याच्या आत गेली. इंदिराला आश्चर्य वाटलं. लेकराला सोडून असं कोणी जातं का? काय बाई आहे. इंदिरा मुलाला घेऊन आत गेली. अनुभव दिव्याचा हात पकडून तिच्यासमोर आला.

"कसे आहात ?" इंदिरानं त्याला विचारलं.

"....... " तो काहीच न उत्तरता तिच्याकडे एकटक बघत हरवून गेला जुन्या आठवणीत. इंदिरा आज जिन्स टी शर्टमधे तशीच भासली जशी त्यांच्या पहिल्या भेटीत त्याच्या नजरेला पडली होती. तसाच मेकअप रहित चेहरा. केसांची लांबसडक वेणी. तोच साधेपणा. तीच निरागसता आणि रडून रडून सुजलेले डोळे.

"आउच !'' दिव्यानं त्याच्या हाताला नख टोचलं आणि इंदिरा समोर आहे. भानावर ये. असं नजरेनंच त्याला सांगितलं.

"मी एकदम फिट आणि फाईन आहे." अनुभव दिव्या सोबत खूप खुश असल्याचं दाखवत  उत्तरला.

"दिसतच आहे." त्यांचा ड्रामा तिच्या लक्षात येऊ लागला.

"तु  इथे मुंबईत परत कशी काय आलीस?"

"तुम्हाला खरंच नाही माहित?"

"नाही. मला कशाला माहिती असायला हवं? आता मला जे काही माहिती असायला हवं ते फक्त आणि फक्त दिव्याबद्दल." तिच्या खांद्याभोवती हात टाकून तो बोलला. पण दिव्या अस्वस्थ दिसत होती. इंदिराच्या येण्यानं तिचं टेंशन वाढलं. इंदिरानं ते अचूक हेरलं.

"हो तेही आहे."

"हाय इंदिरा ! फायनली आपण भेटलोच." इंदिराचे लक्ष तिच्यावरच आहे हे समजताच दिव्या तिला म्हणाली.

"हो. तु टीव्हीत दिसतेस त्यापेक्षाही खूपच सुंदर आहेस."

"थँक्यू ! कशी आहेस तु?"

"मी एकदम छान. तु?"

"मी मजेत आहे. मला जे हवं होतं ते मिळालं. माझा अनुभव माझ्यासोबत आहे. लवकरच आम्ही लग्न करू." दिव्यानंही अनुभवचा हात घट्ट पकडला.

"आता का दारातच सगळं बोलता. घरातही नाही घेणार का तिला." आजीला इंदिराच्या येण्याची चाहूल लागली जणू, "काय गं दिव्या घरी आलेल्या पाहुण्याचे स्वागत करायला नाही शिकवलं का माय बापानं. अन हात सोड त्याचा. लग्न होणार आहे. झालं नाही." आजीची फायरिंग बघून त्यांची चिडचिड इंदिराच्या लक्षात आली. दिव्याने पटकन तिच्या मुलाला घेतलं आणि आत गेली.

"आजी, इतका ताण नाही घ्यायचा." इंदिरा आजीला म्हणाली.

"ताण नाही घेणार तर काय? तूझ्यासारख्या सोन्याला सोडून पितळेच्या मागे लागला. बापावरच गेला." आजी अजूनच त्रागा करून बोलली. 

अनुभव काहीच न बोलता दिव्या दिव्या करत तिच्या मागे गेला.

"बघ कसा मागे गेला तिच्या. कळत नाही काय जादू केली अनुभववर तिनं."

"आजी रिलॅक्स व्हा. मी तुम्हालाच भेटायला आली इथे."

"अगं पण वाईट वाटतं मला."

"आजी मला भूक लागली. मी नाश्ता नाही केला अजून.  " इंदिराने विषय बदलला.

"हो का, चल उषा नाश्त्याला बघ काय आहे?"
आजी सोबत नाश्ता करून इंदिराने आजीला तिच्या खोलीत नेऊन दिलं. परत भेटायला येईल असं सांगून हॉल मधून बाहेर पडू लागली. तोच अनुभवन एकाकी तिच्या समोर आला. ती आधी सारखीच त्याला बघताच फ्रिज झाली. त्यानं तिच्या गालावर थपकी दिली,

"इंदिरा बंद कर हे नाटक."

"अंS.. " ती भानावर आली.

"इंदिरा तु का आलीस इथे?" अनुभवनी रागानं विचारलं. "बघितलं ना आजी हायपर होतेय. दिव्या फुगून बसली आहे तिकडे."

"आणि तुम्ही?"

"मी काय? तुला सांगितलं होतं ना मला तुझ्यात काहीच इंटरेस्ट नाही उरला. तरीही कशाला आलीस इथे. तुला काही हवं होतं तर ओशिनला कॉल करायचा होता."

"तुम्हाला बघायचं होतं, तुम्ही किती आनंदी आहात ते बघायचं होतं म्हणून आली इथे."

"झालं बघून, जा आता आणि परत प्लीज येऊ नकोस."

"मी जाते. आधी मला खरं खरं सांगा तुम्ही इतकं नाटक का करताय? सरळ सरळ कारण सांगून द्या मला माझ्यापासून दूर होण्याचं. मी परत कधीच फिरून पाहणार नाही इकडे.''

"सांगितलं ना माझं पहिलं प्रेम दिव्या माझ्या आयुष्यात आली. आणि मला रिअलाइज झालं की मी तिच्यासोबतच आनंदी राहू शकतो. तूझ्या सोबत नाही."

"खरंच! मग भिंतीकडे बघून कशाला बोलताय? माझ्या नजरेला नजर देऊन बोला." इंदिरा त्याच्या टी शर्टची कॉलर पकडून म्हणाली.

अनुभवला वाटलं तिला आपल्या मिठीत घेऊन घ्यावं आणि सांगावं तो किती प्रेम करतो तिच्यावर ते. पण त्यानं लगेच तिला दूर केलं.

"मिस्टर अनुभव, तुम्हाला कॅन्सर वगैरे आहे का? मी तुमची विधवा म्हणून जगायला तयार आहे. पण तुम्ही असं तोंड नका फिरवू माझ्याशी."

"आय एम व्हेरी मच फिट अँड फाईन. अजून पन्नास वर्ष तर नक्कीच जगेल मी. तेव्हा हे फालतू विचार काढ मनातून आणि तुझ्या करियरवर लक्ष दे."

"माझ्या करियरची चिंता करायची तुम्हाला काहीच गरज नाही."

"इंदिरा तु जा ना. अनुभवला खरंच तुझ्यात इंटरेस्ट नाही." मुलाला झोपवून दिव्या बाहेर आली. 

"दिव्या तु आमच्यात पडू नकोस. तु इथे का आली आहेस  याचा पत्ताही लावूनच राहणार मी. आणि लवकरच इथून चालतं करणार तुला."

"इंदिरा प्लीज गेट आउट." अनुभव तिला ओरडून बोलला. 

इंदिराने लाली चढलेल्या डोळ्यांनी अनुभवला बघितलं आणि ती धावतच बंगल्याच्या बाहेर पडली.

अनुभवनी त्याचा हात जोरात समोरच्या भिंतीवर हाणला. त्याच्या हातातून रक्त वाहू लागलं.

"तु पागल झालास का? इतकं प्रेम आहे तर तिला जाऊ कशाला दिलं? का नाटक करतोय असं, स्वतःला आणि तिलाही त्रास देतोय?" दिव्याने अनुभवला विचारलं.

"आज तोंडातून काढलंस. परत असलं काही कुठेच काहीच बोलायचं नाही."

"अरे पण ती खूप प्रेम करते तुझ्यावर."

"तुला तूझ्या कामाचे पैसे मिळत आहे ना. बस ! बाकी माझ्या व्यक्तिगत मॅटरमधे डोकं खुपसू नको."

.........

इंदिरा डायरेक्टर कोहली, सिद्धी आणि इंडस्ट्रीतल्या इतर लोकांना भेटली. अनुभवला काही प्रॉब्लेम आहे का हे माहित करायचा प्रयत्न केला. पण सर्वांचे एकच उत्तर,

"दिव्याचे करियर नीट चालत नाही. लग्न झाल्यापासून सगळे चित्रपट फ्लॉप झाले. आर्थिक तंगी आहे तिची सध्या. म्हणून अनुभव तिच्यासोबत काम करतोय आणि येणाऱ्या चित्रपटाच्या पब्लिसिटीसाठी ते एकत्र राहायचं नाटक करत असतील. असंच आम्हाला वाटतंय. बाकी पूर्ण इंडस्ट्रीला माहित आहे he loves only you !"

चार पाच दिवसांपासून अनुभवची जासूसी करून इंदिरा त्रस्त होऊन गेली. तिला इतकं समजलं की दिव्या फक्त नाटक करत आहे पैशांसाठी. पण अनुभव असा का करतोय? 

इंदिराचा रिझल्ट आला. ती मुलाखत पास झाली. तिने घरी कॉल करून खुशखबर दिली. 

"घरी कधी येतेय?" आईनं विचारलं. 

"थोडं काम आहे मुंबईत. पूर्ण करून येते. नंतर येणं होणार नाही इकडे."

"ठीक आहे. काळजी घे !"

"हो ! तुम्हीही काळजी घ्या. मी येतेच."
 
अनुभव म्हणाला होता मुलाखत पास होताच लग्न करू. हे आठवून इंदिरा अजूनच दुःखी झाली. संध्याकाळी पाचला बियरची मोठी बॉटल घेऊन ती जुहू चौपाटीवर जाऊन बसली. पूर्ण बॉटल खाली केली  तिनं आणि  सुबोधला कॉल केला. सुबोध अनुभव सोबतच शेयर मार्केटच्या संदर्भात चर्चा करत त्याच्या स्टडीत बसलेला होता.

"इंदिराचा कॉल आहे."

"उचल, माझ्यासोबत आहेस हे नको सांगू."

सुबोधने स्पीकर ऑन करून फोन उचलला.

"हॅलो मिस्टर सुबोध. how are you."

"मी ठीक आहे. तु?"

"तुला काय वाटतं रे मी कशी असायला पाहिजे. तूझ्या मित्रानं मला घरातून, त्याच्या हृदयातुन बाहेर काढल्यावर.  you know आपण पहिल्यांदा भेटलो ना तेव्हापासूनच तु मला अगदी कृष्णासारखा वाटला. एक सच्चा मित्र. पण तू.... " ती नशा केलेल्या माणसासारखी बोलत होती. 

"इंदिरा तु अशी का बोलतेय? तु आहेस कुठे?"

"मी.... मी नाही सांगणार. पण थोड्यावेळाने समुद्रात जाणार आहे. खोल खोल कधीही परत न येण्यासाठी. तूझ्या त्या मित्राला सांगून दे. मी परत कधीच त्याला डिस्टरब करणार नाही आता."

"इंदिरा तु पिऊन आहेस?" अनुभव मधेच बोलला.

"अरे मिस्टर खडूस तिथेच आहे वाटतं." इंदिरा खदखद हसून बोलली, "हो मी पिऊन आहे. पीत आहे. तुला काय करायचं? तु जा ना बाबा तूझ्या दिव्याजवळ. मी तर माझ्या मित्राला, सुबोधला बाय बाय म्हणायला फोन केलेला !"

"इंदिरा हे पिणं कुठून शिकलीस तु?"

"मैने होटोसे लगायी तो, हंगामा हो गया!"

"इंदिरा वेडेपणा बस झाला, कोणत्या बिचवर आहेस सांग. तुझा मित्र तुला येतोय घ्यायला." सुबोध म्हणाला. 

"जुहू, पण तुम्ही येईपर्यंत मी गेलेली असेल.बाय बाय !"

"इंदिरा थांब आम्ही येतोय तिथे. अजिबात समुद्रात जाऊ नको. तुला माझी शप्पथ." अनुभव ओरडला.

"...... " हेडफोन लावून इंदिरानी फोन बॅगमध्ये ठेऊन दिला.

सुबोधनी घाई घाईत फोन कट न करता तसाच ड्राइविंग विंडोच्या समोर ठेवला.

"मी तुला किती वेळा म्हटलं उगाच नाटकं करण्यापेक्षा तिला खरं खरं सांगून दे कि तुला लग्नाची भीती वाटते म्हणून. तु तुझ्या आई बाबांना नेहमी भांडतांना बघत आला त्यामुळे तुला स्वतःवर नातं टिकवता येणार की नाही हा भरोसा नाही." सुबोध गाडी काढत अनुभवला म्हणाला.

"तिनं माझ्यासोबत बिन लग्नाचं राहायची जिद्द पकडली असती."

"ते परवडलं असतं. पण आज काही झालं तिला तर तु स्वतःला माफ करू शकणार का?"

"तिला काहीच होणार नाही."

"होप सो !"

"मला कधीच वाटलं नव्हतं ती असा मूर्खपणा करेल म्हणून. इतकी समजदार आहे ती आणि असं वेड्यागत वागतेय.."

"अच्छा ! वाटलं तर तिलाही नसेल की तु असा वागणार तिच्याशी. आणि मीही मुर्खा सारखं तुझं ऐकून तिच्याशी खोटं  बोललो की तु खरंच दिव्यासोबत लग्न करणार आहेस."

"अजून किती टोमणे मारशील?"

"जितके मारता येतील. चार पाच दिवसांपासुन ती एकटीच भटकत आहे मुंबईत इंडस्ट्रीतल्या लोकांना तूझ्याबद्दल विचारत. कधी विचार केला तिला काही झालं तर?  कोणी तूझ्या नावानं तिचा फायदा उचलला तर?." सुबोध रागातच बोलला.
"मला वाटलं ती स्वतःला सांभाळू शकते. तिला माझी गरज नाही."
"अफकोर्स ती स्वतःला सांभाळू शकते पण प्रेमात काही कारण न देता मिळालेला नकार मेंदू भ्रष्ट करतो माणसाचा."

"सुबोध आपण घरी आरामात बसल्यावर मला जितकं बोलायचं बोल तु. आता फक्त गाडी फास्ट चालव."

"हूँ, फोन लाव तिला."

"हो," अनुभव फोन लावून बघतो, "बिझी आहे."

"माझा फोन कट नाही केला वाटतं तिने."

अनुभव सुबोधचा फोन घेतो, "हो, मी बोलतो.''

"इंदिरा तु ऐकतेस का?"

"खडूस... I LOVE YOU रे !"

"I LOVE YOU TOO !"

"खरंच. चल या ख़ुशीत तुला  एक गाणं ऐकवते", ती तिच्या बेसुऱ्या आवजात आशिकी टू चं गाणं गाऊ लागली, 

"हम तेरे बिन अब रह नही सकते 
तेरे बिना क्या वजुद मेरा |

तुझसे जुदा गर हो जायेंगे तो 
खुदसेही हो जायेंगे जुदा

क्योकी तुम ही हो 
अब तुम ही हो 
जिंदगी अब तुम ही हो... " 


"इंदिरा सॉरी ! मी खरंच खडूस आहे, मला भेटल्यावर चप्पलनी मार पण प्लीज जागेवरच बसून राहा. अजिबात हलू नकोस." अनुभव कळवळून म्हणाला. 

"नाही ना, हलताच येत नाहीये मला. पण मी try करतेय.
 बाय बाय !" आता इंदिराने फोन कट केला.

"इंदिरा...इंदिरा... "

"काय झालं?"

"तिने फोन कट केला."

क्रमश :

धन्यवाद !

©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

0

🎭 Series Post

View all