Login

एक उनाड वाट #मराठी_कादंबरी भाग-6

This is a story of a young energetic & witty girl. Thank you

एक उनाड वाट भाग 5 इथे वाचा



पाचव्या भागापासून पुढे :



इंदिराला किचनमधे मॅग्गी दिसली. पाण्याच्या बॉटलही भरून होत्या. तिनं थोडीशी मॅग्गी बनवली. तिला मोबाईल चाळत खायला आवडायचं. तिनं मोबाईल काढला बॅगेतून तेव्हा आठवलं स्मार्टफोन तर केव्हाचा सुटला हातातून. होता तेव्हा जीव कि प्राण वाटायचा. दिवसभर फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि युट्युब हेच तर चालत होतं. केयरिंग, शेयरिंग परत केयरिंग परत शेयरिंग ! घरात काय सुरु आहे? आईला आपल्याकडून काय हवं आहे? बाबाला आपल्या हातभाराची गरज आहे का? कि लहान बहिणीच्या आयुष्यात डोकावलं नाही कधी . खरंच किती आहारी गेलो होतो आपण या छोटयाश्या खेळण्याच्या?" तिच्या मनात आलं, ''पण आता कळत आहे स्मार्टफोन शिवाय इतकं काही कठीण नाही आयुष्य. आईनं एकप्रकारे चांगलंच केलं स्मार्टफोन घेतला ते. नाहीतर इथं येऊनही आपण लाईक, शेयर आणि कमेंटच्या जाळ्यात अडकलो असतो. आता कमीत कमी शांत बसून पुढे काय करायचं हे तरी विचार करून ठरवू शकतो."



तिला एकदम त्या दारूची बॉटल घेऊन आलेल्या मुलीची आठवण झाली. तिनं मिनुला फोन लावला. पण मिनूनं उचलला नाही. तिनं मिनुला मेसेज केला त्या मुलीबद्दल.

"हा ठीक आहे. पण जास्त नादी नको लागू तिच्या. काही लागलं तर ओमला सांग." मिनूचा रिप्लाय.

"हो. पण दारू पिलेल्या तिला पाहुन मला भीतीच वाटली."

"काही झालं असेल म्हणून घेतली असेल तिनं. एखादा ऑडिशन नीट झालं नसेल तिचं. नेहमीचंच आहे."

"ती ना काम देतो म्हणाली मला."

"मला माहित आहे काय काम देईल तुला ती. तु नको करू काम. फक्त शूटिंग कसं होतं ते पाहायला जा तिनं चल म्हटलं तर."

"हो !"

"ओके गुड नाईट. "

"गुड नाईट. "




style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">




"एकदा बघून घेतलं काम तर काय वाया जाईल?" तिच्या मनात आलं.



12-1 वाजले तेव्हा आवाज कमी झाले. वातावरण शांत झालं. इंदिरानं खिडकीतुन बाहेर बघितलं. अंधार पसरला होता. रातकिडे किर्रर्र किर्रर्र करत होते. इंदिराला जरा भीती वाटली. ती पहिल्यांदाच अशी एकटी आणि तेही रात्रीची घराबाहेर होती. घराची उब, कोणीतरी आपल्या आजूबाजूला, सोबती असल्याचं समाधान ते घरातच. आणखी कुठेच नाही. खिडकी बंद करून ती अंथरुणात पडली. बाजूला टेबलवर ऑडिशनच्या फॉर्मचा गठ्ठा पडलेला.

"मेहनतीला कुठेच पर्याय नाही." तिनं स्वतःला सांगितलं.

"ठक ठक, ठक ठक !"

दारावर पडणाऱ्या ठक ठक ने इंदिराला जाग आली. तिनं मोबाईल बघितला. 6 वाजले होते.

"फक्त सहाच तर वाजले आई. झोपु दे ना थोडं."

"ए महाराणी, तुझी आई नाही. मी ललिता आहे. चालायचं असेल कामाला तर दार उघड लवकर."

इंदिरा एकदम उठून बसली झाली. तिला आठवलं कि ती घरी नाही. मुंबईत आहे.

"उघडते." म्हणत तिनं पटकन दार उघडलं.

"सात वाजता निघू. तयार राहा." ललितानं ऑर्डर सोडली.

"हो पण मला कसला जॉब देणार आहे? तुम्ही काही सांगितलं नाही." इंदिरानं विचारलं.

"तुझी काही काळापुरती व्यवस्था होऊन जाईल असं काम आहे." ललितानं सांगितलं.

"पण काय?" इंदिरानं परत विचारलं.

"तु सोबत चल. आवडलं तर कर. नाहीतर दुसरं शोध. तशीही रिकामीच आहेस ना आज."

"हो."

"मग चल माझ्यासोबत. मी सिद्धी कपूरच्या नवीन सिनेमाच्या शूटला जात आहे."

"द फॅशनिस्ता सिद्धीच्या? " इंदिरानं डोळे विस्फारून विचारलं. 

"यस! चालतेय ना मग? प्रत्यक्षात शूटिंग कशी होते तेही पाहायला मिळेल तुला."

"हो, मिनू, म्हणजे एंजेलही जा म्हणाली होती शूटिंग पाहायला ."

"ओके ! सातला जाऊ आपण."




style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">



आज आपण प्रत्यक्षात सिद्धीला पाहु, भेटू आणि झालंच तर ललिताला एक फोटोही घ्यायला लावू तिच्या स्मार्टफोननी. या ख़ुशीतच इंदिरानं अंघोळ आटोपली. डोक्याची जखम भरली होती. त्यावरचं बँडेजही निघून कुठेतरी पडलं होतं. जखमेवर थोडं खोबऱ्याचं तेल लावलं.  मग किचनच्या भिंतीवर लावलेल्या गजानन महाराजांच्या फोटोला हात जोडले. खायची काय सोय म्हणून डबे हुसकले. एका डब्यात पारले बिस्कीट पुडा मिळाला. दहा बारा पारले बिस्कीट पाण्यात बुडवून खाल्ले. लाल प्लेन, हाय नेक, शॉर्ट कुर्ती आणि जीन्स असा पेहराव. आपलं निव्हिया क्रीम, त्यावर सनस्क्रीन आणि थोडं रोझ पावडर चेहऱ्यावर लावलं, मग आय लायनरनी पापण्या बोल्ड केल्या. एक हात काजळाचा, ओठांवर सौम्य लिपस्टिक आणि इंदिरा मॅडम तयार.



सातला दाराला कुलूप लावून इंदिरा हजर उभी. ललितानं टॅक्सी बोलावली. वाटेत तिनं इंदिराला सांगितलं की ती फिल्म, टीव्ही सिरीयल शूटिंगसाठी कामाला लागणारे ज्युनियर आर्टिस्ट आणि इतर कामासाठी लागणारं मनुष्यबळ जसं स्पॉट बॉय, रनर वगैरे पुरवायचं काम करते आणि वेगवेगळ्या छोट्या मोठया रोल साठी ऑडिशन देत असते . इथे सुरवातीची पहिली पायरी म्हणजे 'रनर '. प्रोड्युसर, डायरेक्टर, मेकअप मन, हिरो, हिरोईन सगळ्यांच्या हाताखाली वेगवेगळे रनर काम करतात. इंदिराचं शिक्षण चांगलं, इंग्रजी, हिंदी आणि मराठी तिनंही भाषांवर चांगलं प्रभुत्व ! म्हणून तिला स्क्रिप्ट सुपरवायझरच्या हाताखाली रनरचं काम द्यायचं ठरवलं. 



एका तासात दोघीही शूटवर पोहोचल्या. जुहू बिचवरील आलिशान बंगल्याच्या आवारात शूटिंगचा सेट लावणं सुरु होतं. हिरोईन सिद्धी कपूरचे काही शॉट बंगल्याच्या आवारात तर काही बंगल्याच्या आत घेतले जाणार होते. ललितानं स्क्रिप्ट सुपरवाझर मिस्टर शाह ला इंदिराबद्दल सांगितलं. त्यांच्यासाठी काम करणारा रनरनं अचानकच शूटिंगवर येणं बंद केल्यामुळे त्यांना नवीन रनरची गरज होती. त्यांनी इंदिराला दोन तीन जुजबी प्रश्न विचारले. शूटिंग घेणार त्या स्क्रिप्ट ची प्रिंट हिरो, हिरोईन सर्वांना वेळेत पुरवायची जबाबदारी तसेच वेळ पडेल तेव्हा स्क्रिप्ट सुपरवायझर सांगेल ती सर्व कामं आणि सेटवर इतर कोणाला काही लागलं तर ते लवकरात लवकर पूर्ण करायची जबाबदारी इंदिराला देण्यात आली. सोबतीला सेटवर आणखी दोन रनर मुली आणि चार स्पॉट बॉय होते. सिद्धी कपूर रेडी होईपर्यंत सर्वांनी नाश्ता करून घेतला. मग इंदिरानं शाह ने दिलेली स्क्रिप्ट दोन तीन वेळा वाचून घेतली. सिद्धी कपूर रेडी होऊन व्हॅनिटी मधून बाहेर आली तसं मि. शाहने इंदिराला आज होणाऱ्या शूटिंगची स्क्रिप्ट सिद्धीला द्यायला सांगितली. इंदिरा सिद्धीजवळ स्क्रिप्ट घेऊन गेली. आकाशी प्लेन शिफॉन साडी, निळं स्लीव्हलेस ब्लाउज, गळ्यात नाजूक मंगळसूत्र, कानात आकाशी लटकन, कपाळावर छोटीशी लाल टिकली, ओठांवर गुलाबी लाली, हातात डजनभर आकाशी आणि निळ्या काचेच्या बांगडया. या पेहरावात सिद्धी कपूर आकाशातली परीच भासत होती. 

"थँक्यू !" सिद्धी इंदिराला म्हणाली. 

"यु आर व्हेरी ब्युटीफुल इन रिअल अल्सो." इंदिरा सिद्धीला म्हणाली. 

"हम्म !" सिद्धीला तिची कॉम्प्लिमेंट मनातून आलेली वाटली म्हणून तिनं स्मित करून विचारलं, "सेल्फी हवी? "

"नो, आय मिन यस. बट आय डोन्ट हॅव स्मार्ट फोन ."

"ओके वि विल टेक इन माय मोबाईल. यु विल गेट इट्स प्रिंट टुमारो. मोबाईल प्लीज !" सिद्धीनं तिच्या असिस्टंटला मोबाईल मागितला आणि तिच्या मोबाईलमध्ये इंदिरा सोबत 2-3 सेल्फी काढल्या.

"थँक्यू !"

"ओके ! आता कामाला लागायचं. मला ही स्क्रिप्ट नीट वाचून  ऐकव आणि समजावून सांग."

इंदिराचं वाचन छान होतं. तिनं पटपट समजेल अशा आवाजात स्क्रिप्ट वाचली. सिद्धीला जिथं शंका वाटली ते मिस्टर शाह ला विचारून सांगितलं. शूटिंग सुरु झाली. आज सिद्धीचे एकटीचे सहा सीन शूट करण्यात आले. पाच पाच मिनिटांचाच एक एक सीन असूनही पेहराव, मेकअप, ब्रेक, रिटेक आणि सेटअप यामुळे तीन तास एकसारखी शूटिंग चालली. शूटिंग दरम्यान सिद्धीला पाणी, ज्यूस द्यायचं कामही इंदिरानं केलं. तिला सिद्धी खूपच आवडली.

"पॅकअप !" डायरेक्टरनं हुकूम सोडला.

सिद्धी कपूर डायरेक्टर मेहता सोबत काही चर्चा करून निघून गेली.



"छान काम केलं. थोडं फिनिशिंग करावं लागेल स्वतःला या इंडस्ट्रीत टिकून राहायला. ते होईल कालांतराने." मिस्टर शाह इंदिराला बोलले.

"थँक्यू सर." विचारू कि नाही विचारू या विचारात तिनं विचारून टाकलं, "पेमेंट किती आणि कसं मिळेल?"

"ते ललिताशी बोलून सांगतो ."

"ओके !"

"हा उद्या वेळेवर यायचं आणि प्लीज आज जसं सिद्धीला कॉम्प्लिमेंट दिली तसं पुढे काहीच करायचं नाही. सिद्धी समजून घेणाऱ्यामधून आहे. सर्व तसे नसतात. त्यांना वाटेल कि तु मस्का लावतेय. तेव्हा फक्त सांगितलेलं काम पूर्ण करायचं. फक्त प्रश्नाचं उत्तर द्यायला तोंड उघडायचं. बाकी काहीच बोलायला नाही. उद्याचं शूट खूप महत्वाचं आहे आणि शूट ज्याच्यावर करायचं तो एकदम  गंभीर प्रवृत्तीचा. म्हणून तुला समजावून सांगतोय."

इंदिरानं समजलं अशी मान डोलावली. 




style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">




"एव्हाना तीन वाजले. मि. शाहशी चर्चा करून ललिता इंदिराला जुहू बीचवर एका रेस्टॉरंटमधे जेवायला घेऊन गेली.

"मग कसं वाटलं आज? " ललितानं इंदिराला विचारलं.

"छान ! मज्जा वाटली सगळं असं डोळ्यांनी बघतांना. खरंच किती मेहनत घ्यावी लागते ना यांना एक एक शॉट पूर्ण करायला?"

"हम्म !"

"पण शाह सरांनी मला पेमेंट बद्दल नाही सांगितलं. "

"अरे हो ! इथे तासाला पैसे देण्यात येतात. तु फ्रेशर आहेस. म्हणून तुला प्रत्येक तासाला 300 रुपये देतील असं म्हणाले. आज सहा तास तु तिथं कामाला होतीस म्हणून 1800 मिळतील. विकली पेमेंट जमा होईल खात्यात. उद्या आल्याबरोबर एम्प्लॉयी फॉर्म भरून देशील. ठीक आहे. "

"हो !"

"काय झालं? पैसे कमी झाले का? पण याच्या पेक्षा जास्त देणार नाहीत ते. "

"नाही तसं काही नाही. मि तर विचार करतेय माझा पहिला पगार येईल ना हा. माझी स्वतःची पहिली कमाई. तर मी त्याचं काय करायला हवं? "

"ओके !"

जेवण झाल्यावर ललिता तिच्या पर्सनल कामासाठी बांद्र्याला गेली. इंदिराला वाटलं जुहू बीचवर येऊन पाण्यात नाही जाणार, असं कसं व्हायचं? पाण्यात तर जायलाच हवं आणि तिनं संध्याकाळ होईपर्यंत मनसोक्त लाटा अंगावर घेतल्या. उन्हाळा असल्यामुळे तर पाण्यात भिजायला जास्तच मज्जा आली. ती खूप आनंदात होती. सहा तासांचे 1800, एका आठवड्याला 1800×6 केले म्हणजे 10800 रुपये. काय करायचं आपल्या पहिल्या पगारात? स्मार्टफोन घ्यायचा नवीन. नाही, सवय होतेय आपल्याला त्याच्या शिवाय राहायची. आणि इतकं कठीण तर नाहीच स्मार्ट फोन शिवाय जगणं हेही तिला कळून चुकलं. तिच्या मनात आलं. पण मग मन म्हणालं, घरी असतीस तर काय केलं असतं? बाबाला नवीन चष्मा, आईला साडी आणि प्रियाला ड्रेस किंवा तिला आवडेल ते दिलं असतं घेऊन. मग राहू देईल सेव्ह पहिला पगार आणि घरी जाईल तेव्हा हेच सगळं घेईल त्यांच्यासाठी. तिनं मनोमन ठरवलं. 



सहा वाजले. अंधार व्हायला लागला. तशी ती फ्लॅटवर निघून गेली ओम तिची वाट पाहत बिल्डिंग समोर उभा होता. "कुठे गेली होतीस? मिनूनं तुला फोन केला तर तुझा मोबाईल स्विच ऑफ येत होता. त्या ललिता मॅडमला लावला तर ती म्हणाली कि तिनं तुला 4 वाजताच सुट्टी दिली. मिनूला खूप काळजी वाटत होती तुझी." ओम एका श्वासात बोलून गेला. इंदिरानं मोबाईल बॅगेतून काढून बघितला. खरंच स्विच ऑफ झालेला.

"तिनं मला फ्लॅटवर तुला पाहायला पाठवलं. मी सहा वाजतापासून इथं आहे."

"सॉरी ! मला नाही कळलं फोन स्विच ऑफ झाला म्हणून."

"ओके ! मी फोन लावतो मिनूला. बोला तिच्याशी." ओमनं मिनुला कॉल लावून मोबाईल इंदिराच्या हाती दिला.

"हाय, अरे सॉरी... "

"ठीक आहे. तु सुखरूप आहेस ना !" मिनूनं विचारलं.

"हो !"

"हा बस इतकंच ऐकायचं होतं मला." मिनूनं कॉल स्पीकरवर ठेवला होता. बाजूलाच इंदिराचे बाबा उभे होते. इंदिराचा आवाज ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मित झळकलं.

"पण मला तुला खूप काही सांगायचं आहे." इंदिरा तिला म्हणाली.

"ते तुझा मोबाईल चार्ज झाल्यावर. आता ओमला फोन दे आणि तु फ्रेश होऊन आराम कर. ओम तुला डिनर आणून देईल नंतर. आता त्याला ऑडिशनला जायचं आहे."

"हो. cu."

"cu!"




style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">




इंदिराच्या बाबाला आपल्या मुलीची काळजी वाटत होती. म्हणून त्यांनी मिनूला इंदिरा बद्दल विचारलं अन त्यांचा निशाना बरोबर लागला. मिनूनं त्यांना आश्वासन दिलं कि ती इंदिराला कधीच एकटं सोडणार नाही आणि तिच्यावर नेहमी लक्ष ठेवेल. त्यांनीच मिनुच्या मार्फत इंदिराला दोन हजार दिले.

इंदिरा फ्रेश झाली. मोबाईलही चार्ज झाला तसा तिनं मिनूला कॉल केला. आज दिवसभर काय काय केलं ते सांगितलं.

"तुला ललितानं जॉब लावून दिला, तुला तो आवडला ते सगळं ठीक आहे. पण आपले नाक, कान, डोळे उघडे ठेव. इथं कोणीच अति विश्वासाला पात्र नाही. कोण कधी धोका देईल काहीच सांगता येत नाही. मी या ललिता बद्दलही काही चांगलं ऐकलेलं नाही. म्हणून तुला सांगतेय. तिच्या पासून लांब राहा. दहा बारा वर्षांपासून हातपाय मारतेय ती इंडस्ट्रीत पण हाती काहीच चांगलं मनाजोगतं लागलं नाही तिच्या. म्हणून सर्व फ्रस्ट्रेटेड आत्मा म्हणतात तिला. समजलं !"

"हो !"

"उद्या निघते मी इथून. "

"खरंच !"

"हो सर्व आटोपलं इथलं."

"ये मी वाट पाहतेय. "

"बरं. बाय!''

............ क्रमश: 



इंदिराचा आजचा दिवस अगदी तिच्या मनाजोगा गेला. उद्याची तिला हुरहूर लागली. मिनूही परतणार म्हणून ती आनंदात आहे. पण पुढे काय होणार? तिला मिळालेला जॉब किती दिवस टिकणार? ललितावर तिनं ठेवलेला विश्वास तिला कुठे घेऊन जाणार? उत्तरांसाठी पुढला भाग नक्की वाचा 



धन्यवाद !



©®अर्चना सोनाग्रे वसतकार 


0

🎭 Series Post

View all