रचना नी मनात ठरवलं आणि ते पूर्ण नाही केलं, असं होणं संभवच न्हवतं. रचनाचा स्वभाव तसा थोडा विचित्रच होता.कधी ती एका लहान बाळा सारखी हसत खेळत राहणारी समंजस मुलगी वाटायची तर कधी जिद्दी ला पेटून गेली तर कोणाचंही न ऐकणारी वेडी मुलगी होऊन जायची.
तेवढ्यात गोपाळ काका रचनला म्हणाले,
" थोड्या वेळ थांबा बाईसाहेब, आमच्या पैकी तर तुमच्या सोबत कोणी नाही येणार, पण आज माझा नातू येतोय सुटुन, तर त्याला तुम्ही घेऊन जा आपल्या सोबत, किती दिवसांनी उघडतोय वरचा मजला, तर काही किडे किटकुळ वगेरे असणार तिथे.तो असेल बरोबर की बरं होईल."
" बरं चालेल, सुटुन म्हणजे कुठुन सुटणार आहे तो...
" काही नाही बाई, थोडा माथेफिरुच आहे तो बघा, राग तर असा नाकावर टिच्चून असतो की बस, होतं राहतात भांडणं सगळ्या मुलामुलांचे. परवा भांडला एका मित्राशी आणि खूप मारहाण केली, रिपोर्ट झाली आणि गेली घेऊन पोलीस. चांगला दम दिला आहे पोलिसांनी, आज ताकिद देउन सोडणार आहे."
"बरं चालतंय काका, काही हरकत नाही वाट पाहु आपण त्याची, तो सोबत असेल तर आम्हालाही काळजी नाही राहणार." जय म्हणाला.
सगळे मग त्याची वाट पाहत हॉल मध्ये आले.
"काका तुम्हाला अजुन काही माहित आहे का ह्या वाड्या बद्दल" रचना ने विचारलं.
" नाही बाई, आम्हाला इथं येऊन फक्त एकच वर्षं झालं आहे. आम्हाला फक्त खालची देखरेख करायला सांगितले आहे.आणि वरच्या मजल्यावर जाण्यासाठी सख्त मनाही केली आहे.बस इतकंच."हरी काका म्हणाले.
"का पण असं, म्हणजे तुम्ही वरच्या मजल्यावर का नाही जाऊ शकत?"
"ते आम्हाला कसं माहित असणार बाई, आणि आम्ही विचारणार सुद्धा कशा करता, आम्हाला जे सांगितले आहे तेच आम्ही करतो बघा, आमची थोडीशी शेती पण आहे,तर दिवसा तिघं माणसं शेतावर जातात, आणि मग आमच्या तिघींचा संबंध वेळ वाड्याची साफसफाई, मंदीरात पुजा पाठ वगैरे करण्यातच जातो." रुकमा
बाई ठसक्यात म्हणाल्या.
रचनानी काही तरी बोलायला तोंड उघडलच होतं की सीमा, टॉपिक चेंज करायच्या उद्देशाने मध्येच म्हणाली,
" कसं असतं ना बघा, आठ महिन्या आधी तर आपण एकमेकांना ओळखत सुद्धा न्हवते, आणि आज बघा कशी घट्ट मैत्री जमली आहे आपली."
" हो ना, तुम्हाला सांगते, माझी आजी नेहमी म्हणायची की काही लोक आपल्या आयुष्यात एका विशेष उद्देशाने येतात. त्यांच्याशी आपलं पूर्व जन्मीचं नातं असतं म्हणून ते परके असुन सुद्धा खूप जवळचे वाटतात.आपण सुद्धा एक दुसर्याशी इतके अनोळखी असताना सुद्धा इत्क्या जवळ आले आहोत,तर त्याच्या मागे पण काही हेतू असणारच ." रुपाली म्हणाली.
तेवढ्यात काकांचा नातू म्हणजे विनायक आला.थोडं फार जुजबी बोलणं करून सगळे बाहेर आले.
ते लोक आता वरच्या मजल्यावर जाणार्या जिन्या जवळ आले होते. तिथे दारावरच एक मोठ्ठं कुलूप लावून ठेवलेले होते. वर जाण्यासाठी दोन जीने होते, एक एका बाजूला तर दूसरा दूसर्या बाजूला. पूर्वी एक जिना फक्त घरचेच लोकांच्या वापरण्या साठी असायचा, तर दुसरा जिना नौकर माणसांसाठी रहात होता. त्या दोन्ही जिन्यांना कुलूप होते.
तिनं काकांना कुलूप तोडायला सांगितलं तर त्यांनी स्पष्ट नकार दिला, शिवाय त्यांच्या पैकी कोणिच तैय्यार नाही झालं.
इथे रचनाला माहित होतं की ह्या गोष्टी साठी ती त्यांना बाध्य
करु न्हवती शकत. तीने मग राहुल आणि जय कडे पाहत त्यांना कुलूप तोडायला सांगितलं. ते दोघं सुद्धा थोडे मागे पुढे पाहत होते तर रागाने रचना नेच अंगणात ठेवलेल्या पाट्या जवळचा वरवंटा उचलला आणि जोर्यात त्या कुलूपावर मारला.
तिनं पहिलाच प्रहार केला होता आणि नुकतीच पुजा होऊन मंदीरात लावलेल्या दिव्यांच्या वाती फडफडायला लागल्या.आणि तेवढ्यात जोरदार पाऊस सुद्धा सुरू झाला. दिवसाढवळ्या पण अंधार दाटून आला आणि विजा चमकायला लागल्या.
हे दृश्य बघून तर सगळेच खूप घाबरले. सगळेच जिन्याच्या बाजूला बसून गेले.
"बाई साहेब, सोडा वर जाण्याचा नाद, अहो काही कारण तर असणार बघा, की आपल्याला तिथे जायची बंदी आहे, तुम्ही सोडा ही जिद्द." गोपाळ काका घाबरलेल्या स्वरात अगदी हात जोडून म्हणाले.
" हो बाई, सोडा हा नाद, कदाचित देवाचाच इशारा असणार बघा हा, उगाच बुद्धी शी वैर नका करु." नेहमी ठसक्यात वावरणाऱ्या रुकमा बाई आता अगदी नरम पडल्या होत्या.
मग सगळ्यांनी तिला आपल्या परीने समजून पाहिलं, पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही हे त्यांना चांगलेच माहीत होतं. की रचना काहीच ऐकणार नाही. आपण तिच्या सोबत गेलो नाही तर ती एकटीच जाणार पण जाणारच,हे नक्की होतं.
"हा पाऊस आणि विजा वगैरे तुम्ही पहिल्यांदा पाहत आहात का, शिवाय पावसाळ्यात पाऊस नाही पडणार आणि विज नाही चमकणार तर आणखी काय होणार. त्यात एवढं काय नवल आहे, संयोग आहे सगळा. बरं मी तर वरच्या मजल्यावर जाणार आहेच, तुम्ही लोकं जर आलात तर उत्तम पण, तुम्हाला यावच लागणार आहे, अशी माझी तुमच्या वर कोणतीच जबरदस्ती नाही आहे हं, सगळे आपापल्या इच्छेनुसार या."रचना ने सगळ्यांना सूचना केली.
पाऊस आता जरा कमी झाला होता. वातावरणही शांत झालं होतं.
रचना अचानक तरातरा चालत पुन्हा दाराजवळ आली आणि आपली सगळी शक्ती एकत्र करून कुलूपावर निरंतर प्रहार करत राहिली. तिच्या डोळ्यातूनही निरंतर पाणी वाहत होतं आणि चेहर्यावर एक विचित्र भाव होता. सगळेच तीला स्तब्ध होऊन पाहत होते. पण ते कुलूप इतकं मोठं आणि मजबूत होतं की तिच्या सारख्या दहाजणिंनी सुद्धा आपली सगळी ताकद लावली असती तरी ते तुटेल असं नाही वाटत होतं. रुपाली जरा दूर उभी राहुन हे सगळं पाहत होती, आणि तिच्या चेहऱ्यावर एक कुत्सित हसू सुद्धा होतं.
मग जय पुढे आला, पण राहुलने मात्र काहिच प्रयत्न नाही केला.जय ला पाहून सीमा पण आली, मग तर रुपाली ला सुद्धा मदतीला यावं लागलं. ते लोक हातात जे काही येत होतं त्याने कुलुप उघडायचा प्रयास करत होते.
पण सगळ्यांच्या खुप प्रयत्न करुन झाल्यावरही ते कुलूप काही उघडायला तैय्यार न्हवतं, मग विनायक, जो कि आधीच थकलेला असल्यामुळे संतापलेला होता, पुढे आला आणि रचनाच्या हातातुन वरवंटा हिसकावून घेत एक जोरदार प्रहार कुलुपावर केला, आणि ते उघडलं एकदाचं. प्रहार इतका तीव्र होता कि कुलूप थोडं दूर जाऊन पडलं. रचनाला इतका आनंद झाला की सगळं विसरून तिनं विनायकला मिठीच मारली आणि राहुल कडे तिनं जळजळीत कटाक्ष टाकला, जणू त्याला काही तरी सूचवत होती.
हे सगळं इतकं विचित्र सुरू होतं कि सगळेच कोणत्यातरी वेगळ्याच जगात जाऊन पोहोचले होते असं वाटायला लागलं होतं.
तेवढ्यात रचनाला वाटलं की कोणी तरी तिच्या कानात येऊन कुजबुजलं ,
"त्या दिवशी कुठे होता तू, ज्या दिवशी मला आणि माझ्या मुलीला तुझी खरी गरज होती."
रचना जरा चपापली, पण तिला वाटलं की आपल्याला भास झालाय. तिनं विशेष लक्षं नाही दिलं.
आता रचना ने जीना चढून वर जाण्यासाठी पहिलं पाऊल उचललंच होतं आणि तीला असं वाटलं कि कोणीतरी तिच्या ह्या कामगिरीनं खुप खुश होऊन, आनंदाच्या भरात जोर जोराने हसत आहे. पण तो ही एक भास आहे असं समजून तिनं पुन्हा दुर्लक्ष केलं.
मागे वळून पाहिले की कोण कोण येतंय तिच्या सोबत तर गोपाळ काकांच्या फेमिलीला सोडून सगळेच येत होते. पण विनायक होता बरोबर त्यांच्या.ते सगळे तिच्या मागे मागे चालत होते, खुप उंचं उंचं पायर्या होत्या त्या. पायर्या संपल्या आणि आता ते सगळे वरच्या मजल्यावर होते.
वरच्या मजल्यावर पोहचल्यावर तर त्यांचे सगळ्यांचे डोळे उघडे च्या उघडेच राहुन गेले.तिथलं दृश्य पाहून सगळे अवाक होऊन गेले आणि स्तब्ध उभे राहुन सगळीकडे भिरभिर डोळ्यांनी पाहत होते. त्यांच्या कल्पनेच्या ही पलिकडचं होतं ते संपूर्ण दृश्य.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा