ललिता आणि इंदिरा वेळेवर शूटिंगला जुहू बिचवर आल्या. सेट लावून गाण्याचा सीन कसा घ्यायचा वगैरे वगैरे चर्चेत डायरेक्टर मेहता आणि प्रोड्युसर कमल बिझी होते तर हिरोईन सिद्धी कपूर आणि हिरो व्हॅनिटीत रेडी होत होते. ललितानं इंदिराला एम्प्लॉयी फॉर्म भरायला दिला.
"तुला काही अडचण आली तर विचार मला." इतकं बोलून ललिता जरा दूर गेली आणि तिनं इंदिराचे पटपट काही फोटो काढून कोणाला तरी सेंड केले व शूट वरून निघून गेली. इंदिरानं नीट वाचून, पाहुन फॉर्म भरून स्क्रिप्ट सुपरवायझर मिस्टर शाह ला दिला.
"गुड !"
"थँक्यू सर !"
"आज गाण्याचं शूट आहे. तु या स्क्रिप्टची दहा कॉपीज प्रिंट करून घे आणि वाच."
"ओके सर !"
style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">
"बरं तुला माहितेय आज कोण स्टार आले आहे शूटिंग साठी."
"सिद्धी कपूर !"
"हिरो? "
"नाही."
"बरं स्क्रिप्ट रेडी कर ते येतीलच आता सेटवर."
"हो !"
इंदू स्क्रिप्टच्या कॉपी घेऊन आली. मिस्टर शाह तिला हिरोचं नाव सांगणार तोच सिद्धी कपूर आणि अनुभव सिन्हा सेटवर आले.
"अनुभव सिन्हा !" इंदिरा शॉक झाली, "गेली आज इंदिरा तु आणि तुझा जॉबही गेला." ती स्वतःशीच पुटपुटली, "नाही असं होऊन चालणार नाही. मला स्ट्रॉंग बनावं लागेल." त्याला तिला ओळखता येऊ नये म्हणून तिनं एका रनर मुलाची कॅप डोक्यावर घातली.
"मिस्टर शाह, bring the script copy !" डायरेक्ट मेहताने स्क्रिप्ट मागितली तसं मिस्टर शाहने इंदिराला स्क्रिप्ट कॉपीज वाटायला सांगितल्या.
इंदिरानं सिद्धी कपूर आणि अनुभव सिन्हाला स्क्रिप्ट कॉपी दिली. योगायोगाने इंदिरा आज तेच कपडे (टी शर्ट आणि जीन्स) घालून आली होती जे अनुभव सिन्हाच्या कारला ती धडकली तेव्हा घालून होती. त्यामुळे ती डोक्यात कॅप घालून असली तरी त्यानं तिला लगेच ओळखलं. त्याला इंदिराचा खूप राग आला. त्याला वाटलं, "इतकं समजावूनही ही मुलगी मुंबईतच आहे ! घरी परतली नाही. स्वतःची तर नाहीच आई बाबाची तरी काळजी असावी." पण तो काहीच बोलला नाही.
"हाय स्वीटी!" सिद्धी कपूर इंदिराला म्हणाली.
"हाय मॅम !"
"हे घे प्रिंट्स !" सिद्धीनं तिला सेल्फी प्रिंट्स दिल्या.
"थँक्यू मॅम !"
"आज तुला मला खूप हेल्प करायची आहे बरं. आजूबाजूलाच राहा."
"ओके मॅम !" मिस्टर शाह आणि डायरेक्टर मेहतानं गाण्याचा सीन आपल्या हिरो हिरोईनला समजावून सांगितला. हिरो हिरोईन दोघंही आपले ओव्हर कोट काढून स्विमिंग पुलमध्ये उतरले. अनुभव सिन्हाचे सिक्स पॅक पाहुन इंदिरा फ्रिज झाली. सिद्धी तर पिंक बिकनीत जलपरीच झाली. वातावरण गंभीर झालं.
"रोल कॅमेरा ऍक्शन !" डायरेक्टर मेहता बोलले तसं आस्था गिल चं गाणं सुरु झालं,
style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">
तुझसे मन नही है भरता,
नहीं है भरता
तेरा बझ मुझे जिने ना दे
तेरा बझ मुझे जिने ना दे !
तुझसे मन नहीं है भरता,
अब तुही करता धरता...
अनुभव सिन्हा आणि इंदिराच्या डान्सनी पाण्यात आग लावली.
"कट कट !" डायरेक्टर एकदम खुशीत ओरडले, "wow ! all shot ok. you both done it very well !"
"इंदीरा !" सिद्धीनं आवाज दिला. इंदिरा टॉवेल घेऊन तिच्याजवळ गेली. केसांना टॉवेल गुंडाळून, ओव्हरकोट घालून सिद्धी दुसऱ्या सीन साठी रेडी व्हायला व्हॅनिटीत गेली.
इंदिराची नजर मात्र तिथंच स्विमिंग पुल जवळ उभं राहून डोकं टॉवेलनं पुसणाऱ्या अनुभव सिन्हावर खिळली. किती हँडसम आहे हा.
"I love you !" तिच्या तोंडातून निघून गेलं. अनुभवनं ऐकलं.
"What? " अनुभव त्याच्या असिस्टंटच्या तोंडावर फेकून म्हणाला.
"No nothing !" इंदिरा घाबरून तिथून जाऊ लागली. अनुभवनं तिला स्टॉप म्हटलं तरीही ती थांबली नाही आणि जाऊन स्विमिंग पुलच्या आत पडली. तिला काहीच कळलं नाही. नाका तोंडात पाणी गेलं. ती घाबरून गेली. तिला वाटलं झालं, गेली ती वरती. तोच दोन हातांनी तिला वर खेचलं, स्विमिंग पूलच्या बाहेर आणलं. शूटिंगसाठी उपस्थित सर्व धावतच तिथं जमा झाले. श्वेता आणि रिया (इंदिरा सोबत काम करणाऱ्या दोन मुली ) टॉवेल घेऊन आल्या. इंदिराला आणि इतर मंडळीलाही वाटलं आता अनुभव तिला खूप काही ऐकवणार. पण तसं काहीच झालं नाही. अनुभव सिन्हा चुपचाप टॉवेल घेऊन व्हॅनिटीत निघून गेला. म्हणून अनुभव सोबत आधीही शूटिंग केलेल्यांना वाटलं, साहेबांची जास्तच सटकली बहुतेक. आता पुढलं शूटिंग होणं कठीण. इंदिराला खूप भीती वाटू लागली. शूटिंग जर कॅन्सल झालं तर सगळे तिलाच दोष देतील. आणि का नाही देणार? तिनं पाहुन चालायला हवं होतं.
style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">
इंदिराला वाटलं चूक आपल्याकडून झाली, आपणच निस्तरायला हवं. म्हणून तिनं अनुभवकडे जाऊन सॉरी म्हणून शूटिंग पूर्ण करायची विनंती करु असं ठरवलं. ती कपडे चेंज करून अनुभवच्या व्हॅनिटीत गेली.
"कुठे जात आहे?" अनुभवच्या असिस्टंटनं विचारलं.
"अनुभव सर ला भेटायचं आहे." इंदिरा म्हणाली.
"कशाला? तुझ्यामुळे सरांना परत रेडी व्हावं लागणार आहे. माहित नाही शूटिंग करतील कि नाही आज. "
"केविन!" अनुभवनी आवाज दिला.
"यस सर !"
"येऊ दे तिला."
इंदिरा आत गेली. अनुभव एक स्क्रिप्ट वाचत होता.
"सॉरी ! माझ्यामुळे तुमचा मूड डिस्टर्ब झाला. पण प्लीज शूटिंग कॅन्सल नका करू. हा जॉब मला हवा आहे काही दिवस तरी."
"झालं. जा !"
"तुम्ही येणार ना शूटिंगला?"
"I said go!" अनुभव तिला म्हणाला आणि स्क्रिप्ट वाचत बसला.
इकडे इंदिरा अनुभवला व्हॅनिटीत जाऊन भेटली हे सर्वांना माहित झालं. मिस्टर शाहला तिचा खूप राग आला.
"कशाला गेली होती त्याच्याकडे? मी कालच सांगितलं होतं कि परत कोणत्याही ऍक्टर सोबत जास्त बोलायचं नाही. आपल्या कामाशी काम ठेवायचं. कळत नाही का तुला."
सिद्धी रेडी होऊन आली. तिच्या असिस्टंटनी तिला मेकअप करतांनाच बाहेर झालेला किस्सा सांगितला होता. ती सेटवर येऊन बसली. डायरेक्टर मेहता पॅकअपची घोषणा करणार तोच अनुभव सिन्हा सेटवर आला. सर्वांनी आपापली जागा घेतली. उरलेलं गाणं बंगल्याच्या बागेत आणि बंगल्यात शूट झालं.
"ओके ! गुड जॉब ! अनुभव आणि सिद्धी. " डायरेक्टर म्हणाला आणि पॅकअप सुरु झालं.
"ती छान आहे. तिला बघितलं कि मला आपले इंडस्ट्रीतील ते दिवस आठवतात जेव्हा आपण अगदीच नवीन होतो इथं. किती innocence होता आपल्यात आणि आता सगळ्या भावना आटल्या सारखं वाटतं या प्रॅक्टिकल जगात." सिद्धी कपूर इंदिराकडे बघत अनुभवला म्हणाली.
"हम्म ! तु पर्सनली ओळखते का तिला?"
"नाही ! कालच सेटवर ओळख झाली तिच्याशी. तुला माहितेय तिच्याकडे स्मार्टफोन नाही. स्वीट गर्ल !"
"तु अजूनही इथल्या लोकांवर डोळे बंद करून विश्वास ठेवणं सोडलं नाहीस. कोण कधी तुला सीडी बनवून तूझ्याही पुढे निघून जाईल काही सांगता येत नाही."
"तु अजूनही तिथंच अडकला आहेस. पुढे जा. सर्वच सारखी नसतात."
"मला एक मिटिंग आहे. बाय !" अनुभव सिन्हा निघून गेला. त्याच्या पाठोपाठ सिद्धी कपूरही सर्वांना बाय म्हणून निघून गेली. अनुभव आणि सिद्धी दोघांनी दहा बारा वर्षांपूर्वी, आपल्या फिल्म करियरची सुरवात एकाच वेळी, एकाच फिल्मने सुरु केली होती. काही दिवस त्यांच्या अफेयरची भरपूर चर्चा झाली. पण आता त्यांच्यात तसं काहीच उरलं नव्हतं.
फिल्मचं शूटिंग पूर्ण झाल्याच्या खुशीत आयोजित पार्टीबद्दल चर्चा झाली. पॅकअप पूर्ण झाल्यावर मिस्टर शाहने इंदिराच्या हाती दोन दिवस सहा आणि सहा बारा तास काम केल्याचे तीन हजार सहाशे (3600/-) रुपये दिले. इंदिरा काहीच न बोलता बॅग घेऊन बिचवर जाऊन पाण्यात पाय ठेऊन बसली. साडेपाच वाजले असतील. मोबाईल काढून बघितला. मिनूचा मेसेज,
"आम्ही ट्रेनमधे बसलोय. उद्या सकाळी पोहचू." इंदिराला हायसं झालं मेसेज वाचून. उद्यापासून एकटं झोपावं लागणार नाही. या विचारानंच ती आनंदी झाली.
ललिताचा कॉल आला.
"झाली का शूटिंग? कुठे आहेस?"
"हो झाली. मी जुहू बिचवर बसून आहे."
"बरं ! आपण काल जेवलो ना त्या हॉटेलात ये. मी तिथंच आहे."
"ओके !"
style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">
इंदिरा हॉटेलात गेली. ललिता सोबत एक माणूसही बसला होता. त्यानं इंदिराला पायापासून डोक्यापर्यंत न्याहाळलं जे तिला अजिबात आवडलं नाही.
"ये, हे मिस्टर राव."
"हाय !" मिस्टर राव हात पुढे करून म्हणाला.
"नमस्कार !" ही हात जोडून म्हणाली.
"बरं काय ऑर्डर करु तुझ्यासाठी?"
"मी पाणीपुरी खाल्ली आताच. तेव्हा मला काहीच नको."
"चहा तर घे."
"हो !"
"मला मिस्टर शाहचा कॉल आला होता. तुला काढलं म्हणे त्यांनी."
इंदिराचा चेहरा उतरला.
"अरे तु काळजी करु नकोस. हे मिस्टर राव आहेत ना तुला छानसा जॉबचं काय फिल्ममधे काम पण मिळवून देतील. म्हणून बोलावलं तुला इथं." ललिता म्हणाली. तशी पन्नाशी पार मिस्टर रावनं होकारार्थी मान हलवली. त्यानं परत तिला वर पासून खालपर्यंत न्याहाळलं.
इंदिराची सटकली, "परत मला असं पाहिलं तर पाहा मिस्टर राव. खैर नाही तुमची." तिनं हळू पण कणखर आवाजात राव ला बजावलं.
"ललिता, तु मला इथे बेज्जती करायला बोलावलं का?" राव चिडून ललिताला बोलला, "तु तर म्हणाली होतीस, मुलगी रोल साठी काहीही करायला तयार होईल आणि ही तर आताच नखरे करतेय. जातो मी. मला हवं ते द्यायला रेडी झाली तर कॉल कर मला. नाहीतर विसरून जा तूझ्या करियरला."
"काय आहे हे इंदिरा? हा राव आता टॉप टेन लिस्टमधे आहे प्रोड्युसरच्या. त्यानं मनावर घेतलं तर मला खरंच एक चांगला ब्रेक मिळेल आणि तुलाही." ललिता तिला कळवळून सांगू लागली, "मी दहा वर्ष झाले ऑडिशन देतेय, मॅनपॉवर पुरवायच्या बहाण्याने डायरेक्टर, प्रोड्युसर वगैरे वगैरेला भेटते. पण अजूनही मला हवा तसा ब्रेक नाही मिळाला. तुझी मैत्रीण एंजेल, जिला तु मिनू म्हणतेस ती 5-6 वर्ष झाले ऑडिशन देतेय, तिलाही काही खूप छान असं हाती नाही लागलं अजून. तुला तर तीन चार दिवसातच तशी संधी मिळतेय. मी सकाळी तुझे फोटो काढून मिस्टर रावला दाखवले. त्याला तु खूप आवडलीस. अगं आपण स्त्रिया जे देऊ शकतो तेच मागतोय ना तो. त्यात काय इतकं? सर्वच हिरोईन यामधून जातात अन सक्सेसफुल झाल्या कि आपोआप विसर पडतो त्यांनी काय काय केलं त्याचा."
"हिरोईन? " इंदिराला चीड आली, "ललिता तुम्ही आतापर्यंत किती मिस्टर राव सारख्या लोकांचं मनोरंजन केलं?"
"सात आठ, नीट आठवत नाही आता."
"कितींनी तुम्हाला काम दिलं?"
"दोघांनी, तेही अगदीच छोटे रोल. बाकीचे हलकट निघाले. माझा फायदा उचलून आता माझा फोनही घेत नाहीत." ललिताचा चेहरा उतरला.
"अरे तुम्ही उचलू दिला फायदा स्वतःचा त्यांना, म्हणून त्यांनी उचलला. तरीही तुम्ही परत तेच करायचं म्हणतेस! माझ्या आणि एंजेल सारख्या मुलींनाही तुम्ही त्याच मार्गावर नेऊ इछिता. का? "
"कारण मला वाटतं. आता माझ्याजवळ उरलंच काय? तेव्हा प्रयत्न करून पाहावा. एखाद्यानं खरंच हवा तसा रोल दिला तर माझंच भलं होईल ना !"
"मला ना हसावं कि रडावं तुमच्यावर कळत नाहीये बघ." ललिताची केविलवाणी अवस्था पाहुन इंदिराच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिच्या मूर्खपणावर हसूही. "हे बघा तूमच्या शरीरावर तुमचा पूर्ण हक्क आहे. त्याच्यासोबत तुला काय करायचं ते कर. पण इतरांना अशी भरकटलेली वाट दाखवू नका ."
"इंदिरा अगं.. "
"ललिता ! अजूनही वेळ आहे. कष्ट करा. मॅनपॉवर वर तर चांगला हात बसला आहे तुमचा. बाकी सगळं विसरून जा. ऑडिशन देत राहा. नाहीतर अशी मिस्टर राव सारखी माणसं तुम्हाला त्यांची रात्र रंगीन बनवायला तुम्हाला बोलवत जातील आणि तुम्हाला माहितही होणार नाही कि तुम्ही कधी वेश्या झाल्यात."
"इंदिरा !" ललिता इंदिराच्या टी शर्टचा गळा पकडून ओरडली. तिचे डोळे रागानं लाल झाले आणि हातही थरथर कापू लागले.
"मला तर वाटलं. माझ्या थोबाडीत बसेल आता." इंदिरा अगदी शांतपणे म्हणाली, "असू द्या. विचार करा. मी टॅक्सी बोलावते."
ललिता तिच्याकडे बघतच बसली.
..... ........
क्रमश :
इंदिराचा जॉब गेला. ती आता काय करणार? ललिताचं पुढचं पाऊल काय असेल? पुढील भागात भेटू आणि वाचू.
माझं कादंबरी लिखाण म्हणजे मी त्यातील एक एक शब्द जगते. त्या कादंबरीतील सजीव निर्जीव सगळं मीच असते. आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेयर नक्की करा.
धन्यवाद !
©®अर्चना सोनाग्रे वसतकार
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा