Login

आ युथ प्रोजेक्ट भाग 1

A story of five young people, who get caught in some strange situations.

"मी तर जाम थकले आहे हं आता.मला एका सॉलिड ब्रेकची फार गरज आहे,तर मी मस्त चार दिवसांची सुट्टी घेऊन कुठे तरी एखाद्या निवांत ठिकाणी जाणार आहे". रचना मोठा सुस्कारा सोडत म्हणाली.
"हो ना,मी पण सुट्टी घेऊन नुसता आराम करायचा, असं ठरवलं आहे,मी पण खुप थकलोय आता." जय पण, "नुसता आराम" ह्या शब्दावर जोर देत म्हणाला.
"हो रे, थकले तर मी पण आहे, खुप मोठा होता हा प्रोजेक्ट, इनफेक्ट आपण सगळेच खूप थकलेले आहोत,तर जर आपण सगळेच सुट्टी घेत आहोत तर एकत्रच कुठे तरी जाउया ना,आता प्रोजेक्ट ही संपला आहे तर पुन्हा आपली भेट कधी होणार माहित नाही." रुपाली म्हणाली.
"हो अगदी बरोबर आहे रुपाली तुझं, इतके दिवस सोबत काम करुन सवयच लागली आहे एकामेकांच्या सहवासाची.आता मात्र अखरणार आहे तर .बरं ही कल्पना अगदी भन्नाट आहे हं आपण बरोबरच कुठे तरी जाउया,तर काय म्हणतात बाकीची मंडळी"राहुल नेहमी प्रमाणे उत्साहाच्या भरात म्हणाला.
        "ए मला नाही येता येणार हं तुमच्या सोबत कुठेही, तुम्ही तुमच्या प्लान मध्ये मला नका इनवाल्व करु. , तुम्हाला कारण माहितच आहे." सीमा थोडं नर्वस होत म्हणाली.
"अगं वेडे, तुला कसं सोडून जाणार आम्ही,आपण इतके दिवस सोबत काम केलं आहे, आणि आता ही सोबतच जाणार, तुला तुझ्या घरच्यांच्या परवानगी ची काळजी आहे ना,मग ते तू माझ्या वर सोड.झालं तर".

रुपाली फूल कॉन्फिडन्स मधे म्हणाली तर सीमा सोबत सगळेच निश्चिंत झाले कारण रुपाली फार हुशार आणि तिकडमी मुलगी होती. असंभव वाटणार्या गोष्टी सहज संभव करून दाखवायची.
"बरं ठरलं तर मग, पण आपण जाणार कुठे आहोत, मला तर मुंबईच्या जवळच कुठेतरी जायचं आहे पण प्लीज लोणावळा खंडाळा सोडून हं.आपण एखाद्या शांत आणि सुंदर जागेवर जााााउया."   

रचना म्हणाली तर त्याला सगळ्यांनी सहमती दर्शविली.
         "हो आणि जागा जास्त महाग नको हं,मी सध्या खुप खर्च नाही करु शकत" जय म्हणाला.
  "बरं आता आपण घरी जाऊया आणि विचार करुया कि कुठे जायचे आहे आपल्याला, मग रात्री विडिओ कॉलिंग करुन सगळं ठरवुन घेऊ."राहुल म्हणाला.
   "हो चला तर मग,आपण रात्री ठीक दहा वाजता भेटूया."रुपाली म्हणाली.
मग सगळे एक मेकांचा निरोप घेत घरी निघाले.
          हे पाचही जण,एका मोठ्या कंपनीत कामाला होते, सगळेच जवळपास एकाच वयाचे यंग आणि अनमेरिड मुलं होते आणि कंपनी कडून मिळालेल्या एका मोठ्या प्रोजेक्ट वर काम करत होते. त्यांची आधीची अजिबात ओळख नव्हती पण आठ महिन्या पासून एकत्र काम करत असताना त्यांचे सूर इतके छान जुळले कि असं वाटतं होतं कि त्या लोकांची खूप वर्षांची ओळख आहे. ते सगळे अतिशय हुशार आणि मेहनती होते.
      रचना आणि राहुल अत्यंत संपन्न परिवारातील होते,तर रुपाली व सीमा उच्च मध्यमवर्गीय आणि जय मध्यमवर्गीय परिवारातुन होता.
      जय वर आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती,कारण त्याचे बाबा न्हवते. त्याच्या घरात त्याची एक लहान बहीण, आजी आणि आई होती. म्हणुन तो नेहमी पैसे कसे वाचवता येतील ह्याचाच विचार करायचा. पैश्याची उधळपट्टी करायला त्याला आवडायचं ही नाही आणि ते त्याला परवडण्या सारखं ही न्हवतं.
रचना आणि राहुल सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला आले होते तर त्यांना कसली काहीच काळजी न्हवती, ते दोघं बिंदास रहायचे.

रचना सतत मस्ती मजाच करत राहायची.तिच्या मुळे सगळे नेहमी चांगल्या मूड मध्ये राहून काम करायचे, एखाद्या गंभीर डिस्कशनच्या, वेडं वाकडं रुप घेण्या अगोदरच ती असं काही बोलायची की संपूर्ण माहोलच बदलून जायचा. पण कधी कधी मात्र ती भान विसरायची आणि गंमती मध्ये, पण नकळतच समोरच्याला असं काही बोलायची की तो आत पर्यंत दुखावला जायचा, तिला लगेच आपली चूक  ही कळायची, मग लगेच माफी मागितली की झालं, असं समजून सगळं विसरायला समोरच्याला पण सांगायची आणि स्वता तर विसरूनच जायची.
रुपाली आणि सीमा दोघांची ही घरची परिस्थिती चांगली होती.
      सीमा एका रुढी वादी परिवारातील मुलगी होती. तिच्या घराण्यात मुलींच्या उच्च शिक्षणाला फार विरोध होता,पण तिच्या बाबांनी सगळ्यांचा विरोध पत्करून तिला खूप शिकवलं आणि नौकरी करायची सुद्धा परवानगी दिली होती,पण खुप सार्या अटी आणि बंधनं पण लावले होते तिच्या वर. तर तीही आपल्या परीने प्रयत्न करायची की तिच्या हातुन चुकुनही काही असं नाही घडलं पाहिजे जेच्यानी तिच्या घरच्यांना आणि विशेषतः बाबांना दुःख होईल.पण नेहमी बंधनात राहुन तिला ही आता कंटाळा आला होता.पण काहीच इलाज नव्हता,कारण जास्त विरोध केला तर तिला घरी बसावं लागणार होतं.
रुपाली अतिशय हुशार मुलगी होती. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी अगदी तैय्यार रहायची. आपलं काम समोरच्या कडून,त्याला शब्दात गुंडाळून कस करवून घ्यायचं ही कला तिला खूप चांगली माहित होती.
       रात्रि सगळे विडिओ कॉल वर भेटले आणि सहली साठी आपापल्या कल्पना मांडल्या. जागा निवांत आणि शांत असावी आणि मुंबईच्या कोलाहला पासून लांब असावी ह्याच्यावर सारेच एकमत होते,पण जागा मात्र कोणालाच सुचत न्हवती.
सगळ्यांनी आपले विचार मांडले,पण जागा, कधी बजेटच्या दृष्टीने तर कधी आणखी कोणत्या कारणामुळे फायनल नाही होत होती.
     

मग रचना,जी खुप वेळा पासून अगदी गप्प होती, म्हणाली
        "गाईज,हे बघा मला एक जागा माहित आहे,जी मुंबई पासून जवळ आहे,शांत आहे आणि तुमच्या बजट पेक्षाही खुप कमी खर्च येणार आहे."
       "अगं मग सांग कि, इतक्या वेळा पासून आम्ही एकमेकांचं डोकं खात आहोत, आणि तू गप्प बसुन सगळं अइकत आहेस. बरं बोल आता लवकर. रुपाली थोड्या रागाने म्हणाली.
      "अरे हो, मला माहित आहे अशी एक जागा,पण तिथे जायला जरा प्रॉब्लेम आहे,म्हणजे मी क्लीयरच सांगते की,मी ज्या जागेचं सांगत आहे,ती म्हणजे मुंबई पासून ३५० कि मी दूर एक गाव आहे सोनपूर, गाव खुप मोठं तर नाही आहे पण आपल्या सुविधांच्या सगळ्या गोष्टी तिथे उपलब्ध असतील. त्या गावात आमचं जुनं पण एकदम मोठ्या वाड्या सारखं एक घर आहे. घर जुनं आहे पण तिथं सगळ्या सुविधा आहे. शिवाय तिथे एक केयर केअर आणि त्याची फेमिली पण असणार आहे आपल्या मदतीला."
"अगं मग प्रॉब्लेम काय आहे तु सांगतेय त्यानुसार तर तिथे जायला काहीच हरकत नाही आहे."रुपाली
"हो ना आपल्या बजेटमध्ये पण आहे आणि तसं ही मला तर बुवा असल्या जुन्या जागां मध्ये फारच इंटरेस्ट आहे , जाउया कि आपण." जय
"हो,पण प्रॉब्लेम काय आहे ना की, मी खुप वर्षांपुर्वी, म्हणजे मी दोन वर्षांची होती ना तेव्हा फक्त गेली होती तिथे.आता मला काहीच आठवत नाही तिथलं, मी नुसते त्या वाड्याचे फोटोज पाहिले आहेत.माझ्या घरचे सगळे तिथे वर्षातून दोन वेळा कंपलसरी जातात, दोन्ही नवरात्रात.आणि घरात काही शुभ कार्य असले तर आमच्या कुलदेवी चा आशिर्वाद घ्यायला. मलाच फक्त तिथे जायची परवानगी नाही आहे,मला माझ्या मावशीच्या घरी सोडून सगळे जातात तिथे पण मला कधीच घेऊन नाही जात,मी आजीला आणि सगळ्यांना कारण विचारुन थकले पण कोणीच काही सांगत नाही. तर आपल्याला जर तिथे जायचं असेल तर माझ्या घरच्यांच्या नकळत जावं लागणार आहे, त्यांना काहीच कळता कामा नाही. मला  तिथे जाऊन कारण शोधून काढायचच आहे की मी का तिथे नाही जाऊ शकत. तर तुम्ही जर मला साथ दिली तर माझ्या साठी सगळं सोपं होईल. आणि नाही म्हणनार असाल तरी मी तर जाणारच आहे सोनपूरला." रचना ने एका श्वासात सगळं काही सांगुन टाकलं.
         थोड्या वेळ तर सगळे अवाक होऊन गेले.काय बोलावं काहीच कळतच नव्हतं. रचना तशी फार जिद्दी होती हे सगळ्यांना माहीत होतं,आपण जरी तिला साथ नाही दिली तरी ती तिथे जाणारच हे ही त्यांना ठाऊक होतं. शिवाय ते सगळे यंग ब्लड होते तर तिथे जायची तर सगळ्यांचीच फार इच्छा होती.मग काय तर थोडं फार डिस्कशन झालं आणि सगळ्यांनी सोनपूर ला जायचं नक्की केलं.
मग काय आवश्यक त्या वस्तू घेऊन, राहुलच्या कार नं सगळे निघाले सोनपूर साठी.
पण पुढे नियतीने आपल्यासाठी काय विचित्र वाढून ठेवलंय हे तर त्यांना तिथे गेल्यावरच कळणार होतं.
क्रमशः

 

प्रिय वाचक,
ही कथा पूर्ण पणे काल्पनिक आहे. गावाचं नाव पण काल्पनिकच आहे. पुढे आणखी इंटरेस्टिंग पार्टस येत जाणार आहेत,तर प्लीज कमेंट्स द्वारे आपला प्रतिसाद नक्की कळवा.????

0

🎭 Series Post

View all