आजचा शब्द - आधार.. (कथा - दुसरी )
वसुधा ताई. वय वर्ष साठ तरीही एकदम कणखर धैर्यवान. वसुधा ताईंनी आपल्या दोन्ही मुलांना एकटीनेच वाढवल होत मेहनत करून आपल्या दोन्ही मुलांना शिवांग आणि सुयशला त्यांच्या आवडत्या क्षेत्रात प्रोत्साहन देऊन विदेशात पाठवलं होत. अगदी थाटामाटात दोघांचं लग्न ही लावून दिल होत. त्यांच करण्यात कसलीही कमी ठेवली नव्हती.
वसुधा ताई. वय वर्ष साठ तरीही एकदम कणखर धैर्यवान. वसुधा ताईंनी आपल्या दोन्ही मुलांना एकटीनेच वाढवल होत मेहनत करून आपल्या दोन्ही मुलांना शिवांग आणि सुयशला त्यांच्या आवडत्या क्षेत्रात प्रोत्साहन देऊन विदेशात पाठवलं होत. अगदी थाटामाटात दोघांचं लग्न ही लावून दिल होत. त्यांच करण्यात कसलीही कमी ठेवली नव्हती.
आणि आता दोघ ही आपापल्या कामात नाव कमवत होते डील्स वर डील्स क्रॅक करत होते एक एक यशाची पायरी चढत होते. सुख सोयी पैसा जस काही त्यांच्या पायाशी लोळण घेत होते.
दररोज पार्ट्या हॉटेलिंग यात त्यांचा दिवस कधी संपायचा ते त्यांच त्यांना ही कळत नव्हतं तेव्हा म्हणतात न. "एकदा का प्रसिद्धी पैसा आपल्या आयुष्यात आला की माणूस माणुसपण विसरत असतो." तसच दोघांचं झालं होत.
इकडे...
वसुधा ताई मात्र दिवस रात्र दोघांची वाट बघत होत्या. वसुधा ताईंचा एक गोड समज झाला होता "आपली मूल आहेत आपण त्यांना अगदी लाडा कोडात वाढवलं आहे त्यांना आपली नक्कीच काळजी वाटत असणार मला खात्री आहे ते एक ना एक दिवस परत येतील आणि मग आम्ही सगळे आनंदात राहूत."
पण हा त्यांचा फक्त गोड समज होता ती कुठे परत येणार होती. त्यांना तर विदेश ची हवा लागली होती. शिवांग आणि सुयश आपली फॅमिली आणि आपलं राहणीमान तसेच आपला बिझनेस यामध्ये इतके व्यस्त झाले होते कि, एक आपली आई सुद्धा आहे जी भारतात आपल्या हक्काच्या घरी डोळे लावून वाट बघतीये तीला आपल्या शिवाय कुणी नाही.
आणि एक दिवस…
अचानक शिवांग च्या बिझनेस मध्ये शिवांगच नुकसान होऊ लागलं. त्याच्या पार्टनरनी त्याला धोका दिला आणि दारुच्या नशेत असताना त्याच्या बिझनेस च्या त्याच्या प्रॉपर्टी च्या पेपर्स वर सह्या घेऊन त्याचा बिझनेस आणि त्याची प्रॉपर्टी बळकावली.
शिवांगला काही कळेचना आपण काय कराव तो भावाकडे मदतीला गेला पण सक्सेस च्या नशेत तो ही बुडालेला होता आपला सख्खा लहान भाऊ संकटात आहे आपण दोघ ही एकाच शहरात राहतो आपल्याला देखील कधी तरी मदत लागू शकते हेच तो विसरला आणि त्याने शिवांग मदत करण्यास नकार दिला.
शिवांग पुरता कर्जात बुडला होता. त्याच्या हातून त्याच्याच निष्काळजी पणामुळे त्यानी सगळं गमवलं होत त्याची अशी परिस्थिती बघून त्याची बायको साधना ही त्याला सोडून गेली होती तो आता त्या अनोळखी शहरात पूर्णपणे एकटा पडला होता.
पण हे सगळं होत असताना सुयश ची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नव्हती ह पण ते सुयश ला समजत नव्हत सुयशचा पार्टनर सुयशशी गोड गोड बोलून त्याला लुटतच होता आणि हे त्याला तेव्हा कळाल जेव्हा त्याच्या ऑफिसमध्ये पोलिसांची रेड पडली आणि त्याला खोट्या आरोपावरून अटक करण्यात आलं.
दोघांवर ही अशी परिस्थिती आल्यावर दोघांना जाणवलं आपण पूर्ण एकटे पडलो आहोत आता आपली मदत करणार कुणीच नाही. आणि दोघांनी एक मोठं पाऊल उचलण्याचं ठरवलं.
पण दोघांना ही कल्पना नव्हती कि एक अजून ही आशेचा किरण आपल्यासाठी झगमगतोय तो म्हणजे आपली आई.
हो, वसुधा ताई. ते म्हणतात न. "आपली मूल किती ही दूर असू देत एका आईला आपल्या मुलांच्या आयुष्यातल्या संकटांचा अंदाज येतोच." वसुधा ताईंच घरी राहून मन खात होत त्यांना सारखी दोघांची काळजी वाटत होती.
आणि म्हणून त्यांनी लगेच इथलं सगळं विकून आपल्या मुलांकडे जाण्याचा निर्णय घेतला. आणि शिवांग च्या घरी गेले तोच त्यांना समजल शिवांग चा पार्टनर आता त्याच्या बंगल्यात राहतोय आणि त्यांनी शिवांग ची सगळी प्रॉपर्टी लुबाडली आहे हे बघून त्यांना खुप वाईट वाटलं.
वसुधा ताई जास्त शिकलेल्या नव्हत्या पण त्यांचे अनुभव खुप मोठे होते आणि आपल्या चांगल्या स्वभावाने त्यांनी माणसं ही जपली होती त्या अनोळखी शहरात सुद्धा त्यांना आपलं म्हणणार कुणी तरी होत.
ते म्हणजे श्रवण वसुधा ताईंचा मानलेला मुलगा. तो त्या शहराचा इन्स्पेक्टर होता आपल्या मुलांचे हाल बघून वसुधा ताईंनी श्रवणची मदत मागितली आणि त्याला आपल्या दोन्ही मुलांची सगळी हकीकत सांगितली आपल्या भावांवर ही अशी वेळ आलेली बघून त्याने लगेच आपली सूत्र हलवायला सुरवात केली.
आणि अवघ्या चार पाच दिवसातच दोन्ही पार्टनर्स ना अटक करण्यात आली. शिवांग आणि सुयश ला त्यांच वैभव परत मिळालं ते ही त्यांच्या आईमुळे जिला ते पूर्ण विसरले होते.
दोघांना आपल्या चुकीची जाणीव झाली. त्यांना जाणवलं संपत्तीच्या मोहापाई आपण आपल्या सख्ख्या आईला विसरलो आणि आज आपल्या आईनेच आपल्याला संकटातून बाहेर काढलं दोघांनी वसुधा ताईंची माफी मागितली आणि सगळे एकत्र राहू लागले.
"शेवटी आई ती आईच असते नाही का.”
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा