कथा-आधार भाग ३ अंतिम
आज गणेश चतुर्थी. मुख्याध्यापक व शिक्षकांनी अगदी निश्चिंत मनाने आपापल्या घरीच गणेशाची स्थापना केली. काहींनी सुट्टीचा मनसोक्त आनंद घेतला. मुख्याध्यापकांनी व्यवस्थापन समितीला या विषयाची आधीच कल्पना देऊन ठेवली होती. ते म्हणाले होते की आपले हे जे दैवत आहे, याची पूजा आपण आपल्या आपल्या घरी करायची. शाळेतील विद्यार्थ्यांचा मौल्यवान वेळ या धार्मिक कार्यात खर्ची घालू नये असे आम्हाला वाटते.
आणि काय आश्चर्य! गावातील एकाही व्यक्तीने शाळेत येऊन या विषयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही.
आणि काय आश्चर्य! गावातील एकाही व्यक्तीने शाळेत येऊन या विषयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही.
'अगं मीरा, तुला काय झाले? रडतेस का? इकडे ये माझ्याजवळ' .'आणि सांग बघू का रडतेस ते... मीरा चे अश्रू काही केल्या थांबत नव्हते. बाईंनी तिला शांत केले. बाई !'मले माया बाबाची लय आठवण येते. मागल्या वर्षी याच गणपती विसर्जनाच्या दिवशी माह्ये बाबा तलावात बुडाले होते.'
बाईंना तिच्या मनस्थितीची जाणीव होती. आणि म्हणूनच त्यांनी हा उत्सव रद्द करण्याचा घाट घातला होता.
बरं बरं! रडू नको .अगं जे घडून गेलं त्यासाठी रडत बसण्यात काही अर्थ नाही. त्या तलावाकडे जे तू पाहत असतेस, त्यातल्या तुझ्या बाबांना सांग. की बाबा, मी खूप शिकेन. आणि इतके यश मिळवीन की तुमचे व गावाचे नाव उंचावले गेले पाहिजे.
यासाठी मी तुला पूर्णपणे मदत करेन .कारण मला माहित आहे की तू हे करू शकतेस! बाईंना तिच्या बुद्धिमत्तेची चुणूक वेळोवेळी निदर्शनास आली होती. त्यांनी तिचा शिष्यवृत्ती परीक्षेचा फॉर्म सुद्धा भरला.
धाकट्या बहिणीला सांभाळत शाळेत येणाऱ्या तिने, शिष्यवृत्ती परीक्षेतही घवघवीत यश मिळविले.

'मॅडम, मॅडम... आज वावरात मीराच्या आईले पान लागलं'. सातवीतला बंड्या धापा टाकीत मीराच्या वर्गात पोहोचला. 'मॅडम, सगळे लोकं मीराच्या घरी जमा झाले हाय'. काय? आपण काय बातमी ऐकतो यावर बाईंचा विश्वासच बसेना.
मीरा ही बातमी ऐकल्यावर सुसाट वेगाने घरी पोहोचली. सापाच्या विषाने आपला गूण दाखविला होता. आईचं कलेवर पाहून मीराच्या आकांताने सर्व लोकांच्या डोळ्यांना धारा लागल्या. लहान मुलीला शेजारच्या काकूंनी छातीशी कवटाळले . दोन्हीही मुली न कळत्या वयात आई-वडिलांविना पोरक्या झाल्या.
आता बाईंना काय करावे काही सुचेनासे झाले .सर्व शिक्षक मंडळी मीराच्या घरी पोहोचली होती. मीरा आईच्या देहाला कवटाळून सारखी तिच्याकडे पाहत रडून रडून थकली होती. हे पाहून बाईंनी मीराला आई जवळून बाजूला केले. तिला धीर दिला. तिचे अश्रू पुसले.

आज बाई कमालीच्या अस्वस्थ होत्या. घरी त्यांनी अन्नाच्या एका ही कणा हात लावला नाही. सतत विचार करीत कशीबशी रात्र काढली. घरच्यांशी विचारविनिमय करून एक निर्णय घेतला.
त्यांना वाटले, "नियतीने जे घडविले त्याला काही ना काही तरी अर्थ असणारच." शेवटी "काळ्याकुट्ट ढगांनाही सोनेरी किनार असतेच." यातूनही काही चांगले निश्चितच घडेल...
आपल्याला मीरा व तिच्या छोट्या बहिणीला आधार द्यावाच लागेल.

आता मीराची धाकटी, बाईंच्या धाकटी सोबत मजेत खेळते. बाईंच्या मुलीला छोटी मैत्रीण खेळायला मिळाली. मीराने बाईंच्या मदतीने प्रत्येक वर्गात आपला क्रमांक पहिला ठेवला. आज मीराने स्पर्धा परीक्षेत अव्वल येऊन सहाय्यक आयुक्तपदाचा पदभार सांभाळला.
वडिलांना दिलेले वचन तर पाळलेच, तसेच गावाचे नावही उज्वल केले. ती बाईंचे ऋण कधीही फेडू शकत नाही. बाईंनी तिची बुद्धिमत्ता ओळखली होती . मीराच्या बुद्धिमत्तेचं सगळीकडे कौतुक झालं.
वडिलांना दिलेले वचन तर पाळलेच, तसेच गावाचे नावही उज्वल केले. ती बाईंचे ऋण कधीही फेडू शकत नाही. बाईंनी तिची बुद्धिमत्ता ओळखली होती . मीराच्या बुद्धिमत्तेचं सगळीकडे कौतुक झालं.
तिने सुद्धा सर्वांचे आशीर्वाद घेतले.
समाप्त
छाया बर्वे राऊत ८३९००८६९१७
छाया बर्वे राऊत ८३९००८६९१७
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा