Login

अ यूथ प्रोजेक्ट भाग ४

A story of five young people who get caught in some abnormal situations.

रचना ने दार उघडलं, आणि तिच्या अपेक्षेनुसार तिथे राहुल उभा होता.

"चल आपण बाहेर अंगणात फिरु थोडं, बाहेर पहा किती सुंदर वातावरण आहे" राहुल तिला बोलवायला आला होता. आणि ती तत्परतेने न त्याच्या सोबत जायला निघाली.जणु वाटच पाहत होती.

"ए, आम्ही पण येतोय हं सोबत, थांबा जरा.... सीमा, रुपालीच्या हातावर उगाच हात मारत, मस्तीच्या स्वरात म्हणाली.

रचना ने पण माघे बघितलं आणि मिश्किल पणे डोळा मारला. आणि राहुल व ती हातात हात घालून बाहेर अंगणात फिरायला गेले. दार उघडच होतं आणि ते दोघं ह्यांना फिरताना दिसत होते.


 

सीमा ने हसत हसत रुपाली कडे पाहिलं तर ती एका विचित्र नजरेने त्या दोघांना फिरताना पहात होती. तिच्या नजरेत राग, द्वेश, घृणा, इर्ष्या अशे सगळे भाव मिसळलेले होते. फारच वेगळी दिसत होती ती.

सीमाला फार आश्चर्य वाटलं कारण रचना आणि राहुल हे एकमेकांना प्रेम करत होते, हे ऑफिसमध्ये सगळ्यांनाच माहित होतं. आणि कितीतरी वेळा तर रुपाली न सुद्धा ह्या वरून त्यांची मस्करी केली होती.

"रुपाली, रुपाली....

तिने रुपालीला दोनदा हाक मारली पण तिचं लक्षं त्या दोघांकडेच होतं. मग तिने रुपालीला थोडं हलवलं तर ती जरा भानावर आली.

" अगं कुठे हरवलीस होती तू, आणि काय झालं, इतका राग का येतोय तुला, काही बोलली का रुपाली तुला?

" नाही गं काही तर नाही, अगं मी पहात होती कि किती छान जोडी आहे ना ह्या दोघांची. दोघं किती शोभतात ना एकमेकांना."

रुपाली ने साफ खोटं बोललं आणि सीमाला ते कळालं.

" रुपाली, तुला मी माझी प्रत्येक गोष्ट सांगते, पण तू मात्र माझ्याशी खुप कमी गोष्टी शेयर करते हं. आता पण तू खोटंच बोलत आहे, सांग ना मला, कारण तुझ्या नजरेतला भाव मला कळणार नाही इतकी मूर्ख नाही आहे मी."

" अगं काही नाही, एक जुनी गोष्ट आठवली आणि वाईट वाटलं."

"कोणती गोष्ट, सांग बघू , मला ऐकायची आहे."

सीमाचा स्वभाव हा असाच भोचक होता.तिला एखाद्या गोष्टीची उत्सुकता झाली कि झालं. ती सहजासहजी रुपालीचा पिच्छा सोडणार न्हवती.

" अगं काही नाही, आपण ह्या प्रोजेक्ट साठी एकत्र आलो, आणि एखाद महिना झाला असेल, मला राहुल खुप आवडायला लागला होता. तो पर्यंत आपल्या सगळ्यांची चांगलीच मैत्री झाली होती. मी एकदा असंच काम करत असताना रुपालीला ही गोष्ट सांगितली तर ती माझी थट्टा करत हसत म्हणाली होती,

" ए मेडम, वो मेरा माल है हां, बुकिंग हो चुकी है उसकी. राहुल बद्दल तू असाही विचार करु शकतेस मला फार आश्चर्य वाटतय ह्याचं, तुला त्यांचं स्टेटस माहित आहे ना, मग तरी तू असं काही डोक्यात आणलच कसं, शिवाय तुझ्या घरी विचार तरी एकदा, कदाचित एखादा इंजिनिअर डॉक्टर वगेरे शोधून ठेवला असणार त्यांनी तुझ्या साठी.अगं तुझ्या उच्च मध्यमवर्गीय स्टेटसला तोच शोभेल"

मला फार आश्चर्य आणि वाईट वाटलं रचनाच्या असं बोलण्याच.आश्चर्य अश्या करता, कारण तिच्या सारख्या एवढ्या शिकल्या सवरलेल्या मुली कडून असं काही ऐकायला मिळेल ह्याची तर अजिबात अपेक्षा नव्हतं शिवाय तिने जे काही बोलली त्यांचं तर वाईट वाटणं स्वाभाविकच होतं.

त्यादिवशी मला रचनचा स्वभाव बरोबर कळाला, शिवाय ती आणि राहुल दोघंही किती गडगंज श्रीमंत आहे हे सुद्धा माहित झालं. मी त्याच दिवशी राहुल बद्दलच आपलं प्रेम कधीच व्यक्त नाही करायचं आणि हळूहळू सगळं विसरायचं ठरवलं. पण रचनाची गोष्ट आठवली कि माझ्या डोक्यात सणक उठते."

"आणि राहुल त्याचं काय तू खरंच विसरली त्याच्या बद्दलच तुझं प्रेम."

" नाही, खरं सांगू ना सीमा, मी नाही विसरली आहे आणि मी विसरु सुद्धा शकणार नाही, कारण आज पर्यंत मी इतक्या मुलांच्या संपर्कात आले आहे, शाळेत, कॉलेज मध्ये, ऑफिसमध्ये, कितीतरी मुलांनी मला प्रपोज पण केलं आहे, पण कधिच माझ्या मनात कोणाही बद्दल अशी भावना निर्माण नाही झाली, जी राहुल बद्दल झाली होती. पहिलं प्रेम आहे गं माझं तो, विसरु नाही शकत त्याला.आणि असंच त्यांना एकत्र पाहिलं की खुप राग येतो, पण थोड्या वेळाने सगळं नॉर्मल होतं" म्हणत तिनं बाहेर एकत्र फिरत असलेल्या राहुल आणि रचना वर एक जळजळीत कटाक्ष टाकला."

"बरं जाऊदे, जास्त त्रास नको करुन घेऊ, तुच मला सांगत होती ना सकाळी, कि तिच्या गोष्टी कडे दुर्लक्ष करायचं."

" हम्म्म, तोच विचार करुन नेहमी सगळं विसरते. पण ती जो उठता बसता सगळ्यांचा अपमान करते ना सीमा, तू बघ, माझी गोष्ट लक्षात ठेव,कि अतिच झाली ना कधी तर, देव तीला ह्याची इतकी वाईट शिक्षा करेल ना कि पुन्हा कधी कोणाचा अपमान करायचा विचार सुद्धा नाही करणार ती. माझ्या हातात असतं ना सीमा तर........

रुपालीने इतक्या तीव्र रागात म्हणतलं कि सीमा थोडं घाबरुनच गेली.

तेवढ्यात खुप जोर्याचा पाऊस आला आणि रचना आणि राहुल धावतच आपापल्या खोलीत आले. रचनाने कपडे बदलले आणि त्या दोघींशी पप्पा मारायला बसली.

" आभाळ भरुनच आलं होतं फार, पहाना केवढा जोरदार पाऊस येतोय." रचना म्हणाली

" हो ना.  तुझे फार आभार हं रचना, तू फार छान केलं हं इथे यायचं ठरवलं ते. तुझ्या मुळे आम्हाला इतक्या सुंदर वाड्याचे दर्शन झाले.आम्ही तर कधी स्वप्नात सुद्धा विचार केला न्हवता कि आम्हाला अश्या जागेवर रहायला मिळनार आहे."

रुपाली चा स्वर आता एकदमच बदलला होता, तिच्या स्वरातला गोडवा बघुन तर, सीमा अवाकच राहुन गेली.  अभिनय करण्यात ही किती पटाईत आहे, तिला सहसा वाटून गेलं.अगदी पाचच मिनटा आगोदर जी मुलगी इतकी दात ओठ खाऊन बोलत होती, ती क्षणात इतकी सामान्य कशी वागु शकते.

" बरं, आपला उद्याचा प्रोग्राम ऐकून घ्या, उद्या सगळं आटोपलं कि आपण वरच्या खोल्या पाहिला जाऊया.मी फार फार एक्साईट आहे."रचना उत्साहाच्या भरात म्हणत होती.

"हो  ना अगं, काय असेल नाही का वरच्या मजल्यावर. खालीच इतकं सगळं सुरेख आहे तर वरच्या मजल्यावर तर सगळ्या खाजगी खोल्याच असणार, त्यातर आणखीनच सुंदर असणार." सीमा म्हणाली.

" हो ना अगं. तुम्हाला माहीत आहे, घरी जेंव्हा पण मी इथे यायच्या करता मागे लागायची, किंवा नाव सुद्धा काढायची तर सगळेच इतके घाबरुन जायचे जणू एखाद्या भूतालाच पाहिलं की काय.मग मला रागवून चूप करुन द्यायचे. बरं आता झोपायचं आपण, सकाळी लवकर उठायचं आहे ना."  रुपाली म्हणाली.

सगळेच फार थकले होते तर लवकरच झोपून गेले.

      सकाळी लवकर उठून सगळ्यांचा चहा नाश्ता झाला, आणि ते लोक हाल मध्ये गप्पा मारत बसले होते. गोपाळ काकांना पण रचनाने तिथच थांबायला सांगितले तर ते खाली बसायला लागले, तेवढ्यात जय म्हणाला,

" खाली नका बसु काका, इथे वर बसा ना..

तर त्यांना काहीही बोलू द्यायची संधी न देता रचना म्हणाली,

" अरे ते माझ्या समोर तर तिथेच बसतील ना, हो कि नाही काका, एरवी तर बसतच असतील कि वरती, बरं ते जाऊ दे, काका आम्हाला वरची चाबी द्या, म्हणजे आम्ही एकदा तिथे पण जाऊन येऊ, मघाशी मी पाहिलं की जिन्याच्या दारावर एवढं मोठ्ठं कुलूप लावून ठेवलेले होते, ते कशासाठी"

" त्या कुलुपाची चावी तर नाही आहे आमच्या कडे बाई साहेब, तीथे तर आम्ही कधीच नाही जात, म्हणजे आम्हाला सख्त मनाही आहे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी. आम्ही तर सफाई साठी सुद्धा जात नाही बघा, शहरातुन साहेब लोकं आले कि तेच जाता वर सगळं साफसूफ करायला, तेव्हा पण स्वताच करतात, कोणाचीही मदत नाही घेत. आम्हाला सुद्धा नाही सांगत." हरी काका म्हणाले.

"मग जाऊ दे रचना, आपण खालीच एंजॉय करुया, इथेही पहा ना किती सुंदर आहे सगळं" राहुल म्हणाला.


"

हो ना आणि बोरच झालों समजा, तर गावात फिरून येऊ." जय म्हणाला.
"तुम्हाला नाही माहित का बाई साहेब, की वरती साहेबांशिवाय कोणीच जात नाही" रुकमा बाई हुशार होत्या. परिस्थितीचा अंदाज घेत म्हणाल्या.

" हो म्हणजे माहित आहे, पण मला जायचंच आहे वरती.मी दारावरचं कुलूप तोडून जाईल पण जाईल. मला पुन्हा हा चान्स मिळणार नाही आहे ईथे यायचा, आणि बोलणे तर मी तसंही खाणारच आहे, दोन बोलणी जास्त खाऊन घेईल, पण जीवन भर पश्च्याताप तर नाही राहणार मनात."
आता तर गोपाळ काका आणि फेमिलीलाही रचनाच्या जिद्दी स्वभावाचा अनुमान झालाच होता. शिवाय ती सगळी नौकर माणसं काय बोलणार.
" तुम्हाला जे करायचं आहे, तुम्ही करा बाई, पण उद्याच्या ला साहेब काही म्हणाले तर आमची जबाबदारी नाही हो." रुकमा बाई म्हणाल्या.त्यांना कळालं होतं कि रचनाला इथली फारशी माहिती नाही आहे, आणि ती काही तरी लपवते आहे, पण इतकं मोठं काही लपवते आहे ,ह्याची तर त्यांना कल्पना सुद्धा न्हवती. रचनानी त्यांना फोन वर सगळं समजावलं होतं पण हे न्हवतं सांगितलं होतं की तिला इथे यायची मनाही आहे.
" ठीक आहे, सगळी सगळी माझी जबाबदारी, झालं तर. आणि हो हरी काका, तुमचा मुलगा नाही दिसला कुठे, ही तुमची सुन आहे नं"
रचनानी हरी काकाला विचारलं तर ते चुपचाप ऊठुन चालू लागले. बाकी सगळे पण गप्प बसुन राहिले तर रचना नी पुन्हा नाही विचारलं.
सगळी मुलं रचना शी सहमत होते की इतक्या लांब खोटं बोलून आले आहोत, आणि पुन्हा कधीच यायला नाही मिळणार आहे इथे, तर वरती जाऊन पाहणं तर बनतच.
मग काय निघाले सगळे वरच्या मजल्यावर जायला.नियतीच्या खेळाशी एकदम अनभिज्ञ. आता वर त्यांच्या बरोबर काय होतं आणि पुढे काय घटना घडतील, त्या प्रोजेक्टला ही मुलं हेंडल करु शकणार का नाही,  कारण प्रोफेशनली तर एका मोठ्या प्रोजेक्ट ला त्यांनी उत्तम रित्या पार पाडलं होतं.
क्रमशः