Login

लेख : आधार

आधार म्हणजे काय? आधार किती महत्वाचा आहे या विषयी संपूर्ण माहित या लेखात समाविष्ट आहे
आधार..!


दैनंदिन जीवनात बरीच कामे अशी असतात की त्याकरिता आपल्याला कोणाचा तरी आधार हवा असतो. 'आधारा' हा जरी तीन अंकी शब्द असला तरीही यात जीवनाचा सारं सामावलेला आहे. व्यक्ती हा जीवनात एकटा राहू शकत नाही. त्याला कोणाच्या ना कोणाच्या आधाराची ही गरज असतेच. आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणीच्या सामोर शौर्याने उभे राहणारे आपल्याला जन्म देणारे आपले आई वडील आपल्याला प्रेमाचा आधार देतात. आपल्याला बाल संगोपणापासून तर संपूर्ण आयुष्य आधार देण्याचं काम करत असताना. मुलं मोठी होत असली की एकमेकांची मने जपले जातात. एक आई आपली मुलगी मोठी झाली की तिला मैत्रिणीसारखा आधार देते. तर एक वडील आपला मुलगा मोठा झाला कीं त्याला मित्रासारखा आधार देतात. मुलांवर हात उचलला जात नाहीं, तर मुलांना प्रेमाने समजून सांगितल्या जाते. मुलांकडून होणाऱ्या चुका दुरुस्त केल्या जातात. मुलांनाही आपल्या आई वडिलांचा आधार असतो. आई वडील आपल्या मुलांना आधार देत संस्कारित करत असतात. मुलांची संपूर्ण वेळ काळजी घेऊन त्यांना आधार देत जीवन जगत असतात. आपल्या परिवारात आर्थिक कमी भोगावी लागू नये म्हणून वडील कायम आधार देत असतात. आई वडील आपल्या मुलांना सतत कठीण परिस्थितीत मायेचा आधार देत रहातात. आई वडिलांनंतर आपले मोठे भाऊ मोठी बहीण ही आई-वडिलांसारखीच आपल्यावर जीव ओतत असते. आई-वडिलासारखीच मई, ममता ते आपल्या लहान भावंडांना देत असतात. आई-वडिलांनंतर आपल्याला भावाकडून मिळणारा आधार, प्रेमाचे शब्द आई-वडील या जगात नसल्याची कमी पूर्ण करतात. आपल्याला सुरुवातीला आपल्या घरातून व नंतर आपल्याला बाहेरून, मित्र परिवाराकडून आधार मिळत असतो. कितीही म्हटलं की माझं तुझ्याशिवाय काही अडत नाही. पण मन सांगत असते की मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. असा हा 'आधार' असतो. तोंडावर जरी आपण म्हटलं की मी आत्मनिर्भर आहे. माझं मी बघून घेईल, पण प्रत्यक्षपणे असे होत नाही. आधार घेणाऱ्या व्यक्तीबद्दल मन सांगत असते की मला तुझी खुप गरज आहे. जीवनाच्या प्रवासात जिवलगांची साथ ही पाहिजेच असते. प्रत्येक माणसाला सोबत ही हवीच असते. कोणाच्यातरी आधाराची आवश्यकता असते. कोणते ही काम करत असताना जरी निर्णय आपण घेतला तरीही सुद्धा ते काम शेवटास कसे न्यावे या करिता कोणाचा तरी आधार हा हवाच असतो. ही आधार देणारी माणसं आपल्या जवळची, आपल्या घरातली, आपले शेजारी, आपले प्रिय मित्रमंडळ,आधार देण्याचं काम करत असतात. पैशाची अडचण असो किंवा कुठे बाहेरगावी जायचं असेल, सुखात, दुःखात, अडचणीत, लग्न समारंभ अशा प्रत्येक ठिकाणी आधाराला ही माणसं उभी असतात. आपण घरात जरी एकट असलो तरीही शेजारील लोकांचा आधार हा आपल्याला मिळत असतो. घरी कोणीही नसतांना आपल्या घरावर लक्ष ठेवल्या जाते. आपल्या तब्येतीची, जेवणाची विचारपूस केली जाते, हा आधार देणारा शेजार नेहमी आपल्या सुखदुःखात सोबत असतो. सोशल मीडियाच्या जगातही आपण जरी एकमेकांपासून लांब असलो तरी सुद्धा मोबाईलच्या माध्यमातूनही सतत आरोग्यविषयक विचारपूस, चांगले विचारांची देवाणघेवाण सतत सुरू असते. स्वतः विषयक चांगला मजकूर हा शेअर केला जातो. आणि इतरांपर्यंत तो पोहोचवला जातो. त्या मजकुराला येणारा प्रतिसाद, येणाऱ्या प्रतिक्रिया आनंद देऊन जातात. एक आधाराचा सल्लाही मिळतो. सोबतच शुभेच्छाही दिल्या जातात. कठीण प्रसंगांमध्ये हेच आधार देणारी माणसं सतत आपल्या बाजूला उभी असतात. हे आधार देणार नातं पैशावर उभं नसते तर हे आपुलकीवर आपुलकीच्या गोडव्यावर उभं झालेलं असते. या आधाराला वयाच्या प्रत्येक टप्पा ओलांडून तर शेवटच्या क्षणापर्यंत अख्ख आयुष्य बघितलेलं असते. लहानांची होणारी मोठी मुले लग्नकार्य सुख प्रत्येक कार्यात नकळत, न कसली परवा करत स्वतःहून सहभागी होणारा हक्काचा सहभाग एक प्रेमाचा आधार देऊन जातो. घरातील काही महत्त्वाचे कामेही यांच्यावर सोपवली जातात. काही कारणास्तव बाहेरगावी जायचे असेल तर यांच्याच भरोशावर मुलं सोडून किंवा घरातील म्हातारी माणसं सोडून बाहेर गावी जावं लागते. बाहेरगावाला जाताना मनात कसली भीती वाटत नाही. कारण घरी असणाऱ्या मुलांचा सांभाळ करायला आधार देणारी आपल्या शेजारी राहणारी प्रेमळ माणसं असतात. शेजार धर्म हा एकच सांगत असतो कीं इथे कसलाही जातिवाद भेदभाव केला जात नाही. येथे एकमेकांची मने जपली जातात. कारण ते आपल्या शेजारी राहतात, एकमेकांविषयी एकमेकांच्या घरी येणार जाणार त्यांच्याविषयी माहिती असते. दुःखद काळामध्ये आधाराचे दोन शब्द मनावरचा ताण कमी करतात. कोणतेही काम असो. होय मी आहे नं! हें आधाराचे शब्द मनाला संजीवनी देतात. आधार देणे किंवा आधार घेणे, पाठिंबा देणे किंवा पाठिंबा घेणे, सांभाळ करणे किंवा सांभाळ करण्यास भाग पाडणे या गोष्टी जीवनात खूप महत्त्वाच्या ठरतात..!

आधाराचे प्रेमळ शब्द
आपुलकीची फुंकर घालतात
आनंदाची उधळण करत
आपलंसं करून जातात

©® चैताली वरघट
मूर्तिजापूर, जि अकोला

🎭 Series Post

View all