अबला नाहीस तू
पल्लवी आपल्या बाळाला पार्थला घेऊन खोलीत बसून दूध पाजत होती.
खोलीच दार लोटलेलं होतं रोहन तिचा नवरा बाहेर गेला होता ,जाता जाता तो म्हणाला "पल्लवी मी दोन तासात येतो तोपर्यंत तू आपल आवरून ठेव मग आपण तिघे बाहेर फिरायला जाऊ."
पल्लवी आणि रोहन च लव्ह मॅरेज होत ,रोहन घ्या घरी पल्लवी पसंत पण पल्लवीच्या घरी तिच्या आई-बाबांचा विरोध होता कारण रोहन दुसऱ्या जातीचा होता तरीही पल्लवीने रोहन शी लग्न केलं.
सासरी सर्व सुबत्ता होती सासुबाई प्रेमळ होत्या.मोठ्या जावू ही लहान बहिण असावी असे वागत असे .त्यांचे माहेर फार लांब होते पण् त्यांचा धाकटा भाऊ महेश इथेच काॅलेजात शिकत होता तो हाॅस्टेल मधे रहात असे. सुट्टी असली कि इकडे येत असे.
सुरवातीला पल्लवी ला आपला ही हा भाऊ आहे असे वाटे पण लवकरच तिला महेश च वागणं खटकायला लागलं. ती त्याला टाळू लागली. पहाता पहाता दोन वर्ष झाली. पल्लवी ला मुलगा झाला आताशा महेश पार्थ ला खेळवायच्या निमित्ताने तिच्या शी जवळिक करायचा प्रयत्न करत असे. ती स्वतः ला त्याच्या पासून दूर ठेवायचा प्रयत्न करे.

आज रविवारची सुट्टी ,सासू सासरे बाहेर टीव्हीवर महाभारत पाहत बसले होते मोठ्या जाऊ बाई वरती त्यांच्या खोलीत होत्या.
टीव्हीवर द्रौपदी वस्त्रहरण प्रसंग चालू होते त्याचे संवाद खोलीत ऐकू येत होते द्रोपदी" केशव केशव "म्हणून आर्तपणे हांका मारत होती.
बाहेरून मोटरसायकलचा आवाज आला म्हणून पल्लवीने खिडकीतून पाहिले. महेश मोठ्या जाऊ बाईचा भाऊ आलेला दिसला. त्याला पाहून पल्लवीला चीड आली.
रोहन व पल्लवी चे लग्न झालं तेव्हापासूनच ती महेश च वागणं पाहत होती. महेश कोणी नसताना तिच्याशी सलगी करायचा प्रयत्न करायचा
सुरुवातीला पल्लवीला वाटायचं वहिनींचा भाऊ तिचाही भाऊ पण तरीही त्याचे तिला न्याहाळणे एकटी असताना मागे पुढे करणे सर्वच कुठेतरी वेगळं जाणवायचं तिचा सिक्स्थ सेंस तिला जाग करायचा.
पण जावेचा भाऊ, नात्यातला माणूस कोणाला कसे सांगावे रोहनला सांगता येत नाही .
म्हणून शक्यतो ती महेश ला टाळायची.
पण आज तिची खोली उघडी व बाकी सर्वजण टीव्ही पहाण्या त लागले असे पाहून तो तिच्या खोलीत आला.

"तुम्ही इथे काय करताय"
पार्थ ला घ्यायला आलो म्हणून तो अगदी जवळ येऊन उभा राहिला.
त्याचा हेतू पल्लवीच्या लक्षात येत होता. पण पार्थ दूध पीत होता त्यामुळे तिला उठता येत नव्हते .अशा परिस्थितीत आपल्याला काहीतरी करावे लागणार हे तिच्या लक्षात आले.
त्या काळातल्या द्रौपदी सारखी ती लाचार नाहीये.
तिला आठवले "पुष्पमित्र उपाध्याय "ची कविता कॉलेजमध्ये असताना वाचली होती “उठो द्रोपदी शस्त्र उठाओ"
दुःशासन बाहेरच्या जगातला असला तर त्याला शिक्षा करणे सोपे पण जर तो घरातला असला तर खूप आरडाओरडा करूनही उपयोग नाही कोणी विश्वास ठेवेल किंवा नाही कोण जाणे, असं लक्षात येताच तिने पार्थला पदरा आडून उचलून पलंगावर ठेवले.
महेश आता तिच्यावर वाकून तिला धरणार तेवढ्या त तिने त्याला ढकलले व कराटे क्लास मध्ये शिकलल्याप्रमाणे एक जोरदार किक तिने महेशच्या वर्मावरच मारली तो कळवळला पण ओरडायची सोय नव्हती हाताने दाबत तो खोली बाहेर पळाला थोड्या वेळातच मोटरसायकलचा जाण्याचा आवाज आला .
पल्लवीत इतक्या वेळ संचारलेली दुर्गा हळूहळू शांत होऊ लागली. तिला कळून चुकलं आज अशाच दुर्गेची वेळोवेळी मुलींना आवश्यकता आहे तरच अशा दुराचारी राक्षसांचा नायनाट होईल . आणि आता महेश तिच्या वाटेला जाणार नाही. त्याला कळुन चुकले असेल कि प्रत्येक स्री ही अबला नाही.
तेवढ्यात रोहन आल्या ची चाहूल लागली आणि पल्लवीतली प्रेयसी जागी झाली.
-------------------------------------------

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा