" हो मीच घेत आहे ह्यांची काळजी, तुमच्या वाड्यातनं कोणी डोकावून सुद्धा पाहिलं आहे का इथे, घरी आला तर आला, नाही तर नाही, काय करतोय, कुठे पडलाय कोणाला काय फरक पडतोय.आणि काय हो, मी तुम्हाला तुम्ही करुन बोलतं आहे, आणि तुम्ही ठेठ तू वरचं आल्या, हे बघा तुम्ही असाल त्या मोठ्या वाड्याच्या सून, पण हे माझं घर आहे, आणि माझा ही काही मान सम्मान आहे.
" तूझा मान सन्मान......तूझा कसला आलाय ग मान सन्मान, कोणा परक्या माणसाबरोबर, बिना लग्नं करुन रहाणार्या बाई ला काय म्हणतात तुला माहितच असेल, पण तरी तुला सांगते,अईक अश्या निर्लज्ज बाई ला****** म्हणतात.
" पार्वती बाईsssss.
राधाला आपला अपमान सहन नाही झाला आणि ती जोर्यात पार्वती बाई वर ओरडली. तिच्या अत्ता पर्यंतच्या संपूर्ण आयुष्यात, तिच्याशी निदान तोंडावर तरी असं कोणिच बोललं न्हवतं.शिवाय पार्वती बाई चे शब्द इतके झोमणारे होते कि तिला फार अपमानास्पद वाटलं. तिनं दिनकर कडे पाहिलं तर तो शुद्धीतच न्हवता.
" तू बर्या बोलानं बाजुला हो आणि आम्हाला ह्यांना घेऊन जाऊ दे, तू तुझ्या ऐपतीप्रमाणे शोध कोणी तरी दूसरा, तुझ्या सारखाच लफडेबाज आणि रहा त्याच्या बरोबर." मग पार्वती आणि गोविंद, दिनकरला उठवायला लागलें. पण दिनकर, स्वताच उठून उभा रहायचा प्रयत्न करु लागला,जणु तो सुद्धा त्यांच्या बरोबर जायला इच्छुकच होता. ते पाहून पार्वती बाई, कुत्सित पणे हसत राधाला म्हणाल्या,
" पाहत आहे नं, कळाली तुला तुझी जागा,एक गोष्ट लक्षात ठेव, असले संबंध फार काळ टिकत नाही, आत्ता ही वेळ आहे,सुधरुन जा, मलाही माझी चूक कळली तशी तू सुद्धा आपली चूक मान्य कर आणि एक नवीन आयुष्य सुरु कर".
" तुम्ही जात आहात ह्यांच्या सोबत मला सोडून,मी इतके दिवस तुमची सेवा केली, त्याचं हे फळ मिळणार आहे मला" राधानी दिनकर ला त्यांच्या सोबत जायला तैय्यार पाहिलं आणि त्याला पुन्हा आपल्या शब्दात गुंडाळायचा प्रयत्न करु लागली.
पण दिनकरनी तिचा हात झटकला आणि गोविंदचा हात अजूनच घट्ट धरत त्याला बाहेर चलायला सांगू लागला. ते पाहून तर राधाची तळ पायाची आग मस्तकात गेली आणि तीनं रागाच्या भरात पार्वतीला मारायला हात उचलला,पण गोविंदनी तिचा हात मध्येच धरला आणि जोर्यात झटकला.आणि तिला काही बाही बोलू लागला. ती मग जळजळीत नजरेने गोविंद कडे पाहत होती.
आता पार्वती आणि गोविंदनी,दिनकर ला सहारा देत बग्गी पर्यंत आणलं आणि बसवलं.
" तुम्हाला,माझा अपमान करणं फार महाग पडणार आहे हं,हे लक्षात ठेवा तुम्ही,असा धडा शिकवणार आहे ना मी सगळ्यांना की तुमच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील.सोडणार नाही आहे कोणालाच." राधा मनातल्या मनात विचार करत त्यांना जाताना पहात राहिली.
दिनकर ला पार्वती घरी घेऊन आली हे पाहून आई बाबांना फार आनंद झाला, आता त्यांच्या आशेला पुन्हा बळ मिळालं होतं की पार्वती बाई आता मनावर घेताय आणि दिनकरची आता त्याच काळजी घेऊन त्याला मार्गावर आणतील.
मग अशेच दिवस जात होते. पार्वतीनं आपल्या सेवेनं आणि प्रेमानं दिनकर ला आपलं करुन घेतलं.आश्चर्य म्हणजे दिनकरनी एकदा सुद्धा राधाबाईच नाव न्हवतं काढलं,त्यालाही कुठेतरी ह्याच्यातनं बाहेर निघायची इच्छा होतीच. पार्वतीचा साथ मिळाला आणि त्याला बळ मिळालं.त्याच्यात हळूहळू फार बदल झाले. आता पार्वती आणि दिनकर च्या आयुष्यात नवीन पाहुणा यायची चाहूल लागली आणि दिनकर अजूनच जबाबदारीनं वागू लागला. आई बाबा आता पूर्ण पणे संतुष्ट आणि निश्र्चित झाले होते, आणि दिनकर ला पार्वतीला सोपवून ते तीर्थयात्रेला निघून गेले.
पण दिनकर मधे झालेला बदल, भाऊ आणि क्षमा वहिनीला काही फारसा आवडला नाही,कारण दिनकर बेजबाबदार आहे म्हणून त्याला व्यवहाराचं काही समजणार नाही, त्यामुळे त्यांच्यावर कोण एवढं मोठं साम्राज्य सोपविणार होतं, त्यांनी तर आपल्या एकुलत्या एक मुलालाच हे सगळं मिळणार हा असाच विचार केला होता.पण झालं वेगळंच. मग ते दोघं दिनकर आणि पार्वतीशी, मनानं आणखीनच लांब होतं गेले.
पार्वतीचा सातवा महिना सुरू झाला होता. दिनकर आणि गोविंद फार काळजी घेत होते तिची. सगळं छान सुरु होतं.
एक दिवस दुपारी अचानक दार वाजलं आणि गोविंद ने दार उघडल्यावर समोर कोण तर राधाबाई उभी होती.तीची अवस्था खूप खराब झाली होती. हाता पायाच्या अगदी काड्या झाल्या होत्या. खूप आजारी पण वाटत होती.
" तुम्ही, तुम्ही कशा करता आल्या आहात, चालत्या व्हा बरं इथून" गोविंद ने तिला डटवून म्हणतलं.
" मला फक्त एकदा राधाबाई ची भेट घेऊ द्या, मी जास्त वेळ नाही घेणार त्यांचा, माझी अवस्था तर तुम्ही पाहातच आहात, कधी मरण येईल काही सांगू नाही शकत. त्या आधी मी त्यांच्या सोबत जे काही वाईट केलं,त्यांची मला माफी मागायची आहे, तरच मला मुक्ती मिळेल.तुम्ही माझ्या भावा सारखे आहात, माझं एवढं काम करुन द्या" इतकं बोलून राधाबाईनी गोविंद समोर हात जोडले आणि ढसा ढसा रडायला लागली.
तिची अवस्था आणि रडणं पाहून, गोविंद जरा नरम पडला. पण पार्वती बाई ला तिच्या समोर बोलवायला त्यांचं मन मागे पुढे होत होतं, तेवढ्यात आवाज ऐकून क्षमा वहिनी तिथे आलेल्या आणि सगळं कळाल्यावर त्यांनी काही तरी विचार केला आणि गोविंद ला म्हणाल्या,
"अरे,बोलव पार्वतीबाईंना खाली, फक्त क्षमाच तर मागायची आहे ना हिला त्यांची. हिची अवस्था पाहून तर खरंच असं वाटतंय की ही अगदी मरायला टेकली आहे. कदाचित शेवटची इच्छा असणार हिची. तू जा आणि बोलव बघू त्यांना लवकर."
क्षमा वहिनी नी आज्ञा केली तसाच तो पळाला आणि पार्वती बाई ला बोलवून आणलं. त्यांना पाहून राधा बाईनी त्यांच्या पायावरच डोकं ठेवलं आणि हूमसुन हूमसुन रडायला लागली. तिला आवरणं कठीण जात होतं. मग त्या तिघांनी मिळून तीला आत घेण्यासाठी उचललं आणि तिनं जसाचं पाय आत घेण्यासाठी उचलला, एक विचित्र वारं चालायला लागलं. ते तीघ लवकर लवकर चालत आत आले तिला बसवलं आणि पाणी दिलं.राधाची अवस्था खरंच इतकी खराब झाली होती कि तिला धड बोलताही न्हवतं येत. अश्या अवस्थेत आता तिला घराबाहेर काढनं अगदीच अमानवीय वर्तन ठरलं असतं.
" तू बरं वाटेल तो वर थांब हवं तर इथेच,पण बरं वाटल्या बरोबर इथनं निघायचं बरं का,काय पार्वती बाई, बरोबर आहे ना आमचं, अश्या अवस्थेत हिला बाहेर काढलं आणि काही झालं तर, लोकं काय म्हणतील. काय म्हणता तुम्ही? क्षमा वहिनी नी म्हणतलं.
आता त्यांनी असं म्हणट्ल्यावर तर पार्वती बाई काहीच बोलू न्हवत्या शकत,पण राधाला अश्या अवस्थेत घराबाहेर काढनं तर त्यांना ही बरं न्हवतं दिसत.
दोन तीन दिवसांनी राधाला थोडं बरं वाटलं,तर तीनं स्वताहून जायची इच्छा केली.ह्या तीन दिवसांत दिनकरने एकदाही डोकावून पाहिले न्हवतं तिच्या खोलीत.तिनंही त्याच्याबद्दल काहीच विचारपूस केली नव्हती.
राधा सगळ्यांशी खूप आपुलकी आणि सभ्यतेन वागत होती. तिच्या गोष्टी आता आध्यात्म कडे वळाल्या होत्या.नेहमी माळ जपत नामस्मरण करत बसायची.तिच्याशी बोलताना नेहमी सगळ्यांना आनंद व्हायचा.तिच्या बोलण्यात इतका बदल पाहून पार्वती बाई सुद्धा चकित होत्या. सगळेच आता तिच्या शी प्रभावित होऊन गेले होते. पार्वती बाई ला ती रोज एक चांगली गोष्ट सांगायची.तिला अगदी आपलसं करुन घेतलं होतं.
तीन दिवसांनी तिनं जायचं म्हणतलं आणि पार्वतीनं तिला थोडे दिवस आणखी थांबायची विनंती केली. पण तिनं नाहीच म्हणतलं. मग क्षमा वहिनी नी पण तिला निदान डोहाळजेवणापर्यंत तरी थांबायला सांगितले. आणि त्या दोघींच्या खुप म्हण्यावर ती थोडे दिवस आणखी थांबायला तैय्यार झाली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा